गच्चीवरची बाग,‌नाशिक द्वारे घरच्या घरी भाजीपाला उगवण्या संदर्भात कन्सल्टन्सी – मार्गदर्शन सेवा पुरवली जाते. हे म्हणजे आपल्या कुटुंबासाठी एक मार्गदर्शन वर्गच असतो. घरच्या घरी भाजीपाला कसा उगवावा याबद्दल consultancy तर असतेच तसेच बरीच काही माहिती, ज्ञान, अनुभव, तंत्र व मंत्र  देण्याचा प्रयत्न असतो. Consultancy कन्सल्टन्सी ही सेवा भाजीपाला उत्मापादनाच्या मार्गदर्शनाबरोबर आपल्या  बागे संदर्भात प्रश्न उत्तर, शंका निरसण, घर, बंगला सभोवतालची झाडे, त्यांची वाढ, त्यांना लागणारे खतपाणी, त्यांना आवश्यक ऊन, भविष्यातील वाढ, कचरा व्यवस्थापनाच्या पध्दती ( कंपोस्टींग) या सगळ्यांबद्दल मार्गदर्शन केलं जातं. त्याविषयीचे माहिती तंत्र,विज्ञान समजून सांगितले जाते.

या साऱ्या मार्गदर्शनाला साधारणतः दिड ते दोन तास लागतात. ही सेवा म्हणजे आपल्या कुटुंबासाठी छोटे वर्कशॉपच असते. यात आपण व आपल्या कुटुंब तसेच नातेवाईक मित्र-मैत्रिणी, माळी काम करणारी व्यक्ती यांचा समावेश करू शकतात. आपल्या बागेला परिसराला नियोजित जागेला भेट देऊन यात आपल्याला योग्य तो सल्ला दिला जातो. तसेच आमच्याकडून बाग डेवलपमेंट करून घ्यावयाचे असल्यास त्याविषयी अंदाजपत्रके दिले जाते ही सेवा फक्त नाशिक या शहरापुरतेच मर्यादित आहे. त्यासाठी रुपये 3500/- शुल्क आकारले जाते.

Consultancy का गरजेची?

Consultancy visit मधे आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन केले जाते. अनुभवातून मिळालेले शिकवणं, माहिती, ज्ञान, बारकावे सांगण्याचा प्रयत्न असतो. या विषयाची माझी सुरुवात शुन्यापासून होती. गेल्या बारा वर्षांत जे काही शिकलो ते सांगण्याचा प्रयत्न असतो. Consultancy मुळे आपला वेळ व अनावश्यक खर्च होणारा पैसा, वैताग वाचवला जातो.

http://www.gacchivarchibaug.in  Telegram/ WTS app 9850569644