Gardening Scissors 2025: Which Type Is Right for You?
बागकामासाठी सर्वोत्तम कात्री Gardening Scissors निवडण्याचे महत्त्वाचे टिप्स
विविध प्रकारच्या कात्रींचे Gardening Scissors वैशिष्ट्ये आणि त्यांचे उपयोग जाणून घ्या, ज्यामुळे तुमच्या बागकामाचे काम सोपे होईल.
बागकाम म्हटलं की झाडांच्या फांद्या, मुळ्यां कट करणे, कापून टाकण्यासाठी विविध गार्डेन कैची, कात्रीचा उपयोग केला जातो. खरं तर अनेक प्रकारच्या बागकामसाठी अनेक प्रकारच्या Gardening Scissors कात्र्या, कैच्या बाजारात उपलब्ध आहेत. पण योग्य पणे कोणत्या कैचीची निवड करावी याचा नेहमी बागप्रेमींचां गोंधळ उडतो. कारण कैच्यांची अवाजवी किंमती. शिवाय नक्की कोणत्या कैचीचा कोणता उपयोग कसा व कधी करायचा या विषयी असलेले अज्ञान… तसेच त्याचा उपयोग नाही झाला तर विकत आणलली वस्तू, त्यावरील खर्च हा वाया जातो. तर तसे होऊ नये म्हणून काय करावे.
Table of Contents

1. कात्रीचे महत्व
- बागकामात कात्रीचा उपयोगः बागकामात अगदी छोट्या पासून मोठ मोठ्या कामांपर्यंत Gardening Scissors कात्रीचा उपयोग करावा लागतो. अगदी कुंड्यामधील झांडाचे रिपॉटींग करतांना मुळ्यांची कापणी करणे गरजेचे असते. तर अगदी नाजूक काम म्हणजे कलम करण्यासाठी फांदीचा योग्य तो काप घेतांना आपल्याला परफेक्शन साधने गरजेचं असते. कारण प्रत्येक फांदीत पुर्नजिवन दडलेलं असत. अशा वेळेस तेथे जंतूचा प्रादुर्भाव किंवा फांदीची काटछाट ही एका विशिष्ट पध्दतीत होणं गरजेचं आहे.
- विविध प्रकारची कात्री आणि त्यांचे फायदे: कात्रीचे विविध प्रकार असतात. जसे की फुलकाढणीसाठी, फांद्याच्या विविध आकारानुसार तसेच हातात बसतील किंवा पकडता येतीलअशा विविध पकडीच्या कात्र्या असातात.
- कात्रीची देखभाल आणि त्याचे महत्त्वः बरेचदा काम झालं की कात्र्या या कशाही व कुठेही पडलेल्या असतात. तर कात्री ही संवेदनशिल साधन आहे. त्या कुठे मातीच्या, पाण्याच्या संपर्कात आल्या तर त्यांच धारधार पात हे बोथट अथवा गंजत. शिवाय जेथे दोन पात्यांना एकत्र नटाने फिट केलेले असते. त्यात माती व पाणी जाते. पर्यायाने जेवढ्या सहजतेने त्याची हालचाल हवी असते ति होत नाही. तसेच काही Gardening Scissors कैच्यांना स्प्रिंग्स लावलेल्या असतात. त्यांना योग्य ति काळजी घेतली नाही तर ते पण सुरळीतपणे काम करत नाहीत. यासाठी नेहमी कैची, कात्र्या या प्रथम पाण्याने स्वच्छ धुवाव्यात. कात्री उभी करून त्यातील पाणी नितरून घ्यावे व नंतर रॉकेल पाणी यांचे वंगन लावावे. ऑईल किंवा ग्रीस लावू नये. ये पदार्थ पुन्हा धुळ आकर्षित करतात. व ये रे माझ्या मागल्या प्रमाणे कैच्या या खराब होतात.

2. कात्रीचे प्रकार
- वापरानुसार: बागकाम कशा प्रकारचे करत आहोत यांच्या वापरानुसार सुध्दा, Gardening Scissors कैचीचे विविध प्रकार असतात. कारण प्रत्येकाचा उद्देश हा वेगळा असतो. हा उद्देश कामाचा वेग, फांद्याची जाडी, कंपनीचे विविध प्रकारचे डिझाईन्स चा विचार केलेला असतो. तसेच काही कैचीचा प्रकार हा उपयोगा पेक्षा बागकामाची आवड वाढवणारे, अर्थात आकर्षक डिझाईनचाही विचार केलेला असतो.
- फुलांची कात्रीः फुलं हे नाजूक असतात. त्यांच्या फांद्या किंवा देठं ही सुध्दा नाजूक व चिवट असतात. त्यामुळे हातात बसेन व सहजनतेने वापरता येणारी गार्डेनि कैचीचा उपयोग करावा.
- झाडांची कात्रीः बागेतील रोपांच्या विविध रोपांची छाटणी करावी लागते. त्यासाठी आगकाडीच्या आकाराच्या फांदीपासून तर बोटाच्या जाडीपर्यंत तर अगदी दोन बोटाच्या जाडी पर्यंत फांद्या कापण्याची गरज असते. त्यानुसार कैचीचा उद्देश लक्षात घेवून खरेदी करावी.
- झाडांना आकार देणार्या विविध प्रकारच्या कात्री उपलब्ध आहेत. हेजिंग अर्थात कंपाऊड लागवड केलेल्या किंवा एकाद्या भरपूर फॉलीएज असलेल्या झांडाना आकार देण्यासाठी या कैचीचा वापर करण्यात येतो. सहसा हि कैची बागकाम सर्व्हिस देणारी मंडळी वापरतात.
3. उत्तम कात्रीची निवड कशी करावी
- आवश्यकतेनुसार निवड:
- स्टीलचे प्रकारः बागकामाच्या Gardening Scissors कैच्या या स्टिल पासून तयार केल्या जातात. किंवा जेथे धारदार पात असतं असे पार्टस हे स्टील पासून बनवले जातात. किंवा त्यावर त्या प्रक्रिया लेप दिलेला असतो. कारण बागकामात पाण्याचा संपर्क लोखडांशी आला तर त्या गंजतात. व पात गंजले की ते काम करत नाही. जसे की दाढीसाठी वापरले जाणारे ब्लेड हे स्टिल पासूनच बनवले जाते.
- हँडलचा आरामदायकपणा महत्वाचा आहे. कैची Gardening Scissors घेण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश हा बागकाम असतो. तरी ते करतांना हातात त्याची योग्य प्रकारे पकड असणं गरजेचं आहे. जर या कैचीची हातात पकडच बसत नसेल तर त्याचा मुळ उद्देश वाया जातो.
- कात्रीची गुणवत्ता आणि टिकावूपणा लक्षात घेणं गरजेचं आहे. कैचीसाठी वापरले जाणारे साहित्य कोणते आहे. कोणत्या प्रतिचे आहे याचीही विचार करणं गरजेचं ठरतं. याच्या विविधतेनुसारच कैचीच्या किमती ठरत असतात. अगदी 100 रू. पासून तर अगदी 1200 रूपयापर्यंत याच्या किमती असतात.
4. कात्रीचा योग्य वापर आणि देखभाल
- सुरक्षिततेसाठी पुढील प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. यात Gardening Scissors कैची हाताळतानां घाईगडबड करू नये. जर योग्य काळजी नाही घेतली तर तिच्यापासून आपल्याला इजा होऊ शकते. तसचे वरून पडल्यास तिचे तुकडे होऊ शकतात.
- कात्री धारदार ठेवणे. प्रत्येक बागकामाच्या आधी कैचीला ठराविक दिवसांनतर धार लावणे गरजेचं आहे. धार लावण्यासाठी विविध प्रकारच्या कानसी हार्डवेअरच्या दुकानात मिळतात. त्याचा तुम्ही वापर करू शकता.
- कात्रीची स्वच्छता करणे गरजेचं आहे. बागकाम झाल्यावर लगेचचं Gardening Scissors पाण्याने धुवून घ्यावी. त्यातंर त्याचेपाणी स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. जेथे कैची फंक्शन होते त्याठिकाणी खोबरेलतेल व रॉकेल चे मिश्त्रण, किंवा मशीन ऑईल वापरावे. खराब ऑईल वापरू नये.
- पिढीच्या टिप्स आणि सल्ला: कात्री ही कधीही ऑनलाईन मागवू नये. प्रत्यक्ष दुकानात जावूनच आपला उद्देश, उपयोग व आपल्या हातात बसतील यानुसारच कात्र्या विकत घ्याव्यात. म्हणजे त्याचा वापर निरतंर करता येतो.
5. गार्डेनिंग कोर्सस उपलब्ध आहेत.
- गच्चीवरची बाग अर्थात ग्रो ऑरगॅनिक व्दारा बागकामाविषयी विविध ऑनलाईन कोर्सेसचे आयोजन केले जाते. टेरेस गार्डेन कोर्स, किचन गार्डन कोर्स, विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स, हॅंगीग गार्डन कोर्स, फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स, फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स, ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
- विविध विषयावरील लेख टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन.
6. इतर लेख वाचा…
- एग्रीकल्चरिस्ट आकांक्षा कांबळे यांचा गणेश उत्सवावरील इको फेंडली गणेश फेस्टिव्हल लेख. इंस्टाग्राम पेज @ecohub_by_Akanksha
- ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण यांचा गणेश उत्सवावरील 10 डेज गाईड लेख इंस्टाग्राम पेज @gacchivarchi_baug
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
- Do You Know This Plant?
- Seeds did you recognize?
Keywords: Gardening Scissors, Best Gardening Scissors, बागकाम कात्री, कात्री निवड, Garden Tools. बागकाम साधने, कात्रीची देखभाल, कात्रीची धार, Best Scissors for Gardening, Scissors for Plants, बागेतील कात्री, कात्रीची योग्य निवड. Hashtags: #GardeningScissors, #BestGardeningTools, #GardenTools, #ScissorsForPlants, #बागकाम, #कात्री, #बागकामकात्री, #GardeningEssentials, #GardenCare, #PlantLovers, #GardeningTips, #OrganicGardening, #बागकामसाधने.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.