Want to Master Gardening in Less Time?
Focused Gardening Learning फिचर्सव्दारे शिका बागकाम!
बागकामात यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग
जलद आणि प्रभावी बागकाम शिक्षणासाठी हे करा
बागकाम शिकण्याच्या विविध पध्दती आहेत. पण प्रभावी बागकाम शिकण्यासाठी फक्त पाहणं आणि ऐकणं पुरेसं नाही! त्याही पलिकडे खूप काही आहे. Focused Gardening Learning लेखात तुम्ही 90 % लक्ष्य केंद्रीत पद्धतीने कसं शिकू शकता याचे रहस्य आता उघड केले आहे. ! बागकाम शिकताना फक्त पाहणं आणि ऐकणं पुरेसं नसतं तर प्रत्यक्ष कृती करतांना मिळणारं योग्य मार्गदर्शन हे महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही 90 % शिकण्याचा अनुभव येतो. बागकाम शिकतांना Focused Gardening Learning कसं करायचं हे जाणून घ्या! त्यातील बारकावे या लेखातून समजून घ्या. – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, गच्चीवरची बाग.

Table of Contents
1. बागकाम शिकण्याचा मंत्र
बागकाम शिकण्याची प्रत्येकालाच इच्छा आहे. आपण शिकत असतो. जमेल तेथून, जमेल तसं. पण शिकणं शिकणं असतं का? हा खरा प्रश्न हे. खर तर काय आहे? फक्त पाहिलं, ऐकलं आणि विसरलं? की प्रत्यक्ष करून पाहिलं आणि यश मिळवलं? यात प्रचंड तफावत आहे. फक्त ऐकलं? 20% शिकलं! फक्त बघितलं? 30% शिकलं! परत व्हिडीओ पाहिला? 50% शिकलं! शिकून स्वतः करून पाहिलं? 75% शिकलं! कोचसोबत वेळोवळी चर्चा केली? 90% शिकलं! 🚀 बागकाम शिकण्याची खरी मजा प्रत्यक्ष करून पाहण्यात आहे. कधी कधी आपण YouTube व्हिडीओ पाहतो, ब्लॉग वाचतो आणि वाटतं की आता आपण सगळं शिकलो. पण प्रत्यक्षात जेव्हा बियाणं रुजत नाही, कीटक त्रास देतात, पानं सुकतात, तेव्हा खरी अडचण समजते. म्हणूनच प्रत्यक्ष बागकाम करतांना कोच कडून मार्गदर्शन घेणे आणि सराव दोन्हींची गरज असते. म्हणून Focused Gardening Learning काय पध्दत आहे हा विषय समजून घेतला पाहिजे.
2. फक्त ऐकलं ? 20% शिकलं!
बागकामाची प्रत्येकालाच आवड असते. त्याची आता गरज भासू लागली आहे. कुणीतरी अशी बाग केली आहे याचे कौतुक ऐकू आले की आपणही बागकामाला सुरूवात करतो. तसेच बागकामात येणार्या अडीअडचणीवर गप्पा रंगतात. त्यातूनही आपण शिकतो पण हे शिकण्याचे प्रमाण फक्त 20 % च असते. म्हणजे खर्या शिकण्यापासून आपण 80 % तोटा असतो. तसेच ऐकीव माहितीला आधार नसतो. सांगणारा हा त्या माहितीत आपआपल्या परिने भर घालत असतो. त्यामुळे ऐकीव माहितीतून बाग फुलवत असाल तर तुमची बाग फक्त 20 %च यशस्वी होईल याची खात्री बाळगा. म्हणूनच Focused Gardening Learning पध्दतीवर भर द्या. वेगाने बागकाम शिकता येते.
3. फक्त बघितलं ? 30% शिकलं!
बरेचदा बागकाम हे बघण्यातून शिकलं जातं. आपण पाहतो. आपले पूर्वीनुभव त्यात जोडतो. त्यात कल्पना, ठोकताळे जोडतो. आणि तसं करून पाहतो. बॅटला चेंडू लागला तर लागतो. नाही तर त्यात आपण प्रयोग करत असतो. प्रत्यक्ष बघून शिकतो. त्यातून आपला मेंदू त्याला केवळ बाह्यरूप कॉपी करतो. पण त्याचे अंतरंग व बारकावे हे सुटून जातात. म्हणून अशा प्रकारच्या शिकण्यात जवळपास 70 % तोटा असतो. त्यामुळे बघण्यातून शिकणं हा संपूर्ण शिकण्यातला भाग आहे पण तो पापड मिरची, लोणच्यासारखा असतो. हे लक्षात घ्या. कधी कधी तर बघून शिकण्यात स्वतःची किंवा तांत्रीक दृष्ट्या फसले जातो. थोडक्यात करायला गेलो गणपती व झाला मारूती.. म्हणूनच Focused Gardening Learning पध्दती काय आहेत त्याचा अवलंब कसा करायचा हे समजून घ्या.
4 परत व्हिडीओ पाहिला? 50% शिकलं!
ऑनलाईन बाग शिकतांना तुम्हाला कोच सोबत शिकता येते. शिवाय सेशन्समधे बागकामातील विषयाची मुद्देसुद मांडणी केल्यामुळे सुध्दा तुम्हाला विषायाची खोली लक्षात येतेच. पण त्या सोबतच तुम्हाला हे ठराविक सेशन हे पुन्हा पुन्हा अभ्यासायचे असेल तर ते उपलब्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार पुन्हा पुन्हा पाहू शकता. अभ्यासू शकता. त्यामुळे एकूण शिकण्यातील प्रक्रिया Focused Gardening Learning पुन्हा 50 % साध्य करता येते. मग खरं शिकणं काय व कसं …
5. शिकून स्वतः करून पाहिलं? 75% शिकलं!
शिकण्यातील हा चौथा टप्पा जे तुम्हाला शिकण्याच्या हायवेच्या जवळ नेतो. जे पाहिलं, ऐकलं, पुन्हा पुन्हा अभ्यासलं या सर्वांतून तुम्ही फक्त 75 % शिकू शकता. बरीच मंडळी एवढं शिकलो खूप झालं असं समजून आपलं शिकणं य़ेथे थांबवता. पण येथे बागकामाची गाडी तुमची गाडी चालू राहते. पण पळू शकत नाही. शिवाय चढाला ति रिव्हर्स येण्याची दाट शक्यता असते. कारण उरलेला 25 टक्के भाग हाच तुमच्या बागकामातील समस्यांचा खरा कोच सोबत वेळोवेळी शिकून समजून घेतलां पाहिजे. त्यामुळे Focused Gardening Learning सर्वात महत्वाचा व अंतिम टप्पा ठरतो कोचसोबत वेळोवेळी चर्चा करणे.
6. कोचसोबत वेळोवळी चर्चा केली? 90% शिकलं!
बागकाम कुणाकडूनही शिकता येतं. निसर्गच आपला गुरू असतो. पण विशिष्ट विषयात, कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तिकडून शिकणं हे कधीही चांगल. विशेष म्हणजे जेंव्हा तुम्ही ऑनलाईन शिकता तेव्हां तुम्ही त्यांचा अनुभव लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी बाग काम करता तेव्हां मनात येणार्या लान स शंका या कोचला विचारायला हव्यात. तरच तुम्हाला खर्या अर्थाने शिकण्याचा आनंद मिळेल. परिपूर्ण शिकण्याचे एक वर्तुळ पूर्ण करता येईल. असा शिकण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर या लेखाचे लेखक संदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधू शकता. संदीप चव्हाण हे स्वतः मागील 24 वर्ष या विषयात काम करत आहेत. अंगभूत अशा शिकवण्याच्या हातोडी सोबत तुम्हाला रोजच्या उदाहरणातून ते बागकाम, निसर्ग शिकवत असतात. तेव्हा आताच संपर्क करा व तुमच्या बागकामाची सुरूवात करण्यास सुरूवात करा. त्यासाठी फ्री सेमिनारला हजेरी लावा किंवा सरळ तुमच्या बागेचे प्रश्न सोडवणारा पर्सनल कंन्सलटेशन कॉल बुक करा. तेव्हा Focused Gardening Learning पध्दतीने शिकायला सुरूवात करा.
7. 10 % शिकणं कुठे हरवतंय?
कोच सोबत बोलून आपण 90 % पर्यंत शिकू शकतो तर 10 % शिकणं जात कुठं? असा प्रश्न तुम्हाला लेख वाचून पडला असणारच. हे 10 % शिकणं हे तुमच्या Leraning Manegment Systeem वर अवलंबून असतं. ते तुम्ही तुमच्या विचारात, कृतीत तसं संचय करता. किती वेळा वापरता यावर ते अवलंबून असते. Focused Gardening Learning हे तुम्हाला कामास येवू शकतं.
निष्कर्शः कोचसोबत शिकण्याचे फायदेः
तुमच्या बागेच्या समस्या त्वरित सोडवल्या जातील. तुम्ही वेळ आणि पैसा दोन्ही वाचवाल. बागकामात सातत्य ठेवल्यास उत्तम निकाल मिळेल. शंका सोडवण्यासाठी कोचची मदत मिळेल. तर मग तुम्ही ठरवलंत का? 👉 फक्त पाहायचं, ऐकायचं की प्रत्यक्ष करून यश मिळवायचं?
8. Gardening Coursess
टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन
Key words and Hashtag
- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
- Do You Know This Plant?
बागकाम, organic gardening, gardening tips, home gardening, learning gardening, sustainable gardening, #GardeningTips #LearnGardening #GreenLiving #HomeGardeners
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.





You must be logged in to post a comment.