⏳ वेळ निघून जातोय! 🌿 घरच्या Organic Veggies शिवाय आरोग्याचं रक्षण अशक्य आहे!
🌿 घरच्या भाजी इतकं आरोग्यदायी दुसरं काहीच नाही!
आजच्या धकाधकीच्या जीवनात बाजारात मिळणाऱ्या भाज्यांमध्ये रसायनांचं प्रमाण वाढत चाललंय. पण जर आपण आपल्या घरातच ३-४ प्रकारच्या भाज्या उगवायला शिकलो, तर आरोग्य, पैसा आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी आपोआप मिळतात. फक्त ७ दिवसात सुरुवात करता येते – आणि त्यासाठी खास लेख! – संदीप चव्हाण. ग्रो ऑरगॅनिक. नाशिक.
Table of Contents
नमस्कार,
🧅🥦 घरच्या भाजी इतकं Organic Veggies आरोग्यदायी दुसरं काहीच नाही…
आणि हे सत्य आजकाल सगळ्यांनी स्वीकारायला हवं, पण वेळ निघून जातोय!
🚨 बाहेरच्या रासायनिक भाज्यांनी आजारांचे दरवाजे उघडलेत…
🤒 वाढती हॉस्पिटलची बिले, औषधं, आणि थकलेलं शरीर , याला उत्तर आहे घरच्या भाजीमध्ये!
🌱 पण ती Organic Veggies उगवायला शिकलं नाही, तर आपलं आरोग्य डावावर लागतंय.
म्हणूनच…
आजपासूनच सुरुवात करा!
मेथी (Fenugreek / Methi)
का निवडावी?
मेथी ही एक औषधी व बहुपयोगी Organic Veggies भाजी आहे. ती लवकर उगवते आणि तिच्या पानांचा उपयोग पराठा, भाजी, आणि सूपसाठी करता येतो.
कशी उगवायची?
- बीज: बाजारातून मेथीचे बी घेऊन या.
- जमीन/घमला: कुंडी, ट्रे किंवा थेट जमिनीत पेरा.
- पाणी: दररोज हलके पाणी द्या.
- काढणी: १५-२० दिवसांनी पाने तोडता येतात.
- टीप: परत परत उगवता येते, खर्च कमी आणि फायदा जास्त.
२. टोमॅटो (Tomato
टोमॅटो (Tomato
टोमॅटोचा वापर आपल्या रोजच्या जेवणात होतो – सूप, भाजी, कोशिंबीर, आणि सॉस मध्ये. स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ उगवण्यासाठी परफेक्ट.
कसा उगवायचा?
- बीज: बाजारातून बीज किंवा एखाद्या पिकलेल्या टोमॅटोमधील बिया वापरा.
- घमला: १०-१२ इंच खोलीचा कंटेनर घ्या.
- माती: पालापाचोळा व माती
- पाणी: दररोज थोडंसं पाणी, मोकळ्या जागेत ठेवा.
- काढणी: ५०-७० दिवसांत टोमॅटो येतात.
3. पालेभाज्या – पालक (Spinach / Palak)
का निवडावी?
पालक ही अत्यंत पौष्टिक Organic Veggies भाजी असून लोहतत्व, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली आहे. ती पटकन उगवते आणि वर्षभर उगवता येते.
कशी उगवायची?
- बीज: पालकाच्या बिया बाजारात सहज मिळतात.
- जमीन/घमला: थेट जमिनीत किंवा ट्रेमध्ये पेरा.
- पाणी: दर २ दिवसांनी मध्यम पाणी द्या.
- काढणी: २५-३० दिवसांत पाने तोडा.
- टीप: नियमित कापल्यास नव्या पालव येतात.
पर्सनल ट्रेनिंग साठी कॉल बुक करा
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
