About Sandeep Chavan

25 / 100 SEO Score

Grow organic Mentor : Sandeep Chavan

Organic consultatnt : Sandeep Chavan

Sandeep Chavan : Gacchivarchi Baug

परिचय: नमस्कार! मी संदीप चव्हाण, ऑरगॅनिक पध्दतीने उपलब्ध जागेत, उपलब्ध साधनात, उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करत सेंद्रीय पध्दतीने फळं, फुलं, भाजापाला निर्मिती या विषयाचा सल्लागार आणि प्रशिक्षक आहे. मागील २३ वर्ष नाशिककरांना मी डोअर स्टेप ऑरगॅनिक पध्दतीने बाग फुलवण्यासंदर्भात सेवा व सुविधा पुरवण्याचा अनुभव आहे. सध्या मी भारतभरात हिंदी व मराठी भाषेत ऑनलाईन पध्दतीने बागकामाचे कोर्सचे आयोजन करत आहे.

पार्श्वभूमी: मी मास कम्यनिकेशन व जर्नालिझम या विषयात पदवीका संपादन केली आहे, तसेच नाशिक स्थित माध्यम संस्थेत प्रोजेक्ट हेड या पदापर्यंत पोहचत ग्रामिण व शहरी जनसमुदायातील विविध वयोगटातील लोकांसोबत काम केले आहे. मला माध्यमांविषयी विशेष आवड व रूची होती व आज सुध्दा आहे. पण मला निसर्गाचे कुतुहल होते. सुरवातीला सामाजिक व पर्यावरणीय संबधित कचरा व्यवस्थापनात विशेष रूची होती. लोकांनी माझा कचरा माझी जबाबदारी हे सुत्र पोहचवण्यासाठी विशेषतेने काम केले . त्यात लोकांचा हिरहिरीने सहभाग वाढवण्यासाठी कचर्याचा सृजनशिलतेने वापर करत विषमुक्त भाजापाला कसा फुलवावा, केमिकल फ्री बाग कशी फुलवावी याची गरज जाणवली व सन २००० पासून या विषय़ात विविध प्रयोग केले व त्यात यश मिळत गेले.

व्यवसायिक अनुभव: मी सध्या ऑनलाइन बागकाम कोर्सेस आयोजित करतो आहेत. मला डिजिटल मार्केटिंग मधे विशेष आवड आहे. तसेच मी सध्या Poaceae Lifedesigns या (सस्टेनेबल लाईफ साठी बांबू उत्पादन) कंपनीचे सोशल मिडीया मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ऑरगॅनिक गार्डेनिंग मधे मला गेल्या २३ वर्षाचा अनुभव आहे. याची व्यावसायिक रित्या अंमलबजावणी केली.

विशेषज्ञता: माझ्या तज्ज्ञतेच्या क्षेत्रात जैविक शेती, शहरी बागकाम, कचरा व्यवस्थापन, फार्महाऊस डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. मी सध्या गच्चीवरची बाग या उद्यम शिललेतेव्दारे चालवण्यात येणार्या ऑनलाईन कोर्सचा कोच म्हणून काम करत आहे तर ऑरगॅनिक ग्रीन बिझनेससाठी इच्छुकांसाठी मेन्टॉर व कंन्सलटंट म्हणून काम करत आहे. तसेच गच्चीवरची बाग अर्थात ग्रो ऑरगॅनिक चे डिजीटल मार्केटिंग स्वतःच करत आहे. आमच्या कोर्समधील विद्यार्थांना सुध्दा या विषयी प्रशिक्षित करत त्यांना ऑरगॅनिक उत्पादनांचे ऑरगॅनिक मार्केटिंग कसे करावे याचे धडे देत आहे.

युनिक सेलिंग प्रपोजिशन (USP): जैविक बागकामातील माझी अनोखी तंत्रे आणि पद्धती यामुळे मी इतरांपेक्षा वेगळा आहे. माझ्याकडे प्लॅन्टला होणारे आजार, त्याचे निदान व त्यावर ऑरगॅनिक पध्दतीने उपाय करणे यात मला २३ वर्षाचा अनुभव आहे. ही तंत्रे, ऑरगॅनिक भाजीपाला निर्मिती साठी, बागकाम सेवा देणारे अथवा बागकामाची आवड असणार्या व्यक्तिनी अंमलबली तर त्यात नक्कीच यश येते. माझा उपलब्धतेचा सृनजनशिलतेने वापर करणे हा मोटो आहे. तर मला झाडपाला म्हणजेच आयुर्वेदिक औषधांवर विश्वास असून त्याचा मी व माझ्या कुटुंबात जाणीव पूर्वक उपयोग करत असतो.

उपलब्धी आणि पुरस्कार: माझ्या विविध प्रकल्पांमुळे मला अनेक पुरस्कार, सन्मानपत्र, मान्यता मिळाल्या आहेत. (अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा) तसेच विविध दृकश्राव्य व छापिल माध्यमांमधे या विषयावर लेखन केले आहे तर वार्षिक सदर ही प्रकाशित झाली आहे. तसेच बागकामावर विविध ई पुस्तकं प्रकाशित झाली आहे. ( छापिल आवृत्या आता संपल्या आहेत)

तत्त्वज्ञान आणि दृष्टिकोन: माझे तत्त्वज्ञान आणि दृष्टीकोन म्हणजे टिकाऊ ( शाश्वत आणि नैसर्गिक पद्धतीने बागकाम, शेती करणे असा आहे. आपली जिवनशैली ही कचरा मुक्त असावी तसेच आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे त्यासाठी निसर्गाच्या सोबत राहणे, त्याची संगत करणे व मानव निर्मित कुत्रीम औषध न वापरता नैसर्गिक रित्या उगवलेल्याअन्न थोडक्यात औषध निर्मितीचे सेवन करणे व आपले व इतरांचे आयुष्य हे सुदृढ निरामय करणे हा माझा दृष्टीकोन आहे.

सध्याचे प्रकल्प आणि उद्दिष्टे: मी सध्या मेटा जाहिराती व इन्स्टाग्रामवर ऑरगॅनिक कोर्ससाठी ऑरगॅनिक पध्दतीने मार्केटिंग करत इच्छुक विद्यार्थांपर्यंत पोहचत आहे व ऑनलाईनकोर्ससाठी मेन्टॉर, कोच व कंन्संलटंट म्हणून कार्यरत आहे. माझी स्वतःची बाग आहे. त्याकडे सुध्दा लक्ष देत असून आठवड्याला चार भाज्यांचे सहजतेने उत्पादन घेत आहे.

समुदायातील सहभाग: मी विविध कार्यशाळा, वेबिनार, आणि ऑनलाइन सत्र आयोजित करतो आणि माझ्या कोर्स मेंबर्सशी मी नियमित सोशल मिडियाव्दारे ( ब्लॉग, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक, लिकिंड) संवाद साधतो. त्यांना बागकाम, कचरा व्यवस्थापन या विषयी माहिती देतो.

वैयक्तिक स्पर्श: माझे बागकामावरील अनुभव मी माझ्या विविध सोशल मिडीयावर पोस्ट करत असतो. सध्या अनेक रिल्स व पोस्ट व्हायरल होत आहे. या सर्वांना माझा वैयक्तिक दृष्टीकोन, मत याचा टच असतो जो खूप लोकांना भावतो. माझा भर मुख्यतः कमी खर्चातली पण उत्पादक बाग फुलवण्याचा म्हणजे निसर्ग कसं काम करतो हे समजून आपण त्या प्रमाणे कृती करण्याचा हेतू असतो.

संपर्क माहिती: माझ्या ब्लॉगची तुम्ही निशुल्क सदस्यता घ्या आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा. माझ्या कोर्सेस आणि सत्रांमध्ये सहभागी व्हा आणि सल्लामसलत घ्या.

🌱 *घरी, दारी, खिडकी, जमीन, गच्ची, शेत, शाळा व फार्महाऊसवर फुलवा*
*फळं, फुल, ऑरगॅनिक भाज्यां व औषधी वनस्पती व झाडं-वृक्ष* 🌱
🍀 तुमच्या आवडीला आजच रचनात्मक पध्दतीने शिकण्याची जोड द्या.
👉 *ते ही आजपासून वर्षभर चार ऑनलाईन फिचर्स सोबत
👉 भारतातला पहिला मराठी भाषेतला कोर्स
*सविस्तर माहितीसाठी*
➡️🔥 हॉट कोर्स फॉर कूल गार्डनिंग


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Organic Farming & Gardening Coach in India Importance of Home grown Hindi (Copy) War n Climate change (English)
10 OxyGen Plants