आहारातील हिरव्या भाज्यांचे असाधारण महत्व
आहारात हिरव्या पाले भाज्यांचे Green Leafy Vegetables महत्व व सेवन
Table of Contents

आपली सर्वांचंच पोषण करणारी आई म्हणजेच आपली अन्नपूर्णा, धरणी माय होय. आपल्या सर्वच सजीव प्राण्यांच्या आहाराची गरज पुर्ण करण्याची त्यातील पौष्टिकता टिकवून ठेवण्याचा ती नेहमीच प्रयत्न करत असते. ही तिची जबाबदारी, कर्तव्य की तिचे काम. पण जे काही आहे तो समस्त जिवासांठी एक अनमोल असा ठेवा आहे आणि ति समस्त जिवांची गरज पण आहॆ. यात मुख्य मुद्दा येतो तो माणूस नावाच्या प्राण्याच्या आहाराचा, अर्थात अन्नाला चव प्रदाण करणं, जेवणातली पौष्टिकता वाढवणं. रुचकरपणा, स्वाद वाढवणे अशा अनेक गोष्टी येतात. ज्या आपल्या पोषक आहार, डाएट मध्ये, Green Leafy Vegetables कच्च्या भाज्यां, सलाड चे सेवन तसेच फळांचे प्रमाण करणे. इत्यादिचा समावेश होतो. यातून आपल्याला अनेक प्रकारची नैसर्गिक स्वरूपात खनिज, सुक्ष्मद्रव्य मिळतात ते ही कोणत्याही केमिकलचा उपयोग न करता. संपूर्णतः नैसर्गिक, सेंद्रीय पध्दतीनं.

परंतु आजच्या काळात, नवीन पिढीतील (झेन्झी्स) अनेकजण त्यांच्या दैनंदिन जेवणाला सोकॉल्ड टेस्टी, आकर्षक आणि विशेष बनवण्यासाठी विविध गोष्टी वापरतात. बाजारात उपलब्ध असलेल्या नवीनतम कुत्रीम अन्न उत्पादनांचा वापर करत आहेत. परंतु, हे आधुनिक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरतात. अधिक दिवस प्रक्रिया केलेले पदार्थ, अमर्याद प्रिजर्वेटिव्हसचा वापर,आर्टिफिशयल कलरिंग आणि फ्लेवरिंग एजंट्सचा वापर करतात. अशा जंक फूडचे उत्पादनात याचा ह्या सगळ्यांचा वापर केला जातोय. याचांच वापर करून रोजचे, घरचे, घरगुती जेवण देखील फॅन्सी बनवण्याचा प्रयन्त चालू आहे . ह्याचा थेट परिणाम तरुण पिढीच्या शरिरावर पर्यायाने मेंदूवर खोलवर होऊ लागला आहे. आणि हेच कुठेतरी थांबवण्याचा. त्याची तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न आपली “गच्चीवरची बाग ” ह्या Green Leafy Vegetables चा उपक्रम प्रयत्न करत आहे. यातून केवळ शरीरालाच नव्हे तर मनाला पोषण देणारी गच्चीवरची परस बाग आहे. अशी बाग प्रत्येकाच्या घरी दारी, अंगणात, खिडकीत फुलवाण्याचा डिजिटल शैक्षणिक छंद स्वरूपात संदीप चव्हाण आपल्याला वेड लावत आहेत.

चला तर मग पाहू…. आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचे Green Leafy Vegetables महत्व काय आहे ते…
आपण आपल्या रोजच्या जेवणात सलाड आणि फळे यांचा समाावेश करतो. ह्या व्यतिरिक्त कच्च्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन का आणि कसे केले पाहिजे ते ह्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोंत. आधुनिक जीवनशैलीमध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आहारातील विविधतेमुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. सलाड हे आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय आहे, परंतु त्याऐवजी कच्च्या हिरव्या पालेभाज्या दैनंदिन आहारात समाविष्ट करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.आपण सलाडच्या ऐवजी कच्च्या हिरव्या पालेभाज्यांचा दैनंदिन आहारात वापर कसा फायदेशीर आहे, हे पाहणार आहोत. सलाड बनवताना विविध भाज्या, फळे, नट्स आणि ड्रेसिंग्सचा वापर केला जातो. यामध्ये प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. परंतु, ड्रेसिंग्स आणि टॉपिंग्समुळे अतिरिक्त कॅलरीज आणि फॅट्स वाढू शकतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
कच्च्या हिरव्या पालेभाज्यांचे खाण्याचे फायदे आहेत. कच्च्या हिरव्या पालेभाज्या Green Leafy Vegetables म्हणजे अशा भाज्या ज्या नैसर्गिक, न शिजवलेल्या अवस्थेत खाल्ल्या जातात. यामध्ये पालक, मोहरी, मेथी, कोथिंबीर, पुदिना, आइसबर्ग लेट्यूस, कोबी, गवारीची शेंग, लिंबु आणि रोमेन लेट्यूस यांचा समावेश होतो. तसेच काही रानभाज्यांचा समावेश करता येतो. एवढेच काय बाजारात मिळतात त्या केवळ भाज्या पण भाज्यांसोबत त्यांची पाने सुध्दा ही पोषक असतात. घरी बाग फुलवलेली असल्यास आपण त्या पानांचा बिनधास्त आहारात उपयोग करू शकतो. उदाः मुळा, कॅबेज, फुलकोबी इं. कच्च्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, फोलेट, आयर्न, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स हे नैसर्गिक स्वरूपात विपुल प्रमाणात आढळतात. Green Leafy Vegetables शिजवल्याने काही पोषक तत्वे नष्ट होतात. परंतु कच्च्या पद्धतीने खाल्ल्यास ते शरिरात जतन तर होतातच पण शिवाय औषधांसारखा त्यांचा उपयोग होतो. कच्च्या हिरव्या पालेभाज्या कमी कॅलरीयुक्त असतात आणि वजन व्यवस्थापनासाठी उपयुक्त असतात. या पालेभाज्यांमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि तृप्तीची भावना निर्माण करते.कच्च्या पालेभाज्यांमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात, जे पचनक्रियेला मदत करतात आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करतात. आहारात Green Leafy Vegetables भाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे आहेत. ते लक्षात घेता, सलाड आणि कच्च्या हिरव्या पालेभाज्या खाण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे. या ब्लॉगचा उद्देश म्हणजे सलाड काकडी, गाजर ,टोमॅटो , बीटरूट , तेच तेच सलाड खाणे कंटाळवाणे झाले असेल. तर कच्च्या हिरव्या पालेभाज्या आहारात कशा समाविष्ट कराव्यात? आणि मजेशीर कश्या खाव्या ह्याचे उत्तर देखील तुम्हला तुमचा गच्चीवर “संदीप चव्हाण” ह्यांचा मार्गदर्शनाखाली फुलवलेल्या परस बागेतच भेटेल.
- पालक (Spinach): फायदे: आयर्न, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, फोलेट आणि मॅग्नेशियमने समृद्ध. रक्तनिर्मितीसाठी आणि हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. कसे खावे: सलाडमध्ये, स्मूदीमध्ये, सॅंडविचमध्ये किंवा रॅपमध्ये.
- मोहरीची पाने (Mustard Greens): फायदे: व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, फोलेट आणि फायबरने समृद्ध. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरतात. कसे खावे: सलाडमध्ये, चटणीमध्ये किंवा सॅंडविचमध्ये.
- मेथीचे पाने (Fenugreek Leaves): फायदे: आयर्न, फोलेट, मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध. रक्तशर्करा नियंत्रणासाठी आणि पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरतात . कसे खावे: सलाडमध्ये, पराठ्यामध्ये किंवा भाजीमध्ये.
- कोथिंबीर (Cilantro) : फायदे: व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध. डिटॉक्सिफिकेशनसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. कसे खावे: चटणीत, सलाडमध्ये, सूपमध्ये किंवा सजावटीसाठी.
- पुदिना (Mint): फायदे: व्हिटॅमिन ए, आयर्न, मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध. पाचन सुधारण्यासाठी आणि ताजेतवानेपणा मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. कसे खावे: चटणीत, स्मूदीमध्ये, सॅलडमध्ये किंवा सजावटीसाठी.
त्याच बरोबर कच्चा कोबी आणि गवार शेंग हे दोन्ही पदार्थ पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. कच्च्या कोबीमध्ये व्हिटॅमिन C, K, आणि फोलेट मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच, गवार शेंगमध्ये प्रथिने, फायबर, आणि व्हिटॅमिन A असतात. कच्चा कोबी आणि गवार शेंग यांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ते त्वचेचे वृद्धत्व रोखण्यात मदत करतात आणि त्वचा चमकदार बनवतात. दररोजच्या आहारात या कच्च्या हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करून तुम्ही विविध पोषक तत्वे आणि आरोग्य फायदे मिळवू शकता. हे पदार्थ स्वादिष्ट असूनही आरोग्यदायी आहेत. आम्ही सुचवलेल्या Green Leafy Vegetables कच्च्या हिरव्या भाज्यांचे सेवन करा. आपल्या अन्नपूर्णाला खुश करा त्याचबरोबर तुम्ही कसे आणि कोणत्या कच्च्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करता, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आणि रेसिपी शेअर करा आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करा.
टीपः कच्च्या भाज्यांचे सेवन करतांना त्या रेसीड्यू फ्री (Residue Free) असाव्यात किंवा त्या सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्याची खात्री असावी. किंवा Green Leafy Vegetables ताज्या व खात्रीच्या हिरव्या भाज्या खायच्या असतील तर त्या आपल्या डोळ्या समोर उगवलेल्या असाव्यात. म्हणजे शंभर टक्के ऑरगॅनिक असल्यामुळे त्या बिनधास्त सेवन करता येतात. – मिस आकांक्षा कांबळे (एग्रीकल्चरिस्ट)
🌱 *घरी, दारी, खिडकी, जमीन, गच्ची, शेत, शाळा व फार्महाऊसवर फुलवा*.
*फळं, फुल, ऑरगॅनिक भाज्यां व औषधी वनस्पती व झाडं-वृक्ष* 🌱
🍀 तुमच्या आवडीला आजच रचनात्मक पध्दतीने शिकण्याची जोड द्या.
👉 *ते ही आजपासून वर्षभर चार ऑनलाईन फिचर्स सोबत
👉 भारतातला पहिला मराठी भाषेतला कोर्स
*सविस्तर माहितीसाठी*
➡️🔥 हॉट कोर्स फॉर कूल गार्डनिंग
https://www.facebook.com/gacchivarchibaug
Health benefits of green leafy vegetables, nutrition, vitamins, minerals, healthy diet. immune system, weight loss, heart health, green leafy vegetables benefits, iron-rich foods, antioxidants, digestive health, metabolism, organic vegetables. Hashtags: #GreenLeafyVegetables #HealthBenefits #Nutrition #Vitamins #Minerals #HealthyDiet #ImmuneSystem . #WeightLoss #HeartHealth #IronRich #Antioxidants #DigestiveHealth #OrganicVegetables कीवर्ड्स: हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यदायी फायदे . पोषण, जीवनसत्त्वे, खनिजे, आरोग्यदायी आहार, रोगप्रतिकारक शक्ती, वजन कमी होणे, हृदयाचे आरोग्य, हिरव्या पालेभाज्यांचे फायदे . लोहयुक्त अन्न, अँटिऑक्सिडंट्स, पचनाचे आरोग्य, चयापचय, सेंद्रिय भाज्या. हॅशटॅग्स: #हिरव्या_पालेभाज्या #आरोग्यदायी_फायदे #पोषण #जीवनसत्त्वे #खनिजे #आरोग्यदायी_आहार #रोगप्रतिकारक_शक्ती #वजनकमी #हृदयाचेआरोग्य #लोहयुक्त #अँटिऑक्सिडंट्स #पचनाचेआरोग्य #सेंद्रियभाज्या
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments are closed.