Can We Stop Climate Change ?

86 / 100 SEO Score

Facing Climate Change: What Went Wrong?

Understanding Climate Change for a Safer Future

पर्यावरण बदल: सुरक्षित भविष्याची किल्ली

मानव निर्मित पर्यावरण बदलावर नियंत्रण कसे मिळवावे?

Climate Change

आपण केलेल्या क्रियांच्या परिणामस्वरूप वातावरणात बदल Climate Change घडत आहे. पृथ्वीवरील हवामानातील या मोठ्या बदलांमुळे पुढील पिढ्यांना मोठे संकट येण्याची शक्यता आहे.” “‘वातावरण बदल’ Climate Change हा आजच्या काळात चिंतेचा विषय झाला आहे. पृथ्वीवरील वातावरणात होणारे बदल आणि त्याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. मानवी वर्तनाचा या बदलांशी असलेला संबंध आणि भविष्यात आपण याला कसे तोंड देऊ शकतो, हे या लेखात मांडले आहे. आपल्या वातावरणातील होत असलेले अनाकलनीय बदल हे आपल्याला अजून मोठ्या समस्यांना सामोरे जाण्यास भाग पाडू शकतात. ज्यात उन्हाळा, पावसाळा आणि थंडीच्या ऋतुंचा समतोल बिघडण्याचा धोका आहे. हा Climate Change लेख आपल्याला यावर नियंत्रण कसे आणता येईल याचे उत्तर देईल.- संबंध विकास सामाजिक संस्था. 

काय बरं हे वातावरण बदल ?

काय बरं हे वातावरण बदल ? वातावरण बदल: कुणाचे ? ‘वातावरण बदल’ ज्याला इंग्रजीत ‘क्लायमेट चेंज’ Climate Change म्हणून सध्या जगभरात खूप काळजीचा विषय म्हणून चर्चा केली जात आहे. हा गंभीर विषय आहे, आपले व सर्व सजीवांचे सध्यातरी एकमेव घर ‘पृथ्वी’ याबद्दलचा. आपल्या या घराचे ‘वातावरण’ बदलते आहे. ते इतके बदलते आहे की, कदाचित पुढील पन्नास वर्षांनी आपण आपल्या या घरात आज रहातो तसे निश्चिंत राहू शकणार नाही. 

आपल्या पृथ्वीवरील वातावरणात काय बदल होईल ?  

म्हणजे काय होईल तर ? उन्हाळा, पावसाळा आणि थंडी या तीन्ही ऋतुंचा आनंद घेण्या ऐवजी आपण या तिन्ही ऋतुंना त्यांचे आक्राळ विक्राळ रूप बघून घाबरून जावू. पृथ्वीवर काही ठिकाणी एवढे ऊन एवढे पडेल की, कधीच पडले नव्हते. काही ठिकाणी फक्त पाऊसच पाऊस राहील आणि तो ही खूप मोठ्या प्रमाणात. थंडी काही ठिकाणी आपली कमाल मर्यादा एवढी पार करेल की, तेथे जगणे मुश्किल होईल.

Climate Change

आपल्यावर जीवनावर पृथ्वीवरील वातावरण बदलाचा काय परिणाम होईल ?

खरंतर पृथ्वीवरील वातावरण बदलाचा आपल्या जीवनावर परिणाम व्हायला सुरुवात काही वर्षांपूर्वीच झालेली आहे . खालील काही वाक्ये आपण हल्ली पुन्हा पुन्हा म्हणतो/ ऐकतो का ?  “अरे नाशिक सारख्या महाराष्ट्रातील थंड वातावरणाच्या शहरात  हल्ली मे महिन्यात सहन होत नाही एवढे ऊन पडते”.  “हल्ली एकाच वेळी उन्हाळा, पावसाळा आणि थंडी तीन्ही ऋतू अनुभवायला मिळतात नाही का, काही खरं राहिलं नाही” “महाराष्ट्रातील विदर्भात रेकॉर्ड ब्रेक ऊष्णता वाढली आहे.” “हल्ली थंडी हा ऋतूच राहिला नाही पावसाळा गेला की थेट उन्हाळा सुरू होतो” “आता पूर्वी सारखा पाऊस पडत नाही, आणि जेथे पडतो तेथे पडतो तेथे एवढा की सर्व वाहून जाते.” “दिवसेंदिवस जमिनीतील पाणी पातळी घटते आहे”. “आता पूर्वीसारखी जंगले राहिली नाहीत आणि त्यात जंगली प्राणीही नाहीत” “जंगलातील बिबटे शहरात येत आहेत” ही सर्व वाक्ये आपल्याला काय सुचवतात ? पृथ्वीवरील वातावरण बदलाचा Climate Change काय परिणाम आपल्यावर झाला आहे हे सांगतात.

कुणी केले हे वातावरण बदल आपल्या पृथ्वीवर? 

आपण म्हणतो ‘आपली पृथ्वी’. सध्या तरी येथे आपले ‘मानवाचे’ राज्य आहे. याचा अर्थ दोनच शक्यता आहेत. एक तर  पृथ्वीवर हे वातावरण बदल निसर्गाने केले. किंवा दुसरी शक्यता मानवाने म्हणजे आपण पृथ्वीवरील वातावरणात बदल Climate Change केले . जगभर या बद्दल जो अभ्यास चालू आहे तो असे सांगतो की, निसर्गाने पृथ्वीच्या वातावरणात जे केले त्यामुळेच पृथ्वीवर आपण धरून सर्व जीवसृष्टी अस्तित्वात आली . म्हणजे निसर्गाने पृथ्वीच्या वातावरणात जे बदल केले त्यालाही पृथ्वीवरील वातावरण बदलच म्हणता येईल.  परंतु हे बदल आपल्यासाठी कधी काळजीचा विषय बनले नाही.  मात्र आपण मानवाने पृथ्वीवरील वातावरणात जे बदल केले ते मात्र आज खूपच काळजीचे Climate Change विषय बनले आहेत. याबद्दल पुढे सविस्तर बघुया .

मानवाने पृथ्वीवरील वातावरणात जे बदल केले ते  थांबवता येणे शक्य नाही का? 

या प्रश्नाचे उत्तर होय ही आहे आणि नाही ही असे दोन्ही आहे. कारण मानवाचे पृथ्वी सोबत जे नाते आहे, जो संबंध आहे त्याबद्दल अधिक चिकित्सकपणे चर्चा केल्यास याचा उलगडा होवू शकतो. हा उलगडा करायचा म्हणजे मला अजून लिहावे लागेल आणि आपणास अजून वाचावे लागेल. तेव्हां पुन्हा भेटू या, येथेच. – संबंध विकास सामाजिक संस्था. (संस्था मानवी वर्तन आणि पर्यावरण बदल या विषयावर काम करते)

संबंध विकास संस्थेचे इतर लेख

1. Is Safety ? Your Home https://wp.me/p9QtjD-4Hq

Free Gardening Course

A. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण

  • यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज @gacchivarchi_baug

B. बागकाम विषयावरील लेखः

C. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

D.Vegetabales Seeds

एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक: बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

Vegetables Seeds

वातावरण बदल, हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संरक्षण, human-caused climate change, climate crisis, nature conservation, #ClimateChange, #Environment, #SaveEarth, #SustainableLiving, #EnvironmentProtection, #वातावरणबदल



Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

War n Climate change (HIndi) Save Earth (hindi) Dangerous Food In INDIA
10 OxyGen Plants