श्रावणातले सोमवार यांचे निसर्गाशी असलेल नातं

श्रावण महिना हा पावसाळ्याचा महिना असल्यामुळे निसर्गात विविध बदल पहायला मिळतात. ऊन-सावलीचे खेळ या काळात अत्यंत मनोहारी आणि सौंदर्यपूर्ण असतात. या बदलांमुळे निसर्गातील विविध दृश्ये आणि अनुभवांचा आस्वाद घेता येतो. पण हे बदल आपल्याला मनाचे हळवे पदरसुध्दा अलगद उलगडतात. जे आपलं निसर्गाशी असलेलं जूनं व खोलवरच्या नात्याला उजाळा देतात.
श्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे; क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) ही कविता कितीतरी कविमनांना भुरळ आजही भुरळ घालते. अगदी कुमार वयात आपल्या शिक्षकांनी समजून सांगितलेली नव्हे आपण ति अनुभवलेली कविता आपल्याला निसर्गाच्या कुशीत घेवून जाते. ज्या कवितेच्या ओळी आज प्रत्येकाच्या तोंडी आहे.
श्रावण महिना हा भारतातील मान्सूनचा कालावधी आहे, ज्यामुळे पाऊस पडतो आणि निसर्गाला नवी सजीवता मिळते. या महिन्यात झाडे, पिके आणि संपूर्ण निसर्ग हिरवागार होतो. पेरलंल धान्य हे उगवून वार्याच्या तालावर नाचत बागडत असतं. या वार्याच्या लहरीचां ताल, सुरांचा नाद, व त्याला प्रकाश संयोजनाची जोड म्हणजे ढगाच्या आडून पाझरलेला आल्हाददायक प्रकाशाचा झोत अनुभवायचा म्हणजे डोंगराच्या खांद्यावर बसून पहाणे हे खूपच रोमांचकारी असते. जे आपल्याला कुठेही एकाद्या कॅमेरात वा शब्दात टिपता व लिहता येत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या संवेदनशील मनाचीच कवाडे हळूवार उघडावी लागतात.

श्रावण महिन्याचे फक्त नैसर्गिक महत्व नसून श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व पण तेवढेच महत्वाचे आहे. श्रावण सोमवारी हा श्रावण महिन्यातील (जुलै-ऑगस्ट) सोमवार आहे. हा कालावधी भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. भक्तगण या सोमवारी उपवास करतात आणि भगवान शिवाला समर्पित विशेष प्रार्थना आणि विधी करतात. असे मानले जाते की या उपवासांचे पालन केल्याने समृद्धी, आरोग्य आणि आनंद मिळतो. भारताच्या विविध प्रदेशांत श्रावण सोमवारी संबंधित विशिष्ट प्रथा आणि परंपरा आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मंदिरांना भेट देणे आणि शिवलिंगाचे अभिषेक करणे सामान्य आहे. या महिण्यात मांसाहारास टाळणे सांगतिले आहे. त्याची कारणे ही आरोग्यादायी आहेतच शिवाय या पृथ्वीवरची जैवसंस्था टिकून रहावी त्यासाठी दिलेला हा विश्रांतीचा काळ असतो. कारण याच अनेक जिव जन्माला येतात. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी या सकल धरणीमातेने घेतली असतांना ते खंडीत होता कामा नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. तसेच या काळात नारळी पूर्णिमा सुध्दा येते या काळात मच्छिमार करणारे कोळी बांधव या दिवसामधे होड्या समुद्रात नेत नाही. असा हा उदात्त हेतून आपल्या पूर्वजांनी जाणीव पूर्वक आपल्या संस्कृतित रेखाटला आहे.
श्रावण महिन्यात शेतकरी आपल्या लागवड केलेल्या पिकांची काळजी घेतात. या पावसाळ्यामुळे शेतीला आवश्यक असणारे पाणी मिळते आणि त्यामुळे शेती फुलते. अन्नधान्याबरोबर सर्वत्र तृणधान्य, तृणसुध्दा आपसूकच वाढू लागलेले असते. या दिवसात धरणीमाय ही हिरवा शालू नेसून संपूर्ण सजलेली असते.
श्रावण महिन्यात पडणारा पाऊस नद्या, तलाव आणि जलाशय यांना भरतो, ज्यामुळे पाणीपुरवठा वाढतो. याचा परिणाम म्हणजे पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. याच काळात पावसाला थोडासा आराम पडलेला असतो त्यामुळे धावणारं पाणी हे जमिनीत मोठ्या प्रमाणात जिरण्याचे नैसर्गिक काम सुध्दा चाललेले असते. अनेक ठिकाणी श्रावण महिन्यात वृक्षारोपणाच्या उपक्रमांचे आयोजन केले जाते, जे पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लावते.
श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना बेल, धतूरा, आक, आणि तुळस यासारख्या पवित्र झाडांचे पान आणि फुले अर्पण केली जातात. या झाडांचे निसर्गात विशेष महत्त्व आहे. या महिन्यात नदी आणि अन्य जलस्रोतांची पूजा केली जाते. जलाला पवित्र मानून त्याचा योग्य वापर करण्याचे संदेश दिले जातात. त्याच सोबत बेलपत्र हे आदी वनस्पतींचा आपल्या ओरोग्यासाठी अन्यन्य साधारण महत्व आहे. आपल्या रचनाकारांनी त्याचा सणासुदीच्या निमित्ताने, पुजा अर्चेच्या निमित्ताने त्याची सुंदर विण तयार केली आहे. पण आपण त्याला फक्त कर्मकांड म्हणून आपलेसे केले हेही तितकेच खरं आहे. त्याला वैज्ञानिक दृष्टीने तपासून पाहणे व अवलंब करणे गरजेचं आहे.
श्रावण सोमवारी सात्विक आहाराचे पालन केले जाते, ज्यात ताज्या फळे आणि भाज्यांचा समावेश असतो. हा आहार निसर्गाच्या वरदानाचे प्रतिबिंब आहे.उपवासाच्या काळात ताज्या भाज्यांचे सेवन आवश्यक पोषकतत्वे पुरवते आणि शरीर निरोगी ठेवते. भाज्या जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थांनी समृद्ध असतात. श्रावण महिन्यात सामान्यतः सेवन केल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये पालक, गाजर, काकडी, टोमॅटो, आणि गोडवेल यांचा समावेश होतो. या भाज्या हलक्या, पचण्यास सोप्या आणि आवश्यक हायड्रेशन आणि पोषण पुरवतात. श्रावण सोमवारी खाण्यात येणाऱ्या भाज्या आणि फळे हे शरीराला आवश्यक पोषकतत्वे पुरवतात आणि धार्मिक उपवासाच्या काळात शरीराला ताजेतवाने ठेवतात. सात्विक आहाराचे पालन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते
खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळे पाहुयात लाल भोपळा , पालक, गाजर, काकडी, टोमॅटो ,भेंडी तसेच फळांमध्ये केळी पपई सफरचंद डाळिंब चिकू संत्र इत्यादी.
बरेचदा बाग प्रेमी मंडळीनी बागेची सुरूवात जून मधेच केली असल्यास नैसर्गिक व विषमुक्त पध्दतीने पिकवलेल्या भाज्या हे सहजतेने आपल्या बागेतून मिळू लागतात. या भाज्या मधे नेहमीच्या भाज्याबरोबरच रानभाज्यासुध्दा उगवता येतात व त्यांचे सेवन करता येते.

काही मंडळीचा गैरसमज असतो की पावसाळ्यात पाले भाज्यांचे सेवन करू नये… कारण काय तर डॉक्टरांनी तसे सांगितलेले असते. पण हे पूर्ण सत्य नाही. पावसाळ्यात बाजारात मिळणार्या पालेभाज्या सेवन करू नये. पण घरी पिकवलेल्या भाज्या सेवन केल्यास त्याचा काहीही अपाय होत नाही. कारण बाजरातील भाज्या या उघड्यावर, पावसाच्या, गटाराच्या, वाहून येणार्या पाण्यात वाढत असतात. सर्वत्र पाणी हे गढुळच नव्हे तर जिव जतूं असेलेले पाणी एकत्र झालेले असते. अशा पाण्यातच तुम्हाला मिळणारी भाजी ही धुतलेली असते. त्यामुळे डॉ. या भाज्या खाण्यास मनाई करतात. पण घरी उगवलेल्या भाज्या या आपल्या डोळ्यासमोर असतात. आपण त्यांची पुरेपुर काळजी घेतलेली असते. त्यामुळे त्यापासून विषबाधा अथवा जंतूसंसर्ग होत नाही.
असा हा श्रावण आपल्याला खूप काही देतो. चला तर मग श्रावण काळात निसर्गाचा आस्वाद घेऊन आपल्या जीवनातील तणाव दूर करु. – मिस.आकांशा कांबळे, मुबंई (एग्रीकल्चरिस्ट)
Connection between Shravan Mondays and Nature, Shravan Mondays environmental significance, Nature rituals in Shravan month, Eco-friendly traditions of Shravan Mondays, Spiritual and natural harmony in Shravan, Shravan month green practices, Shravan Mondays and nature conservation, Ecological benefits of Shravan rituals, Nature worship during Shravan, Shravan month environmental awareness, #ShravanMondays, #NatureConnection, #ShravanTraditions, #EcoFriendlyRituals, #NatureAndSpirituality, #GreenPractices, #ShravanMonth, #EnvironmentalAwareness, #NatureWorship, #EcoConscious, श्रावण सोमवारा आणि निसर्गाचा संबंध, श्रावण सोमवारा पर्यावरणीय महत्त्व, श्रावण महिन्यातील निसर्ग विधी, श्रावण सोमवारा इको-फ्रेंडली परंपरा, श्रावणातील आध्यात्मिक आणि नैसर्गिक सामंजस्य, श्रावण महिन्यातील हरित प्रथा, श्रावण सोमवारा आणि निसर्ग संवर्धन, श्रावण विधींचे पर्यावरणीय फायदे, श्रावणातील निसर्ग पूजा, श्रावण महिन्यातील पर्यावरण जनजागृती, #श्रावणसोमवार , #निसर्गसंबंध, #श्रावणपरंपरा, #इकोफ्रेंडलीविधी, #निसर्गआणिआध्यात्मिकता, #हरितप्रथा, #श्रावणमहिना, #पर्यावरणजनजागृती, #निसर्गपूजा, #इकोकॉन्शस
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.