
उदाः शेणखतः आपल्या बागेसाठी बहुतेकदा शेणखत हे खत वापरले जाते. पण ते शेणखत खरोखरच उपयोगाची आहे का, त्याची बनवण्याची प्रक्रिया आपण अभ्यासली आहे का… तर नाही…
आम्ही बनवत असलेले शेणखत हे वैज्ञानिक व तर्कसंगत पध्दतीने बनवलेले आहे. ते कसे पाहूया..
पहिले म्हणजे तुम्ही जे शेणखत आणता त्यात शेणाचे खडे किंवा गोळे असतात. हे शेणखत उकीरड्यावर कंपोस्ट केलेले असते. उन्हामधे शेणातील जीवाणू ही मृतवत होतात. तर पावसाळ्यात त्यातील सत्व वाहून जाते. तसेच उकीड्यावर शेण टाकल्यामुळे उकीरड्याचा गाभा फक्त कंपोस्ट होतो. काही शेण हे कंपोस्ट न होताच आपल्या बागेत मिसळून हे झाडांना दिले जाते. जे शेण कंपोस्ट होत नाही त्यात किंवा जमीनीवर कंपोस्ट होण्यासाठी टाकले जाते. त्यात हुमणी अळीचे प्रमाण प्रचंड असते. हुमणी अळ्या या झाडांच्या गोड अन्न मुळ्या खाण्याचं काम करतात. झाडं जिवंत वाटतं पण वाढत नाही किंवा एकादे मोठे झाडं अचानक वाळून जाते.
तसेच दुभत्या जनावरांना दुध अधिक येण्यासाठी हार्मोन्स वाढीचे इंजेक्शन दिले जातात. या इंजेक्शन मुळे सेवन केले जाणार्या दूधामुळे मुली लवकर वयात येणे, मुलांमधे प्रौढत्वाची लक्षणे दिसू लागतात.
हे हार्मोन्सची इंजेक्शन विक्रीला बाजारात बंदी आहे. पण ते सर्सास विकली जातात. तर या औषधाच्या मात्रा जशा दुधात उतरतात त्याच्या क्रित्येक पटीने ते शेणात मिसळतात. माझ्या अभ्यासानुसार अशा जनावरांचे शेण हे खत म्हणून वापरले असता फळांचा आकार हा दुप्पटीने वाढतो. म्हणून यापासून सावधान…
आमच्या घरची ही गाय ही दुधासाठी नसून ती गौमुत्र व फक्त शेणासाठी पाळली आहे. त्यामुळे तिला कोणतेही इंजेक्शन देत नाही. तसेच तिच्या शेणापासन आम्ही बनवत असलेल्या खताची प्रक्रिया ही संपूर्णतः सावलीत व पावसापासून बचावलेली असते. त्यामुळे वरील मुद्दयात नमूद केलेले मुद्दयानुरूप त्याचे सत्व जपले जाते. तसेच ते जमीनीपासून वर अश्या सच्छिद्र विटांच्या हौदात तयार केले जाते. त्यामुळे त्याची दुर्गंधी नसते तसेच वेळो वेळी त्यातील उष्णता बाहेर पडते. तसेच चारही बाजूने त्याचे व्यवस्थित कंपोस्ट होण्यास मदत होते. या प्रकारात हुमणी अळी सापडत नाही. तसेच खत बनवण्याची प्रक्रिया ही सावलीत झाल्यामुळे त्यातील जीवाणू हे सुप्तावस्थेत जातात. व योग्य वेळी पाणी व मातीचा संपर्क झाल्यास ते पूर्नजीवीत होतात. हे खत चाळणीने चाळून 21 रू. किलो प्रमाणे किलोच्या पॅकिंग मधे 105 रूपयात उपलब्ध आहे.
रंग, रूप व गंध ..
आम्ही वरील पध्दतीने तयार केल्याल्या खताचा रंग हा काळसर, तपकीरी भासतो. वजनाला हलके. मऊशार असते. क्वचितच त्याला मातीचा सुगंधही जाणवतो.
बागेला देण्याची पध्दतः खत हे सहसा सायंकाळी द्यावे. कारण उन्हात टाकलेले खत हे वाळण्याची परिणामी त्यातील जीवाणू मृत होण्याची दाट शक्यता असते. आपणास कुंडीत खत द्यावयाचे असल्यास रोपाभोवतालची माती म्हणजे कुंडीच्या कडेची माती उकरून बाजूला करावी. त्यात मूठभर शेणखत घालावे व वरून मातीने झाकून द्यावे. जमीनीत देतांनाही हीच पध्दत वापरावी. फक्त प्रमाण बदलते. खत देवून झाल्यावर लगेचच पाणी द्यावे म्हणजे त्यातील जीवाणू हे मातीबरोबर संयोग पावतात.
शेणखत हे गुलाब, मोगरा अशा फुलं येणार्या तसेच फळझाडं, फळभाज्यासाठी वापरणे गरजेचे असते.
दक्षताः हे खत झाकून व सावलीत ठेवावे. कोरडे पडू देवू नये.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक
Comments are closed.