Ganesh Visarjan Experience

89 / 100 SEO Score

A Practical Guide to Eco-Friendly Ganesh Visarjan Based on Experience in

गणेश विसर्जनाच्या Ganesh Visarjan पारंपारिक विधींचे पर्यावरणपूरक पर्याय

कचरा कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या टिप्स

Ganesh Visarjan

या लेखात, पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा अनुभव आणि त्यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. लेखात पारंपारिक गणेश विसर्जनाच्या विधींचे पर्यावरणपूरक पर्याय आहेत. मातीच्या मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन, पाण्याचे संरक्षणासाठी घेतलेली काळजी. आणि कचरा कमी करून गणेशोत्सव साजरा करण्याच्या टिप्स दिल्या आहेत. हे सर्व उपाय पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक दृष्टिकोन कसा अवलंबावा याबद्दल मार्गदर्शन देतात.

गणेश विसर्जन: वास्तविक अनुभवावर आधारित प्रायोगिक मार्गदर्शक

गच्चीवरची बाग अर्थातच ग्रो ऑरगॅनिक विषयी काम करतांना आम्ही मागील २३ वर्षात विविधतेचे अनुभव घेतले. ऑरगॅनिक म्हटलं की बाजारातून तयार खतं आणायची नाहीत. जे काही तयार करायचे ते नैसर्गिक संसाधनांचा वापर करतच करायचे. थोडक्यात पर्यावरणाचा विचार पहिला नंतर बाकीचे काही. अर्थातच बागकाम म्हटलं की कचरा व्यवस्थापन हे आलेच. त्यातून मग कचरा कुठे, कशामुळे तयार होतो. त्यातला आपल्याला बागेसाठी कसा उपयोग करायचा हा विचार आलाच व त्या पाठोपाठ कृती सुध्दा.. आणी या सोबत पर्यावरणावर काम करणारी मंडळीसुध्दा आलीच. त्यांच्या सोबतचे काही अनुभव येथे मांडणार आहे.

Table of Contents

1. प्रस्तावना

  • गणेश विसर्जनाच्या महत्वाची ओळख : गणेश विसर्जन Ganesh Visarjan हे विविध पध्दतीने केले जाते. सहसा नदीच्या जलपात्रात करण्याची पंरपरा आहे. पण वाढती लोकसंख्या व पिण्याच्या पाण्याची मागणी पाहता. नदी स्वच्छ, निर्जुंतुक ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे यात पर्यावरणावर काम करणारी मंडळी, गट, संस्था, स्थानिक प्रशासन हे कार्यरत असतात. या सर्वींनी पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करण्यासाठी पुढाकार घेतला. आणि त्यातूनच गणेश विसर्जन Ganesh Visarjan हे कुत्रीम तलाव, पिंप यांचा वापर केला जातो. तर जागृक नागरिक हे घरीच विसर्जन करतात. तर आपले काही उत्साही लोक हे नदीवरच जातात. पण एवढ्या मोठ्या संख्येने, कुजलेला,सडलेले निर्माल्य आपण नाचत गाजवत नेत असतो. त्यातून होणारे जल प्रदुर्षन, ध्वनी प्रदुर्षन, प्रशासनावर बंदोबस्तासाठी येणारा ताण या सर्वांचा विचार करता. गणेश विसर्जन हे घरीच केलेले उत्तम त्यातून मानसिक समाधान तर मिळतेच. पण आनंद सुध्दा मिळतो.
  • पर्यावरणीय आव्हानांचा ताणः नदी हे पिण्यााच पाण्याचा स्त्रोत आहे. आधीच आपल्याकडील विकासाचा वेग पाहता, लोकांचा त्या बद्दल आस्था पहाता. नदी वाचावी असे फार कमी लोकांना वाटते. कारण नदी पात्रात सर्वच गोष्टी करण्याचा प्रघात आहे. अगदी वाहत्या पाण्याता मृत जनावरे फेकणं, शु व शौच्यास नदी पात्राचा वापर हा नदी किनारी असलेली लोक करतच असतात. त्यात भर म्हणून नदी पात्रात कपडे, गोधड्या, गाड्या धुणे या सर्वामुळे नदीची जैवसंस्था बिघडते. पर्यायाने दुषित पाण्याचा त्रास हा सर्वांनाचा भोगावा लागतो. त्यात आपल्या आस्थेमुळे Ganesh Visarjan आपण त्यात अधिकच भर तर टाकत नाही ना, याचा विचार करणे गरजेचं आहे. पण लक्षात कोण घेतो. असो..

2. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे फायदे

  • पर्यावरणाचे संरक्षण कसे होते? : घरीच गणेश विसर्जन Ganesh Visarjan केल्याने ते आनंदाने, सर्व विधी पाळून केले जातात. कुठेही घाईगडबड नसते. मनोभावे गणेशाचा निरोप घेता येतो. त्यांचा निरोपाच्या वेळेस सन्मान केला जातो. यामुळे प्रत्येक घरचा गणपती हा विकेंद्रीत पध्दतीने विसर्जन होते.

3. पर्यावरणपूरक विसर्जन

सामग्रीची ओळखः गणेश विसर्जनात Ganesh Visarjan अनेक पदार्थाचा वापर केला जातो. त्यात फळं, फुलं, निर्माल्या, अगरबत्ती, देवांदिवाकांच्या प्रतिमा, काचा, बांगड्या, तेलाच्या पिशव्या, अलंकार, प्लास्टिक वस्तू.. असे अनेक गोष्टी असतात. अशा अनेक गोष्टींची यादी केली तर ति जवळपास २५० होते.

4. माझा अनुभवः

  • गच्चीवरची बाग या उपक्रमाचे काम सुरू झाले तेव्हां बागा फुलवण्यासाठी नारळाच्या शेंड्याची खूप गरज पडत असे. त्या वेळोवेळी मंदीरात, उत्सवा दरम्यान मिळत असे. पण त्याची वार्षिक एकदाच संग्रह करून ठेवण्याचा विचार होता. म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी मी व माझ्या टीमने ७ ट्रॉली नारळ शेंड्या गोळ्या केल्या होत्या. त्याचे स्थानिक प्रशासनाकडूनही कौतुक झाले होते. या शेंड्याचा वापर आम्ही टेरेसवर बागा फुलवण्यासाठी केल्या. अर्थात या साठी आम्ही गोणी प्रमाणे त्या नारळाच्या शेंड्या विकल्या सुध्दा. थोडी फार चांगली असलेली नारळ आम्ही आमच्या गायील खायला दिली तर काही खराब नारळ हे कंपोस्ट म्हणून खतात टाकली.

5. पर्यावरण पुरक वर्गीकरण

  • इतर संस्थाचे उपक्रमः नाशिक मधे निर्मल ग्राम निर्माण केंद्र आहे. ते कचरा व्यवस्थापनावर काम करतात. प्रशासनाशी बोलून त्यांनी गणेश विसर्जनाचे Ganesh Visarjan केंद्र तेथेच तयार केले. तर त्यांच्याकडे खूप काही कचरा गोळा झाला. पर्यावणप्रेमी नाशिककरांना आवाहन करून तो कचरा वर्गीकरण करण्यात आला. त्यात २५० प्रकारापेक्षाही चांगल्या अवस्थेतील वस्तूंचे , खाद्य पदार्थाची यादी तयार झाली. नारळ, खोबर्याच्या वाट्या, काजू, पिस्ता, बदाम, फळं, हे चांगल्या बॅगेत पॅक करून कचर्यात ( देवाला वाहून दिलेले) आढळले.
Gardening courses

6. आवाहन

  • तर वरील लेखाचा सारांश असा की किती तरी गोष्टी देवाला आपण वाहून देतो. श्रध्देच्या नावाखाली आपण जे उघड सत्य आहे त्याकडे डोळे झाक पणा करतो. सामुहिक पणे झाडांची कत्तल करावी तशी पर्यावरणाची कत्तल करतो . तेव्हां आपण प्रत्येकांने आपआपल्या पातळीवर छोटे छोटे प्रयत्न केले तर आपण पर्यावरणाची फार मोठी हानी वाचवू शकतो. तेव्हां गणेश विसर्जन Ganesh Visarjan हे घरो घरी झाले पाहिजे. आपला गणपती, आपली जबाबदारी… हे तत्व पाळले पाहिजे.

7. इतर लेख वाचा…

 8. विविध विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

Ganesh Visarjan, Eco-Friendly Ganesh Visarjan, Ganesh Festival, Environmental Protection, Sustainable Celebrations, Ganesh Idol, Waste Management, Eco-Friendly Practices. Ganesh Festival Tips, Green Ganesh Visarjan. #GaneshVisarjan, #EcoFriendlyGanesh, #GaneshFestival, #EnvironmentalProtection, #SustainableCelebrations, #GaneshIdol, #WasteManagement, #EcoFriendlyPractices, #GaneshFestivalTips, #GreenGaneshVisarjan. गणेश विसर्जन, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, गणेशोत्सव. पर्यावरण संरक्षण, शाश्वत उत्सव, गणेश मूर्ती, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक पद्धती, गणेशोत्सव टिप्स, हरित गणेश विसर्जन. Hashtags: #गणेशविसर्जन, #पर्यावरणपूरकगणेश, #गणेशोत्सव, #पर्यावरणसंरक्षण, #शाश्वतउत्सव, #गणेशमूर्ती, #कचऱाव्यवस्थापन, #पर्यावरणपूरकउत्सव, #गणेशोत्सवटिप्स, #हरितगणेशविसर्जन


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants