रोजच्या चहाच्या खर्चात गार्डेनिंग कोर्स
चहा खर्चिक पण शिकणं ही गुंतवणूक
नमस्कार गार्डन लव्हर्स
आजचे जिवन धकाधकीचे झाले आहे. विरूगंळ्यासाठी विविध शितपेय, पारंपरिक पेय ही वापरली जात आहेत. या पेयातीलच चहा हे आपल्या सर्वांचे आवडते पेय, खरं तर आपल्याकडे प्रवास करून आल्यानंतर किंवा मेहनतीच्या कामादरम्यान गुळ पाणी, नारळपाणी, ताकपाणी, चिचेचं पन्ह पिलं जायचं. पण इंग्रजानी व पाश्चिमात्य संस्कतीने ये पेय आपल्या सर्वांच्या गळी उतरवतलं. असो. थोडक्यात चहा पिणं वाईटच आहे. त्यात वापरलं जाणारं दूध, साखर व चहापत्ती सुध्दा ही रसायनं टाकून पिकवली वा तयार केली जाते. चहा हा विषाचा घोट आहे जो आपण रोज पितोय. आपल्या संस्कृतीत यास अनेक पर्याय होते. त्यातीलच एक म्हणजे काढा पिणं होय. हे काढे विविध वनस्पतीचे तयार केले जात असत. उदाः पुदीना, गवतीचहा, लिंबूच्या पानांचा चहा, अडूळसा, ओव्याची पाने, शिवाय यात सरबत पण अनेक प्रकारचे होते. जसे उसाचा रस, चिंचेचं पन्ह, लिबू सरबत, गोकर्णचे सरबत, असे अनेक प्रकार होते. पण कालांतराने ते नाहीसे झालेत. पण यास आपण नक्कीच पुर्नजिवत करू शकतो. ते पण आपल्याबागेत. उपलब्ध जागेत, उपलब्ध साधनांत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनाात ही बाग फुलवता येते. त्यामुळे आपल्याला आरोग्य संपन्नता तर लाभेलच पण शिवाय त्यातून आयुष्यमान पण वाढेल. थोडक्यात रोजच्या विषारी घोटावर १० ते १५ रूपये खर्च करून ( ते ही एकदा नवे तर वारंवार) शरिर व मेंदूला किक बसण्यासाठी चहा पिण्यापेक्षा ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स शिकला तर नक्कीच तर तो आयुष्यभरासाठी उपयोगी होईल त्याचाच हिशोब मी वरच्या पोस्टमधे मांडला आहे. नक्कीच विचार करा व कोर्सचा एक्केस मिळवा. संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व ग्रीन बिझनेस कोच.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.