The Importance of Organic Home Gardening on Environment Day

60 / 100 SEO Score

Organic Home Garden: Celebrate Environment Day with Sustainable Farming

Environment Day Special: The Benefits of Organic Home Gardening

How to Start an Organic Home Garden for a Greener Tomorrow

Environment Day: Boosting Biodiversity with Organic Home Garden

पर्यावरण दिनानिमित्त सेंद्रिय होम गार्डनचे महत्त्व

आज पर्यावरण दिन. पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे, त्यात स्वतःने, कुटुंबाने योगदान देणे गरजेचं आहे. या दिवसाच्या निमित्ताने अनेक पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात. सर्वांनाच फार मोठे मोठे उपक्रम शक्य नसते. अशा वेळेस आपल्याकडे उपलब्ध वेळ, संसाधनाचा विचार करून पर्यावरणीय उपक्रम राबवू शकतो. यात प्रथम क्रमांकावर येते ते म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूच्या उपलब्ध जागेत बाग फुलवणे, तसेच जमीनीत परसबागेत सेंद्रिय शेती करणे ही एक उत्तम पद्धत आहे. सेंद्रिय होम गार्डन केवळ आरोग्यदायी फळे आणि भाज्या पुरवतेच, परंतु त्याचबरोबर पर्यावरणाच्या रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण योगदान देता येते.

सेंद्रिय होम गार्डनचे फायदे:

  1. रासायनिक खतांचा वापर टाळा: सेंद्रिय पध्दतीने बागकाम, परसबाग व शेती करतांना रासायनिक खतांचा वापर होत नाही. यामुळे मातीचे आणि पाण्याचे प्रदूषण होत नाही थोडक्यात संवर्धन होते. नैसर्गिक खतांचा वापर केल्यामुळे जमीन सुपीक होते आणि पिकांची गुणवत्ता सुधारते. तसेच यातून सर्वांचेंच आरोग्य सुधारते.
  2. जैवविविधता वाढवा: सेंद्रिय पध्दतीने गार्डन फुलवण्यामुळे विविध प्रकारच्या वनस्पती आणि कीटकांचे संवर्धन होते. हे जैवविविधतेला चालना देते, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. थोडक्यात एक प्रकारे इकोसिस्टिम तयार होते.
  3. पाण्याची बचत: सेंद्रिय पध्दतीत पाण्याचा कमीत कमी वापर होतो. ज्यामुळे पाण्याची बचत होते. पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळे भूजल पातळीही राखली जाते.
  4. कार्बन पदचिन्ह ( फूट प्रिन्ट) कमी करा: सेंद्रिय गार्डनमुळे आपल्या घरातील कार्बन पदचिन्ह कमी होते. रासायनिक खतांच्या उत्पादनात कार्बन उत्सर्जन जास्त प्रमाणात होते, ते सेंद्रिय पध्दतीत टाळता येते.
  5. आरोग्यदायी आहार: सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या भाज्या आणि फळे आरोग्यदायी असतात. शिवाय त्यात कोणत्याही प्रकारचे रसायन नसल्यामुळे भाज्या व फळे चविष्ठ लागतात. तसेच पोषण मुल्य अधिक असल्यामुळे आरोग्य चांगले राहते.

सेंद्रिय होम गार्डन कसे सुरू करावे:

  1. योग्य स्थान निवडा: आपल्या घर परिसरात , उपलब्ध जागेत. जमीनीत परसबागेत किंवा गच्चीवर सेंद्रिय गार्डन सुरू करता येते. तिथे भरपूर सूर्यप्रकाश येतो हे पाहा. शिवाय उपलब्ध सुर्यप्रकाशानुसार झाडांची निवड करता येते.
  2. मातीची तयारी करा: जैविक खतांचा वापर करून मातीची तयारी करता येते. कंपोस्ट, गांडूळ खत आणि सेंद्रिय खतांचा वापर करता येतो. तसेच जैविक पध्दतीने द्राव्य खत तयार करता येतात.
  3. बीजांची निवड: सेंद्रिय बीजांची अर्थात चांगल्या बियाणांची निवड करा. स्थानिक आणि हंगामी भाज्या आणि फळांची निवड करता येते.
  4. नियमित देखभाल: बाग म्हटली की त्याची देखभाल आली. त्यात पाण्याचे योग्य व्यवस्थापन, वेळोवेळी तण काढणे, आणि नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून गार्डनची देखभाल करता येते.
  5. कचऱ्याचे पुनर्वापर: आपल्या घरातील ओला कचरा, जैविक कचरा थोडक्यात फळांची साल, भाज्यांचे तुकडे इत्यादींचा वापर होम कंपोस्ट तयार करण्यासाठी करता येतो. त्यातून आपल्यालाल चांगल्या प्रकारचे खत तयार होते. शिवाय पैसे ही वाचतात.

निष्कर्ष:

पर्यावरण दिनानिमित्त सेंद्रिय होम गार्डन सुरू करणे ही एक प्रेरणादायी कृती आहे. यातून आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी योगदान देऊ शकतो. आपल्या घरच्या घरी उगवलेल्या सेंद्रिय भाज्या आणि फळे आपल्याला आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मदत करतात. चला, या पर्यावरण दिनी सेंद्रिय होम गार्डनची सुरुवात करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करूया.

Hashtags: #सेंद्रियशेती #पर्यावरणदिन #होमगार्डन #जैविककृषी #पर्यावरणसंरक्षण #OrganicGardening #EnvironmentDay #HomeGarden #SustainableFarming #EcoFriendlyLiving
लेखकः संदीप चव्हाण, गच्चीवरची बागः ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व कोच

फ्री ऑरगॅनिक व्हेजटेबल गार्डेनिंग कोर्स


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Ride on post Covide Effects importance Of Gardening (Hindi) Importance of Gardening (English) Earth is like (English)
10 OxyGen Plants