5 Steps For Climate Change

85 / 100 SEO Score

Climate Change: How to Tackle Rising Issues with Simple Daily Habits?

Climate Change : How Small Energy Savings Can Help Save the Planet

लक्ष्य: वातावरण बदल Climate Change थांबवण्यासाठी लहान पावले

वातावरण बदलाचे अपायकारक परिणाम दूर करण्यासाठी छोटी पावले

वातावरण बदल Climate Change हा विषय जागतिक पातळीवरती चर्चा होत आहे. आपण मात्र आपल्या शक्तीनुसार वातावरण बदलाचे अपायकारक परिणाम दूर करण्यासाठी छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावून घेऊ शकतो. छोट्या आणि सोप्या सवयी आपणास आपल्या पृथ्वीवरील वातावरण पोषक ठेवण्यासाठी चांगल्याच मोलाच्या ठरू शकतात. या सवयी जर आपणास आनंद देणाऱ्या असतील तर त्या त्वरित आपल्याकडून स्वीकारल्या जातील. जसे की, जेथे शक्य होईल तेथे पाण्याची बचत करणे. ही सहज आणि सोपी अशी सवय आहे. अगदी आपल्या घरातील गळती लागलेले पाईप, नळ हे जरी दुरुस्त करून घेतले तरी खूप काही ऊर्जा आपण वाचवू शकतो. ऊर्जा म्हणजेच शक्ती. आपणास आपल्या जीवनात वेगवेगळी ऊर्जा लागते इलेक्ट्रिक ऊर्जा, अन्नातून मिळणारी ऊर्जा, पेट्रोल डिझेल गॅस यापासून मिळणारी ऊर्जा. आज ऊर्जेशिवाय आपले कोणतेही काम होत नाही. आणि जेवढी जास्त ऊर्जा आपण वापरतो तेवढे जास्त आपण पृथ्वीच्या पर्यावरणाला घातक बनवतो. जेवढी कमी ऊर्जा आपण वापरतो तेवढे आपण पृथ्वीवरील पर्यावरण चांगले ठेवण्यास मदत करतो. हे कसे बरं ते आपण पुढे बघू या. –संबंध विकास सामाजिक संस्था.

Table of Contents

Climate Change

1. वातावरण बदलासाठी छोटी पावले म्हणजे काय ?

जेथे शक्य होईल तेथे तेथे ऊर्जा म्हणजेच एनर्जी वाचवा आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवा. ऊर्जा वाचवण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपणास करता येऊ शकतात. वीज कमीत कमी वापरली जाईल अशा गोष्टी करा म्हणजेच काय तर पाण्याची बचत करा, अन्नाची बचत करा ,कपड्यांची बचत करा ,बाजारातून कमीत कमी वस्तू विकत आणा, विनाकारण प्रवास टाळा, विजेची उपकरणे कमीत कमी वापरा. या गोष्टी करणे काही अजिबातच शक्य नाही असे नाही. प्रत्येक व्यक्तीने ठरवले तर यातल्या थोड्या थोड्या गोष्टी तरी आपण सुरुवात करू शकतो. भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर एक टक्के लोकांनी जरी यातील काही सवयी लावून घेतल्या तरी खूप मोठा परिणाम आपल्याला मिळू शकतो. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण एक सुंदर पृथ्वी निर्माण करू शकतो. यातूनच Climate Change अर्थात होणारे अनाकलीय बदलांची परिणामता कमी करू शकतो.

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
  • 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
  • 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
  • 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?

2. ही मानवाची छोटी पाऊले नेमकं कसं काम करतील ?

समजा आपल्या घरातील वीज प्रत्येकाने रोज नेहमीपेक्षा दोन युनिटने जरी कमी वापरण्याचे ठरवले तरी शंभर घरांची (१०० x २ x ३६५ ) एका वर्षात ७३००० युनिट वीज वाचेल. असा हिशेब पाणी बचत, पेट्रोल बचत, अन्न बचत , कपडे बचत या प्रत्येकाचा केला तर खूप करतात सारी ऊर्जा आपण वाया घालवण्यापेक्षा वाचवू शकतो. भारतातील मध्यम आणि उच्चमध्यम वर्ग हे सहज करू शकतो. या प्रत्येक गोष्टीला जी ऊर्जा लागते तीच ऊर्जा पुढे पृथ्वीवरील वातावरण बदलाला कारणीभूत असलेले वायू प्रमाणापेक्षा जास्त निर्माण करून पृथ्वीवरील तापमानात वाढ होते. हे वायू आहेत कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन. यात पाण्याची अती वाफ वातावरणात साचणे हे सुद्धा एक कारण आहे .

3. पृथ्वीवरील वातावरण बदलायला सर्वांगाने समजावून घेऊ या

पृथ्वीवरील वातावरणात अपायकारक बदल होणे म्हणजे कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन या वायुंमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढ होणे होय, असे शास्त्रीय अभ्यास सांगतो. या वायूंचे प्रमाण अचानक वाढले नाही. आपण मानवाने जेव्हा पृथ्वीवर असे काही उद्योग करायला सुरुवात केली ज्यामुळे हे वायू जास्त प्रमाणात तयार व्हायला लागले. हे मानवाचे उद्योग कोणते आहेत ? तर, प्रत्येक गोष्ट मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी कारखाने सुरू करणे होय. यात कारखाना म्हणजे केवळ जेथे यंत्र आहे तोच नाही तर शेकडो गाईंचे पालन, कोंबड्यांचे पालन, हे सुद्धा कारखानेच आहेत. वरील वायू ( कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन) जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. त्यावेळी ते एवढे दाट होतात की पृथ्वीवर सूर्यकिरणांनी जी उष्णता निर्माण झालेली असते. ती योग्य प्रमाणात पुन्हा: पृथ्वीच्या वातावरणात परत न जाता पृथ्वीवरच राहून जाते आणि पृथ्वीचे तापमान वाढते. खरं तर हे सर्व वायू योग्य प्रमाणात पृथ्वीवर राहिले तर ते सूर्यकिरणांनी जी उष्णता पृथ्वीवर निर्माण झालेली असते, त्या उष्णतेला शोषून घेवून पृथ्वी आपणास रहण्याजोगी ठेवतात.

4. पृथ्वीवरील वातावरण बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृतीच्या मनमोहक संधी

पृथवीतलावरील वातावरण बदलाची Climate Change आव्हाने मोठी आहेत असे म्हटले जाते. हे आपल्या मानण्यावर आहे. मी ठरविले तर एकटा सुद्धा खूप काही करू शकतो. पाहिजे फक्त जिद्द. भारतात अशा लोकांची उदाहरणे आहेत ज्यांना आपण आपले प्रेरणा स्थान मानू शकतो. एकट्यानेच डोंगर फोडून रस्ता बनविणारे श्री. दशरथ मांजी, आसाम मधील फॉरेस्ट मॅन ऑफ इंडीया श्री. जादव पायेंग (Jadav Payeng) ज्यांनी एकट्याने शेकडो एकरवर काही वर्षे सातत्याने झाडे लावून जंगल तयार केले. आपण एवढे मोठे काम केले पाहिजे असे नाही. आपणास आनंद देणाऱ्या छोट्या कामापासून आपण सुरुवात करू शकतो.
१. विविध झाडे, भाज्या, वेली, फुले, झुडपे , धान्ये यांची बीजे गोळा करा.
२. या बिजांपासून रोपे तयार करा .आपलीच एक जैव विविधता असलेली रोपवाटिका तयार करा.
३. यातील काही रोपे जागा असल्यास तुम्ही लावू शकता बाकी शेतकरी, शाळा, संस्था, सरकार यांना देवून टाका.
४. गच्ची असेल तर गच्ची वरील बाग तयार करा किंवा परसात बाग तयार करा.
५. आपणच लावलेल्या बागेत वाया गेलेले अन्न, पालापाचोळा, सांडपाणी यापासून बागेतील माती सकस बनवा.
६. जोपर्यंत आपली आधीची वस्तू पूर्ण खराब होत नाही तोपर्यंत बाजारातून नवीन वस्तू घेण्याचे टाळा.
ही यादी तुमच्या सहभागाने अजून मोठी होवू शकते. या प्रत्येक कामात खूप आनंद आहे आणि ती करायलाही सोपी आहेत.
मी यातील प्रत्येक काम शालेय वयापासून करीत आलेलो आहे आणि आजही करीत आहे.
ही कामे कदाचीत पृथवीतलावरील वातावरण बदलाची मोठी आव्हाने नष्ट करु शकणार नाहीत मात्र या आव्हानांना नष्ट करणासाठीची ही सुरुवात नक्कीच असू शकते. कारण यात निसर्गासोबत जीवन जगण्याची जिद्द आहे केवळ आर्थिक व्यापारी विचार नाही.

5. आपण सोबतच पृथ्वीवरील वातावरण बदलाचे आव्हान पेलण्यासाठी सातत्याने कृती करू या !

पृथ्वीवरील वातावरणात आपणास कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन या वायूंचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढू द्यायचे नसेल तर आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या वर्तनात सुधारणा करावी लागेल. आपल्याच मागणीमुळे आज आपले कारखाने चालत आहेत. कारखाने चालणे काही संपूर्ण अयोग्य गोष्ट नाही परंतु त्यांची संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची संख्या आपण थोडीतरी नियंत्रणात आणु शकतो. आपण बातम्यांमध्ये वाचले असेल मागणी कमी झाल्यामुळे अमुक एका कंपनीचे उत्पादन कमी करण्यात आले. आज बाजारात वस्तूंची इतकी रेलचेल आहे की, आपणास कमी किमतीत अनेक चोईसेस मिळाले तर नेहमीच आनंद होतो. परंतु ज्या वस्तू विकल्याच जात नाहीत त्यांचे काय होत असेल याचा कधी आपण विचार करतो का ? अर्थात ‘रिसायकल’ परंतु त्यालाही एक नवीन कारखाना कढवाच लागतो. तसेच सर्वच वस्तूंचे रिसायकल’ होत नाही. म्हणजे आपण बाजारातून जी वस्तू विकत आणली आहे तीचा जास्तीत जास्त वापर करून ती अतिशय निकामी झाल्यावरच नवीन वस्तू घ्यायला पाहिजे. असे एकदा तरी करून बघा खूप आनंद मिळतो. आपले हे छोटेसे वर्तन अनेक जास्तीच्या वस्तूंना निर्माण होण्यापासून थांबावेल आणि खुप सारी ऊर्जा वाचवेल जेणे करून जास्तीचे कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन वायू तयार होण्यास आळा बसेल. – संबंध विकास सामाजिक संस्था. (संस्था मानवी वर्तन आणि पर्यावरण बदल या विषयावर काम करते)

6. संबंध विकास संस्थेचे इतर लेख

Free Gardening Course

7. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण

8. बागकाम विषयावरील लेखः

9. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

Vegetables Seeds

10. Vegetables Seeds

बियाणं हे बघायला लहान असतं, पण त्याच्यात एक जबरदस्त ताकद दडलेली असते. योग्य पद्धतीने आणि नियोजनाने बियाणं लावलं तर त्यातून तुम्हाला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुम्ही जर गच्चीवर किंवा अंगणात बागकाम करण्याचा विचार करत असाल, तर थोडं योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्न हे तुम्हाला हवं असलेलं यश देऊ शकतात. तुमच्याकडे असलेल्या थोड्या साधनांमधूनच तुम्ही भरघोस पीक घेऊ शकता. योग्य जागा, बियाणं, आणि संसाधनांचा वापर केला, तर तुम्ही तुमच्या घरचं हिरवं आणि ताजं अन्न सहज उगवू शकता. यासाठी लागणारं मार्गदर्शन आणि माहिती तुम्हाला आमच्या कोर्समध्ये मिळेल! आता वेळ आली आहे तुमचं बियाणं योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याची. बियाण्यांबद्दल अधिक जाणून घ्या आणि तुमच्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

Keywords: वातावरण बदल, Small Steps for Climate Change, Energy Saving, Mitigate Climate Change, Save the Planet, पर्यावरण वाचवाHashtags: #ClimateChange, #EnergySaving, #SmallStepsBigImpact, #SustainableLiving, #GreenHabits, #SaveThePlanet, #EcoFriendlyLiving

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

War n Climate change (HIndi) Save Earth (hindi) War n Climate change (English)
10 OxyGen Plants