गडद हळदीमधलं विषारी सत्य. बातमी वाचा साभार म.टा.
सध्या गच्चीवरती बाग फुलवणे ही गरज झाली आहे. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते व ते खरं ही आहे. आज रसायमुक्त भाज्या व त्याही घरच्या घरी पिकवणे ही चांगल्या व सुदृढ आयुष्याची गरज झाली आहे. घरच्या बागेतील भाजीपाला आजची वेळेची व काही अंशी पैशाची गुंतवणूक ही उद्याच्या भविष्याची तरदूतच म्हणायला हवे.नाशिक शहरात गच्चीवरची बाग ही जोमाने फुलते आहे. या विषयावर पूर्ण वेळ काम करणारे संदीप चव्हाण हे उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांत (किचन वेस्ट, पालापाचोळा) भाजीपाला पिकवण्याचे तंत्र विकसीत केले. तसेच संदीप चव्हाण हे आपल्या गच्चीवरती विविध प्रयोग करत असतात. त्यांनी या वर्षी गच्चीवर, तेही नाशिकच्या वातावरणात व विशिष्ट प्रकारच्या ३० नर्सरी बॅग्ज मध्ये त्यांनी या वर्षी विक्रमी म्हणजे ५० किलो हळदीचे उत्पादन घेतले आहे. हे त्यांचे उत्पादनाचे तिसरे वर्ष आहे.
अशी झाली सुरवातः संदीप चव्हाण यांच्या सासूबाईनी जावयाची शेतीची हौस लक्षात घेवून गच्चीवर लागवडीसाठी पावशेर ओल्या हळदीचे कंद भेट म्हणून दिली. पहिल्या वर्षी त्यांनी त्याचे ५ किलो हळद उत्पादन केली. उत्पादित झालेल्या हळदीचे घरच्या पुरते ताजे लोणचे व काही घरात वापरण्यासाठी हळदपुड तयार केली व बाकीचे त्यांनी नविन वर्षासाठी बिज म्हणून राखेत ठेवले. दुसर्या वर्षी २ किलो बिजाचे १५ किलो हळद उत्पादन केले. त्यातील काही लोणचे केले. काही आप्तांना भेट दिली व काही हौशी बाग प्रेमींना लागवडीसाठी वाटली. या वर्षी त्यांनी ५ किलो बिज राखेत ठेवून जून च्या मध्यावधीत लागवड केली. त्यातून त्यांना ५० किलो हळद उत्पादन झाली आहे.
अशी भरली नर्सरी बॅग्जः टेरेस म्हटले की जागेची कमतरता आलीच. अशा वेळेस आपल्याकडे उपलब्ध जागेचा व साधनांचा मेळ बसवणे गरेजेचे ठरते. त्यांनी कमीत कमी रूपयात मिळणारी पण चांगल्या प्रतिची नर्सरी बॅगेची निवड केली. सोळा बाय सोळा इंच प्लॅस्टीकच्या नर्सरी बॅगेत प्रथम नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, वाळलेले किचनवेस्ट, सर्वात वरती दोन इंच लाल माती मिस्त्रीत आधीच्या वर्षाची माती वापरली. अर्थात ही माती म्हणजे खतासाऱखीच होती. अशा ३५ बॅग्ज मध्ये चार चार हळदीचे मातृकंद लागवड करण्यात आली. या वर्षी चांगल्या झालेल्या पावसाने पिक उभारीस आले. कंद पोसले गेले. मध्ये मध्ये खत म्हणून गोमूत्र पाणी, घरीच तयार केलेले देशी गायीचे शेणखत व माती अशी भर टाकत राहिले. तसेच जीवामृत, आंबवलेले खरकटे पाण्याचाही उपयोग केली. जानेवारी पासून पिकाला पाणी देणे बंद केले व जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात माती बाजूला करून हळदीचे उत्पादन केले.
हळदीचे महत्वः हळदीचे गुण हे आपल्या भारतीय संस्कृतीत सांगीतले आहे म्हणून तिचा वापर आपल्या रोजच्या जेवणात तर होतोच पण इतर अनेक गोष्टीसाठीही वापरली जाते. संदीप चव्हाण यांनी सांगीतलेला अनुभव मोठा रंजक व शिकवण देणारा आहे. ते एकदा बागेतील वांगी ब्लेडने कापतांना वांग्या ऐवजी बोटच चिरले गेले. रक्ताची धार घेवून तसेच किचन मध्ये धावले व पहिल्या वर्षी तयार केलेल्या हळदीची पुड त्यावर भरली. तिसर्या दिवशी बोटाची जखम भरली गेली. हीच हळद बाजारातील असती तर त्याचा परिणाम एवढ्या लवकर व आश्चर्यकारक मिळाला नसता असे त्यांनी व्यक्त केले.
अशी जपली ओली हळदः हळद काढून झाल्यानंतर त्यास सावलीत ठेवले जाते. सावलीत हळद वाळवल्यामुळे कंदापासून माती आपोआपच विलग होते. ति झटकून घेतली. तसेच त्याचे मुळे कैचीने कापून हळदकंद स्वच्छ केली जाते. त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण केले. १) मूळ व जाड आकाराचे मातृकंद व उपकंद हे पुढील वर्षासाठी बिज म्हणून मातीच्या माठात राखेत जनत केले जातात. २) उपकंदाहून छोटे व आकाराने छोटे असलेले कंद हे हळदीचे लोणचे किंवा पावडर बनवण्यासाठी उपोगात आणले जातात. ३) खराब झालेले कंद किंवा अगदी बाळहळद ही खत म्हणून किंवा झाडांना देण्यात येण्यार्या पाण्यात त्याचा वापर केला जातो.
घरीच पावडर कशी तयार करावी... ओल्या हळदीला दाताने घासण्याच्या ब्रशने मातीचे कण काढले जातात. त्याचे बारीक काप, चकत्या करून उन्हात कडकडीत वाळवली जाते. व त्यास घरच्या मिक्सर मधे बारिक पावडर करून गाळून घेतली जाते. बाजारातील हळदीला पिवळा गडद रंग यावा म्हणून त्यास उकळवले जाते पण हळद उकळवल्याने त्याचा अर्क निघून जातो. असे त्यांनी अनुभव व्यक्त केला. घरची हळद रंगाने पिवळी धमक नसली तरी गुणाने व चवीने ति बाजारातल्या हळदीपेक्षा कितीतरी पटीने वरचढ आहे असा त्यांनी अनुभव मांडला.केले जाणार मोफत मार्गदर्शनः हौशी व्यक्तिना घरच्या कुंड्यामध्ये हळद कशी लागवड करावी. त्याची काळजी कशी घ्यावी याची माहीती ते निशुल्क देण्यास तयार आहे. इच्छुकांनी फोनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.काय आहे गच्चीवरची बाग… उपलब्ध जागेत, उपलब्ध साधनात व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतात ( पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या, वाळलेले किचन वेस्ट, आंबवलेले खरकटे पाणी,) नैसर्गिक रित्या बाग फुलवण्याचे ते निशुल्क मार्गदर्शन करातात. घरच्या घरी भाजीपाला कसा पिकवावा या विषयी ते कार्यशाळा घेतात. स्व अनुभवावर आधारित त्यांनी गच्चीवरची बाग ही पुस्तिकाही लिहली आहे.संपर्कः संदीप चव्हाण, ९८५०५६९६४४www.gacchivarchibaug.in.
संदीप चव्हाण नाशिक.
8087475242
http://www.gacchivarchibaug.in
नक्कीच सर….
Chavan Saheb khup khup abhinanadan.
Terace var baghicha karne khup khup sope kele aahe.
Amchya ghari suddha aasich ek baghicha asavi ase khup vatate.
Tumchya margadarshanachi avashakta aahe.
Tumchi bhet kadhi hou shakte
Amhala thoda vel dila tar amhala khup ananad hoil
VIJAY PADOL