Quick Tips for Gardening in पावसाळ्यात बागेची काळजी कशी घ्याल
बाग म्हटली की जिव्हाळ्यााच मुद्दा . त्यात बाग फुलवण्याची हौस म्हणा किंवा खाज ति घरातल्या एकालाच असते. कशाला नुसते उपद्याव म्हणून घरचे डिमोटिवेट करत असले तरी आपण हिंमत सोडायची नाही. बागेची काळजी ही वेगवेगळ्या पध्दतीने घेणं गरजेचं असते. या काळजीचे स्वरूप प्रत्येक सिझनला हे बदल असते. यातील काही क्विक टिप्स तुमच्यासाठी देत आहे. आवडल्यातर लाईक करा. शेअर करा.
- पाणी साठू देवू नका, त्याला वाहते करा.
- टेरेसवर किंवा जमिनीवर बाग असल्यास सावध पणे चाला
- कामं करतांना घाई करू नका
- विंडो, टेरेस, जमिनीवरील बागेची वेळोवेळी स्वच्छता करा
- आपल्याला मेहनीतीचे कामं जमत नसल्यास इतरांची मदत घ्या.
- बागेतील पिवळी पानं काढून टाका.
- कुंड्यामधे पाणी साठत असल्यास त्यास आडवी करून पाणी ड्रेन करा.
- वेलवर्गीय असल्यास त्यांना योग्य दिशा द्या.
- टेरेस गळत असल्यास त्यात डॉ. फिक्सईट द्रावण्याचा वापर करा.
- गोगलगायी दिसल्यास लगेचच नियंत्रणाचे उपाय करा
- किड कोणती आहे त्याचा बंदोबस्त करा
- पक्षी निवासाला, पिल्लांना जन्म देण्यास आली असल्यास त्यांच्या पासून दूर रहा.
- रोपं, बिया कशी वाढतातहेत त्याचे निरिक्षण करा.
- कुंड्यावर झाडांवर बदाबदा पाणी पडणा नाही याची काळजी घ्या. त्यांची जागा बदलवा
- मावा, रसशोशक किडींचा लगेच बंदोबस्त लावा
- वेळोवेळी निमार्क, देशी गायीच्या गोमुत्राची फवारणी करा
- होम कंपोस्टींग करत असल्यास निरिक्षण करा. योग्य उपाय करा.
- अधिक माहिती असल्यास आमच्या वेबसाईटला व्हिजीट करा.
- आमच्या संपर्कात रहा. आमच्या विविध सोशल मिडीयाच्या हॅंडल्सला फॉलो करा व शिकत रहा.
- संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक मेन्टॉर, कन्संलटंट व कोच

- + बागेतील मेहनीतीचे कामं तुम्ही एकटेच करत आहात?
- + एकट्यानेच तुम्ही डोकं लावून लावून बागकाम करत आहात?
- + मग तुम्ही बागेचा आनंद कधी घेता?
- + विचार करा. तुमची ही कामं वाटून घेता आली तर?
- + बागकाम कसं करायचं हे अनुभवी व्यक्तिकडून शिकलात तर?
- + तुमच्या रोजच्या कामात छोट्या छोट्या टिप्स मिळाल्या तर ?
- तर त्यासाठी आम्ही तुम्हाला 24 x 7 मार्गदर्शन करतो.

Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.