हायड्रोफोनिक्स का नको

Why not Hydroponics?

हायड्रोफोनिक्स का नको? 

हायड्रोफोनिक्सचे फायदे तोटे ?

हायड्रोफोनिक्स हा केवळ व्यापार आहे?

आज घरीच विषमुक्त भाज्या पिकवणे फार गरजेचे झाले आहे. आहे त्या जागेत येईल त्या भाज्या विषमुक्त पद्धतीने भाज्या पिकवणे हे औषधासमान झाले आहे.  बाजारात कोणत्या प्रकारचे रसायनं वापरली जातील याचा काहीच भरोसा नाही. लोक जमेल तसे जमेल त्या वेळेत, जमेल त्या साधनात भाज्या पिकवण्याचा प्रयोग करत आहेत. पण यातील महत्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही, माहिती नाही तसली लोकं इंटरनेटवर जावून घरीच भाज्या उगवण्याचा शोध घेतात. किंवा  वेगळा प्रयोग म्हणून घरी खाण्यासाठी Hydroponics या तंत्राचा वापर करू इच्छितात. Hydroponics म्हणजे प्लास्टिक पाईच्या विशिष्ट रचना करून त्यामधे वाहत्या पाणी सोडले जाते. त्या वाहत्या पाण्यात काही अंशी द्राव्य खते ( विशेषतः रासायनिक खते) टाकून त्यात पालेभाज्यांचे, सलाड वर्गीय भाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

आम्ही याच्या विरोधात आहोत?

मुळात या प्रकारच्या भाजीपाला उत्पादनाला आम्ही विरोध करतो कारण  हायड्रोफोनिक्स या तंत्रात प्लास्टिक पाईपचा वापर केला जातो यात केवळ पाणी, रासायनिक खते व प्लास्टिकच्या पाईपचा वापर मुख्यत्वाने केला जातो. यातील प्लास्टिक पाईप जेव्हां गरम होतो तेव्हां त्यातून घातक रसायने पाण्यात सुक्ष्म रूपात मिक्स होतात व त्यावर भाज्या पोसल्या जातात. प्लास्टिक पाईप असो वा वस्तू यातून गरम पदार्थाचे जे काही रसायनाचे सेवन होते त्यातून आधुनिक आजार जडतात वा त्याचे आपण कधी ना कधी शिकार होतो. तज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बादलीत जे काही गरम पाण्याने अंगोळ करतो त्यातून सुध्दा टाईप टू प्रकारचा डायबेटीस होतो. हे तर झाले अंगोळीचा मुद्दा मग प्लास्टिकच्या पेला, कप, डिश यातून आपण गरम पदार्थ पोटात घालत असू तर त्यातून किती गंभीर आजारांना आंमत्रित करत आहोत. याचा आता विचार करा… साधे गरम पाणी अंगावरून घेतल्याने आजार होत असेन तर सेवनाने किती आजार होतील याचा विचार केलेला बरा..

Short n sweet Gardening couese
Download Now Recorded course

 परदेशात हे तंत्र सुलभ व शाश्त्रशुध्द पध्दतीने वापर केला जातो. त्यातमुळे  Hydroponics ही पध्दत परदेशात उत्तम प्रकारे काम  करते व त्यात जे काही उगवले जाईल ते विषमुक्त असेते सुध्दा. कारण त्यांच्याकडे वातावरण हे थंड आहे. तसेच त्यांच्या कडे आरोग्य, खाणं याच्या संदर्भात जे काही कायदे कानून आहेत. त्याचे तंतोतंत पालन केले जाते.  मानव प्राण्याची संरचना  पंचमहाभूतांनी बनलेली आहे. त्याने असेच अन्न सेवन करावे जे या पंचमहाभूतांच्या सहाय्याने  बनलेले असावे. Hydroponics या प्रकारात मातीचा अभाव असतो. त्यामुळे  पाण्यातून मिळणारं पोषणात  भाजीपाल, वनस्पती, सलाद यात कितीसे सत्व असणार. त्यामुळे Hydroponics या तंत्रांने उगवलेला भाजीपाला हा प्रयोग म्हणून, व्यवसाय म्हणून नक्कीच करावा. विकावे पण खाऊ नये या मताचा मी आहे. तुमच्या रोजच्या आहारात यात जरूर समावेश असावा पण परिपूर्ण आहार हा नसावा, कारण हे समुद्री खाणं झाले.  कारण Hydroponics तंत्राने उगवलेला भाजीपाला हा आपल्या आठवडी आहारातील एकाद पदार्थ असावा. सातही दिवस त्याचे जेवण नसावे. तसेच आपणास विक्री करावयाची अथवा व्यवसाय करायचा असेन तर नक्की करावा.

E Book Bundle
Download E Book Bundle

व्यापार कुणाचा? 

जे लोक अशा तंत्रज्ञानाचे उत्पादन करतात. किंवा ज्यांना व्यापार करावयाचा आहे. तेच लोक या उत्पादनाविषयी प्रचार प्रसार करतात. हायड्रोफोनिक्स या विषयावर फ्री सेमिनार घेतात. मग त्यांचेच उत्पादन घेण्याविषयी गळ घालतात. हे कदाचीत लोकांना अधिक परवडते. कारण त्यांना वस्तू खरेदी करण्यात अधिक आनंद वाटतो. पण त्या विषयीचे माहिती, ज्ञान, गार्डेनिंग कोर्स करण्यात महत्व वाटत नाही. असो. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

आम्ही आग्रही आहोत.

आम्ही नेहमी सांगतो की बाजारातून काही बागे संदर्भात खरेदी करण्यापूर्वी आपल्याला बागेत फुल झाडं, भाजीपाला उगवण्याविषयी माहिती घ्या. त्या संदर्भात तंज्ञाचे मार्गदर्शन घ्या, गार्डेनिंग कोर्स करा. आधी ते कसं काम करतं, निसर्ग कसा आहे हे समजून घेतले तर आपल्याला उत्तम प्रकारे गार्डेनिंग करता येणार आहे. या विषयावर आम्ही मराठी व हिंदी भाषेत गार्डेनिंग कोर्स  सुरू केले आहेत. 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक, अर्बन फार्मिंग कंन्स्लटंट व कोच .


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants