Eco-Friendly Ganeshotsav 2024 : How to Celebrate Ganesh Festival Responsibly
Celebrate Ganeshotsav Responsibly : Eco-Friendly Ganesh Festival Tips
गणेशोत्सव साजरा कसा करावा : जबाबदारीने साजरा करण्याचे मार्ग
या लेखात, पर्यावरणपूरक Eco-Friendly गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उपयुक्त उपायांची चर्चा केली आहे. गणेशोत्सवातील प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर कसा करावा. त्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीस, शाडू मातीच्या मूर्ती ऐवजी जैवविघटनक्षम घटक वापरता येतील का ? ताज्या फुलांचे हार, आणि इतर गोष्टीचां वापर कसा करावा हे सांगितले आहे. तसेच, घरच्या घरी विसर्जन आणि सजावटीसाठी निसर्गस्नेही पर्यायांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘लहान सुरुवात, मोठा बदल’ या तत्त्वावर आधारित, हा लेख गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि जबाबदारीने साजरा करण्यास प्रेरणा देतो.- आकांक्षा कांबळे, एग्रीकल्चरिस्ट, मुबंई.
Table of Contents

1. प्रस्तावना (Introduction)
- आज सकाळीच घरी महानगरपालिकेतील कर्मचारी आले. त्यांनी स्वच्छता अभियान या मोहिमेचे सुका कचरा आणि ओला कचरा ह्या योजनेचे पालन करा असा संदेश देऊन गेले. त्याच वेळी माझा लक्षात आले कि गणपती बाप्पा चे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. जलोष उत्साह आणि आनंदी मंगलमय वातावरण सगळीकडे चालू होईल. पण पर्यावरणाच काय ?त्या निमित्त होणार्या प्रदूषणाचा काय? किती हि म्हटलं तरी अजूनही मोठ मोठ्या मुर्त्यांची आरास करतातच. आणि त्या सोबतच मग येते पर्यावरणावर प्रदूषणाची गदा, माणसांनी माणसांसाठी माणसासोबत एकत्र येऊन सण साजरे जरूर करावेत. पण प्रश्न पुन्हा तोच प्रदूषण आणि आणि पर्यावरणाच काय ? ह्या वर मला Eco-Friendly असा सुचला कि आपण खूप मोठी पाऊले उचल्यां आधी आपल्या घरातूनच Eco-Friendly उपाय करू शकतो. थोडक्यात गच्चीवरची बाग: ग्रो ऑरगॅनिक च्या ब्लॉग पोस्ट मधूनच छोट्या छोट्या पाउलांनी सुरवात करू या. चला तर मग बघू या !
2. गणपती बाप्पाचं आगमन करू, पण पर्यावरणाचं भानहि ठेवू !
- गणेश चतुर्थीचा सण म्हणजे भक्ती, आनंद आणि बाप्पाच्या स्वागताचा सोहळा. पण या उत्सवात, आपण आपलं पर्यावरण विसरत तर नाही ना? आजकाल गणपती उत्सवात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच थर्माकॉल किंवा अजून काही विशिष्ट गोष्टी ज्या पर्यावरणाला घातक आहेत अश्या गोष्टी काळत नकळत वापरल्या जातात. ज्यामुळे पर्यावरणाला मोठं नुकसान होतं. चला तर मग, यंदा गणपती बाप्पाचं स्वागत करताना, आपण काही Eco-Friendly छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेऊ या. ज्यामुळे आपला उत्सव अधिक पर्यावरणपूरक तर होईल. महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचा अनुभव शेअर करून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करू या. कारण गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर पण आहेच.

3. गणेशोत्सव आणि पर्यावरणाचे आव्हान (Ganeshotsav and Environmental Challenges)
- पर्यावरणाला हानी करणारे घटक: उत्सव असो की रोजचे जिवन जगणं असो. प्लास्टिकचा वापर वाढलेलाच आहे. उत्सावाच्या दरम्यान प्लॉस्टिकच्या वापराचा वेग वाढतो. त्यात सजावटीसाठी थर्माकॉलच्या, पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो, हा सर्वच कचरा कुजत नाही. किंवा कुजण्यास निसर्गाला हजारो वर्ष लागतात. मोठ्या मूर्त्यां विसर्जन करतांना होणाऱ्या जलप्रदूषणाबद्दल आपण काहीच Eco-Friendly कसा विचार करत नाही. असे अनेक घटक आहेत. तुम्ही साधी एक यादी बनवा. कोणते घटकं पर्यावरण पुरक आहेत. व कोणते घटक घाटक यावरून तुम्हाला याची गंभीरता जाणवेल. तुम्ही अशी यादी केल्यास नक्की आमच्या @gacchivarchi_baug या इंस्टाग्राम आयडी वर शेअर करा.

4. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महत्त्वाचे उपाय (Key Measures for an Eco-Friendly Ganeshotsav)
- १. प्लास्टिकच्या वापराचे मर्यादित करा: गणपती मंडप आणि घरांच्या सजावटीसाठी आपण प्लास्टिकच्या वस्तू वापरतो. यामुळे कचऱ्याचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागतो. प्लास्टिक किंवा थर्माकॉल च्या मखरांपेक्षा घरातल्या वस्तूंचा उपयोग करू शकतो. साफ सफाई करताना खूप सारे जुने न्यु पेपर असतात. त्या रद्दी कागदांचा लगदा बनवून सुद्धा सुबक असे गणपती मुर्ती बनवता येतात. तसेच बाप्पासाठी मखर किंवा आसन बनवून शकतो. हव्या त्या राईंग मध्ये आणि आकारामध्ये. ह्या मुळे तुमचे कौतुक हि होईल. प्लास्टिकच्या ऐवजी रद्दी कागदांचा वापर करून मखर बनवणे. या मुळे गणेश उत्सव हा Eco-Friendly साजरा करता येईल.
- २. शाडू मातीच्या मूर्तींची निवड: शक्यतो गणपती बापाची मूर्ती हि शाडू मातीची घ्यावी. पण खरी शाडू माती मुळात नसतेच. त्यात रसायनं मिळवून ही माती बनवली जाते. लोकांची दिशाभूल केली जाते. पण खर्या शाडू च्या मातीची मूर्ती पाण्यात सहज विसळतात. यामुळे पर्यावरणाचं रक्षण होऊ शकतं. पाणी दूषित होणार नाही नंतर हेच पाणी किंवा विरघळली मूर्ती तुम्ही माती म्ह्णून बागे मध्ये वापरू शकता. शाडू मातीच्या मूर्तींचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम अनुभवू शकतात.
- ३. मिनिमलिस्ट सजावट: कमी वस्तू वापरून सुंदर सजावट कशी करता असा मिनिमलिस्ट दृष्टिकोन ठेवा. म्हणजेच काय तर कमी वस्तूंमध्येही सुंदर सजावट करावी. त्यामुळे कचरा कमी होतो. बाप्पांना पाहताना छोटी सुंदर व कमी सजावटअसेल तर डोळ्यांसमोर बाप्पा जास्त दर्शन घेता येईल.
- ४. नैसर्गिक फुलांचा वापर: ताज्या फुलांचा आणि पानांचा वापर करून पर्यावरणपूरक तोरण बनवा. . बाप्पा समोर प्लास्टिक च्या फुलांचा हारांची सजावट करण्याऐवजी ताज्या आणि फ्रेश फुलांची आरास करा. फुलांची तोरणे बनवा. तुमच्या मुलांबरोबर मिळून फुलं आणि पानांपासून सुंदर तोरण बनवल्यास त्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळेल. तसेच मोबाईल पासून त्यांना दूर ठेवता येईल.
- ५. ताज्या फळांचा प्रसाद: बाप्पाची आरती झाल्यानंतर ताज्या फळांचा प्रसाद वाटू शकता. गणपती बापाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करा. मखर सजावट करा. झाली मग आता बाप्पा साठी प्रसाद तयार करा. पण हल्ली प्रसाद म्हणलं कि मिठाई डोळ्यासमोर येते. बाजारातील बाहेरची मिठाई पेक्षा रोज वेगवेळ्या ताज्या फळांचा प्रसाद तुम्ही करा. तो आरोग्यदायी असेन. तसेच तेला तुपाचे मोदक बनवण्यापेक्षा उकडीचे मोदक हि बनवा म्हणजे बाप्पा अजूनच प्रसन्न होईल.
- ६. बायोडिग्रेडेबल साहित्याचा वापर: गणेश उत्सावात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करा. प्रसादासाठी बायोडिग्रेडेबल कप म्हणजेच काय तर त्या वस्तू ज्या मातीमध्ये विलीन होतात अशा वस्तू वापरा. प्रसाद वितरणासाठी पर्यावरणपूरक भांडी, कप आणि वाट्यांचा वापर कराच. पण केळीच्या पानांचा वापर केला तर अजूनच उत्तम.
- ७. ऊर्जा बचत: एलईडी लाइट्स आणि परंपरागत दिव्यांचा वापर करा. . पारंपारिक लाइट्स ची रोषणाई करण्यापेक्षा एलईडी लाइट्सचा वापर करून ऊर्जा वाचवा. आरतीच्या वेळेस परंपरागत तेलाचे दिवे वापरून अधिक पर्यावरणपूरक आणि मंगलमय वातावरणात उत्सव साजरा करा.
- ८. पारंपारिक पद्धतींचा वापर: हळदीचे पण किंवा केळीच्या पानांचा वापर उकडीच्या मोदकांसाठी करता येतात. पण या साठी घरी ऑरगॅनिक पद्धतीने बाग तयार करा. उकडीचे मोदक जर बनवत असाल तर त्यांना उकाडावताना उकड भांड्यात आधी हळदीचे किंवा केळीच्या पानाचा वापर करावा. त्यामुळे मोदकांना एक विशिष्ट ताज्या पानांचा सुवास येतो आणि मोदक भांड्याला चिटकत नाहीत.
- ९. विसर्जनाचे पर्यावरणपूरक उपाय: घरात किंवा कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे महत्व आहेच. विसर्जन करते वेळी घरातच छोट्या पाण्याच्या भांड्यात मूर्ती विसर्जित करा, ज्यामुळे जलप्रदूषण टाळता येईल. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करा. विसर्जनाच्या प्रथांमध्ये केलेले छोटे बदलही मोठा पर्यावरणीय परिणाम करू शकतात.
- १०. विसर्जनानंतर कचरा व्यवस्थापन: ओला आणि सुका कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करा. मुळातच कचरा होणारच नाही याची काळजी घ्या. विसर्जन करताना गणपती बाप्पा सोबत आपण हे हार किंवा पूल विसर्जित करतो ते करणे टाळा. त्याने नदी, नाले, तलाव यांने देखील पाण्याची प्रदूषण वाढते. बाप्पांना निरोप देतांना बाप्पाची आरास साहित्याचा न चुकता ओला कचरा आणि सुख कचरा ह्यात वर्गीकरण करा. योग्य त्या गोष्टी फेका. काहीचे पुर्नवापर करा.
5. प्रतिज्ञा (Pledge)
- पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा: “लहान सुरुवात, मोठा बदल” हा मंत्र अंगीकारून पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करायला हवी. चला तर नवी सुरुवात करू. गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्ही स्वतःची एक Eco-Friendly प्रतिज्ञा तयार करू शकता. लहान सुरुवातीतूनच मोठा बदल होतो. लहान बदलांमुळे मोठा पर्यावरणीय फायदा होऊ शकतो. बाप्पाचे आगमन पृथ्वीवर जपून करू. पर्यावरणपूरक निवडी करून आपण गणपतीच्या निसर्गप्रेमाचं जतन करू.
6. निष्कर्ष (Conclusion)
- तर आम्ही पुढील दहा दिवस तुमच्यासाठी विविध विषयावर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगणारी लेख लिहणार आहोत. आमच्या संपर्कात रहा. तुम्हाला या विषयावर केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे लेखच नव्हे तर विविध टिप्स व ट्रिक्स मिळणार आहे. माझ्या सोबत आहेत. संदीप चव्हाण ( गच्चीवरची बागः ग्रो ऑरगॅनिकचे कोच व कन्संलटंट ) तर संपर्कात रहा. शिकत रहा. – आकांक्षा कांबळे, एग्रीकल्चरिस्ट, मुबंई.
7.गार्डेनिंग कोर्सस (Gardening Courses)
- आम्ही विविध विषयावर Eco-Friendly गार्डेनिंग कोर्ससचे आयोजन करतो. त्यात तुमच्या वेळ व सुविधे नुसार सहभागी होऊ शकता. यात विविध विषय म्हणजे किचन गार्डन, टेरेस गार्डेन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन,गार्डेन, हॅंगीग, फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग असे आहेत. तसेच भविष्यात पण येणार आहेत.
- Sart Organic in 2026
- आज नाही तर… Window Garden पुन्हा पुढे ढकललं जाईल
- हा Grow Bundle तुमच्यासाठी आहे का? प्रामाणिक उत्तर
- Grow Bundle: Window Gardening साठी Ready-to-Start Kit
- खिडकीत बाग आली… आणि आयुष्य बदललं
पर्यावरणपूरक गणेशोत्सव, प्लास्टिक वापर कमी करणे, शाडू मातीची मूर्ती, जैवविघटनक्षम भांडी. ताज्या फुलांचे हार, एलईडी लाइट्स, गणेशोत्सव सजावट, विसर्जन पर्यावरणपूरक, कचरा वर्गीकरण, गणेश चतुर्थी पर्यावरण. English: Eco-Friendly Ganeshotsav, Reducing Plastic Use, Clay Ganesh Idol,. Biodegradable Utensils, Fresh Flower Decorations, LED Lights, Ganeshotsav Decorations, Eco-Friendly Immersion, Waste Segregation, Ganesh Chaturthi Environment. Hashtags: #EcoFriendlyGaneshotsav, #ReducePlasticUse, #ClayGaneshIdol, #BiodegradableUtensils, #FreshFlowerDecorations, #LEDLights. GaneshotsavDecorations, #EcoFriendlyImmersion, #WasteSegregation, #GaneshChaturthiEnvironment

Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments are closed.