0 (96)

आपण जाणताच की गच्चीवरची हा एक पर्यावरण पुरक उपक्रम आहे.

गारबेज टू गार्डन अशी संकल्पना असून शहरातील वाढत्या कचर्यावर लोकसहभाग घेत कचरा व्यवस्थापनाचा हा सृजनशील उपाय आहे. कचरा व्यवस्थापनातून कमीत कमी खर्चात घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला कसा पिकवावा याची वैज्ञानिक तंत्र, मंत्र पुरवले जाते. ही संकल्पना नाशिकमधील जास्तीत जास्त लोकांपर्यत सोशल मिडीयाव्दारे पोहचवण्याचा प्रयत्न करतच आहे. तसेच सोशल मिडीयावर निशुल्क मार्गदर्शनही केले जाते.

यासाठी फेसबुक वर काही पेजेस बनवण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे

वरील पेजेसवरील पोस्टला आपण नेहमीच लाईक्स व शेअर करतात. आपल्या निरिक्षणात आले असेलच की या पेजेसवर आजपावतो कोणतीही खाजगी, कौटुंबिक पोस्ट, फोटो, किंवा राजकीय, धार्मिक, वादादीत प्रतिक्रिया जाणीव पूर्वक नोदंवली नाही. कारण पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, गारेबेज टू गार्डन या विषयावर लोकांना प्रेरीत करणे हाच उद्देश आहे.

आणि हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचणे आपल्याशिवाय अशक्य आहे. तेव्हा आपल्याला आवडलेली पोस्ट ही केवळ लाईक न करता जाणीव पूर्वक शेअरसुध्दा करावी ही विनंती.

www.gacchivarchibaug.in