Home Environment Quality ?

83 / 100 SEO Score

Why Your Home’s Atmosphere Is Draining Your Peace

Crave a Healthier Home Environment?

घराचे वातावरण बदलायचे आहे?

घराच्या वातावरणाची गुणवत्ता कशी सुधाराल?

घराचे वातावरण शांत, प्रसन्न आणि निरोगी ठेवण्यासाठी दर्जेदार उपाययोजना आवश्यक आहेत. ‘Home Environment Quality’ सुधारल्यास मानसिक शांती मिळेल. Home Environment Quality हा विषय महत्त्वाचा आहे कारण घरातील वातावरणातील गुणवत्ता थेट आपली शांती आणि आरोग्यावर परिणाम करते. लेखात घरातील विविध बाबींची गुणवत्ता का महत्त्वाची आहे. याची चर्चा केली आहे, आणि ही गुणवत्ता कशी सुधारता येईल यावर उपाय दिले आहेत.

Home Environment Quality

आपलं घर आणि आपण

घर कोणाला नको असतं का ? प्रत्येकाला आपलं स्वतःचं सुंदर घर हवं असतं. आपण प्रत्येक जण काम करून दमलेल्या मनाला व शरिलाला शांतता मिळवण्यासाठी कुठे येतो तर आपल्या घरी. परंतु घरी आल्यावर जर आपल्याला प्रसन्न वाटत नसेल तर आपण त्याचे कारण नक्की शोधतो. आपल्याच घरात आपल्याला प्रसन्न न वाटण्याचे प्रमुख कारण म्हणजे घरातील ‘वातावरण’. ‘वातावरण’ म्हटले म्हणजे त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. घरातील वातावरण Home Environment Quality आणि त्याची मानसिक आरोग्यावरील सकारात्मक परिणाम होतच असतो.

घराचे वातावरण आणि त्याचे महत्त्व

घरातील लोकांचे आपापसातील नाते व संवाद. घरात जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि सोयीसुविधा.
घराची रचना, घरात उपलब्ध असलेली जागा, आणि घरात येणारा उजेड हवा हे सुद्धा. घरातील वातावरण प्रसन्न राहायचे असेल तर या सर्व गोष्टी क्वालिटीच्या म्हणजेच गुणवत्तेच्या असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हीच या सांगितलेल्या गोष्टींना गुणवत्तेच्या कसोट्या लावून बघा तुम्हालाच उत्तर मिळेल की खरंच या प्रत्येक गोष्टीसाठी ‘गुणवत्ता’ Home Environment Quality ही किती महत्त्वाचीआहे. घरातील वातावरण बिघडण्याची प्रमुख कारणे आणि त्यांच्या परिणामांची जवळचा संबध आहे.

दर्जेदार घर व घराला घरपण कसे निर्माण करावे

घरातील लोकांचे आपापसातील नाते वितुष्टाचे असेल तर चालेल का? घरात खायला पुरेसे अन्न नसेल तर चालेल का ?
घरात पिण्यासाठी पाण्याची सोय नसेल तर चालेल का ? दहा लोकांसाठी दहा बाय दहाची एक खोली चालेल का ?
घराला एकही खिडकी नसेल तर चालेल का ? आणि हो खायला पुरेसे अण्णा आहे परंतु ते बुरशी लागलेले आहे चालेल का ?
घरात प्यायला पाणी आहे परंतु ते दूषित आहे चालेल का ? घरात शौचालय आहे परंतु त्याला दरवाजाच नाही चालेल का ?
घर खूप मोठे आहे पण त्याला छप्परच नाही चालेल का ? म्हणजेच काय तर वरील सर्व गोष्टी जेव्हा दर्जेदार असतील पुरेशा असतील तर आपल्याला घरात शांत झोप येईल. थोडक्यात घरातील नाते, जागा, रचना आणि इतर घटकांची परस्परावलंबीत गुणवत्ता सुधारण्याचे धागे असतात.

Home Environment Quality

पृथ्वीवरील वातावरण बदलाचे परिणाम

थोडा वेळ असा विचार करा आपल्या सर्व जीवांचे घर म्हणजे ही पृथ्वी मानली जाते. आज या पृथ्वीवरचे वातावरण असे आहे का की ज्यामुळे आपल्याला आपल्याच या घरात आज शांतपणे झोप येऊ शकेल ? आज पृथ्वीवरच्या ज्या सोयीसुविधा निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि आपण सो कॉल्ड बुद्धिमान मानव म्हणून ज्या सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या खरोखरच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेत का? की त्यांचा दर्जा एवढा घसरलेला आहे की पृथ्वीवरचे वातावरण Home Environment Quality अत्यंत दर्जाहीन आणि गुणवत्ताहीन झालेले आहे ? हे खरं आहे का ? की , आज झाडाखाली शांतपणे झोपून मी जी हवा नाका, तोंडात, पोटात, शरीरात घेतो ती शुद्ध नाही ? मी जे पाणी पितो ते दूषित आहे ? मी जे अन्न खातो त्यात घातक रसायन आहे ? थोडक्यात घराच्या बाहेरील वातावरणाचा घरातील वातावरणावर Home Environment Quality होणारा परिणाम आणि हवामान बदलाचे परिणाम सुक्ष्मपणे होत असतात. आणि ते दिर्घकालानंतर जाणवू लागतात. जसे की कर्करोगाची लक्षणे ही शेवटच्या टप्प्यात दिसू लागतात. पण तो पर्यंत वेळ ही गेलेली असते.

घरातील व बाहेरच्या वातावरणातील सुधारणा उपाययोजना

अगदी कोणत्याही प्रकारचा रिसर्च न करता आज प्रत्येकजण हे सांगू शकतो की आज माझ्या सभोवतालची हवा , पाणी , माती, पिकत असलेले अन्न ,फळे या सर्व गोष्टी घातक रसायनांनी भरलेल्या आहेत. आता पुन्हा नवीन रिसर्च करण्याची तशी गरज नाही. रिसर्च भरपूर झाला आता यातून जी शिकवण मिळालेली आहे. खरी गरज आहे आता व ताबडतोब त्यानुसार प्रत्येकाने कृती करण्याची अत्यंत गरज आहे. नाहीतर आपल्याच या पृथ्वी रुपी घराला आपण राहण्याला ठेवणार नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्याच घराची खूप काळजी आहे. स्वतःच्या घराची काळजी करणे काही गैर नाही. परंतु आपले स्वतःचे घर तेव्हाच राहील ना जेव्हा पृथ्वी राहील. हे कटू आहे परंतु सत्य आहे.

आपण नुकतेच बघितले या पावसाळ्यात जगातील कित्येक देशांमध्ये भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेकडो लोकांना आपली घरे सोडावी लागली. किती वाईट वाटले असेल बरं त्यांना. त्या घरातील म्हातारी माणसे लहान मुले, नोकरी व्यवसाय करणारे स्त्रि ,पुरुष सर्वांनाच ते घर सोडून इतर ठिकाणी जावे लागले. कारण एकच बोलले जात आहे पृथ्वीवरील ‘वातावरण बदल’. Home Environment Quality सध्या एवढेच . आता पुढे बघूया काय बरं हे वातावरण बदल ? आणि कोणी केले हे वातावरण बदल? हे थांबवता येणे शक्य नाही का? – संबंध विकास सामाजिक संस्था. महाराष्ट्र. (संस्था मानवी वर्तन व कार्बन फूट प्रिंन्ट या विषयावर काम करते)

A. बागकाम विषयावरील लेखः

Free Gardening Courses

B. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

Home Environment, Healthy Home, Atmosphere Quality, घर वातावरण, निसर्ग, मानसिक शांती, आरोग्य, Natural Living, Positive Home Vibes, Gardening Solutions, #HomeVibes, #HealthyHome, #PeacefulLiving, #निसर्ग

Vegetables Seeds

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

War n Climate change (HIndi) Save Earth (hindi) Earth is like ( Hindi) Save Earth (English)
10 OxyGen Plants