Top 10 Eco-Friendly Diwali

88 / 100 SEO Score

10 Way To Celebrate Eco-Friendly Diwali

Eco-Friendly Diwali Tips for a Greener Celebration

दिवाळी साजरी करण्याच्या १० Eco-Friendly Diwali  पद्धती

कशा प्रकारे दिवाळी पर्यावरणपूरक करू शकतो?

यंदा दिवाळी निसर्गाच्या स्नेहाने साजरी करा. पर्यावरणपूरक Eco-Friendly Diwali दिवाळीसाठी हे १० उपाय अवलंबवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा. दिवाळी साजरी करताना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकतो? या ब्लॉगमध्ये १० पर्यावरणपूरक उपाय दिले आहेत ज्यामुळे आपण आपला सण निसर्गाशी सुसंगत साजरा करू शकतो. वाचा आकांक्षा कांबळे यांचा लेख…

Table of Contents

Eco Friendly Diwali

दिवाळी म्हणजे भारतात मोठा सण मानला जातो. मग खूप सारी शॉपिंग आली, खूप सारे सजावटीचे सामान, खाण्यासाठी दिवाळीचा खमंग फराळ आला. त्याच बरोबर प्रकाशाचा सण, आनंदाचा सण आहे . परंतु त्याचबरोबर आपण थोडा विचार ह्या निसर्गाचा पण केला पाहिजे म्हणजेच हा सण निसर्गाच्या संवर्धनाचाही सण असायला हवा. त्यासाठी ह्या वर्षी आपण आपला सण थोडासा वेगळा पण सृजनशिलतेने साजरा करूया. तो पण पर्यावरणाच्या हानीशिवाय, आनंदात आणि निसर्गस्नेही. चला तर मग पाहूया, दिवाळी साजरी करण्याचे १० पर्यावरणपूरक Eco-Friendly Diwali उपाय! Dont Worry Boring नसणार पण तुम्हाला नक्की आवडतील अशाच कल्पना आम्ही आज घेऊन आलो आहोत. 

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
  • 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
  • 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
  • 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?

1. पारंपरिक तेलाचे दिवे लावा ( Mitti Ka Diya )

साधारण दिवाळीत आपल्याकडे LED दिवे, कंदील, इलेक्ट्रिक दिवे लागतात, पण यावर्षी पारंपरिक मातीचे दिवे लावण्याचा विचार करा. मातीचे दिवे पर्यावरणपूरक Eco-Friendly Diwali असतात आणि दिवे लावताना शुद्ध तुप किंवा तेल वापरल्यास घरात सकारात्मक ऊर्जा मिळते. यामुळे आपल्या कष्टकरी बांधवांनाही मदत होते आणि पर्यावरणावरही भार पडत नाही. 

2. फटाके वाजविण्याऐवजी प्रकाशाचा आनंद घ्या

फटाके फोडणे ही दिवाळीची एक मोठी प्रथा आहे, पण त्यात असलेल्या ध्वनी आणि हवेच्या प्रदूषणामुळे आपल्याला आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी दिव्यांनी आणि कंदीलांनी आपल्या घराचा परिसर सजवून, मुलांना पर्यावरणपूरक सणाचा आनंद देऊया. आणि जर तुम्हाला फटाके फोडायचेच असतील, तर पर्यावरणपूरक Eco-Friendly Diwali, कमी आवाजाचे फटाके निवडा.

3. इको-फ्रेंडली रंगोळी वापरा

रंगोळी हा आपल्या दिवाळीच्या सजावटीचा अविभाज्य भाग आहे. पारंपरिक रासायनिक रंग वापरण्याऐवजी फुलांच्या पाकळ्या, हळद-कुंकू, किंवा फळांच्या बिया वापरून रंगोळी काढा. ही रंगोळी सुरक्षित असते आणि पक्ष्यांनाही अन्न मिळते. त्याच बरोबर थोडेसे कष्ट घेऊन आपण तांदळाच्या पिठाचा म्हणजेच Rice Flour  चा वापर करून नैसर्गिक पिठाचा वापरून रांगोळी काढू  या. (उत्तम आणि दर्जेदार रांगोळी डिझाईन साठी फॉलो करा @arkbyakanksha इन्स्टा page ला) Eco-Friendly Diwali दिवाळी साजरी करूया.

4. नैसर्गिक सजावट करा

प्लास्टिकच्या वस्तू किंवा कृत्रिम फुलांचा वापर टाळा. त्याऐवजी फुलांची माळ, पानांची तोरणं किंवा फळांच्या झाडांनी घर सजवा. हे नैसर्गिक प्रकार असल्याने हवेचा प्रदूषण होण्यास कमी होईल आणि हे पदार्थ जैवविघटनक्षम असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. व त्यानिमित्ताने Eco-Friendly Diwali दिवाळी साजरी करता येईल.

5. पुनर्वापर करा आणि कमी कचरा निर्माण करा

दिवाळीमध्ये पॅकिंग मटेरियल, रॅपिंग पेपर, प्लास्टिकचे कप, प्लेट्स यांचा वापर होतो. यावर्षी, पर्यावरण पूरक साधनांचा वापर करा. पुनर्वापरायोग्य पॅकेजिंग, बायोडिग्रेडेबल प्लेट्स आणि पेपर कप वापरा. आणि रॅपिंग पेपरसाठी रंगीत कागद, जुने कपडे, किंवा रेशमी कपड्यांचा वापर करून वेगळे पॅकिंग करा. या सर्व पध्दतीने आपण Eco-Friendly Diwali दिवाळी साजरा करता येईल.

6. घरच्या घरी मिठाई आणि फराळ बनवा

दिवाळीच्या निमित्ताने खूप मिठाई बाजारातून आणली जाते, परंतु हे पदार्थ प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये येतात. यावर्षी स्वतः घरीच मिठाई, चकली, शंकरपाळी बनवा. हे आरोग्यासाठी चांगले तर आहेच शिवाय आणि प्लास्टिक कचरा कमी होतो. तसेच फराळ देतानां कागदी बॅग्जचा वापर करा. Eco-Friendly Diwali साजरी करण्याचा संदेश आपण त्यातून देवू शकतो.

7. पर्यावरणपूरक भेटवस्तू द्या

दिवाळीत आपल्याला नातेवाईकांना आणि मित्रांना भेटवस्तू द्यायची असते. प्लास्टिक , कृत्रिम वस्तू न देता नैसर्गिक उत्पादने द्यावेत. जसे की ऑरगॅनिक साबण, ग्रीन प्लांट्स, कापडी पिशव्या, बायोडिग्रेडेबल पेन, यांसारख्या भेटवस्तू द्या. हे पर्यावरणपूरक असतात आणि उपयोगात येऊ शकतात. अन्न पण जर तुम्हाला गिफ्ट काय देऊ हा विचार येत असेल तर लगेच आपण इन्स्टावर रिल्स पाहू शकता. ( Succulent गिफ्ट) आणि ह्यांच्याकडे असलेले बियाणे सुद्धा गिफ्ट म्हणून वापरू शकता. एकदा आवश्य @ecohub_by_Akanksha Insta page ला भेट द्या आणि फॉलो करा. Eco-Friendly Diwali दिवाळी पर्यावरण पुरक साजरी करू या.

8. किल्ले बनवताना नैसर्गिक साहित्य वापरा

दिवाळीत मुले किल्ले बनवतात आणि सजवतात. किल्ला बनवताना थर्मोकोल, प्लास्टिक वापरण्याऐवजी माती, दगड, गवत वापरा. यामुळे किल्ला जिवंत आणि पर्यावरणपूरक दिसतो आणि किल्ला विघटनक्षम साहित्यात बनवल्याने तो नंतर कचरा होत नाही. Eco-Friendly Diwali साजरी केल्याचे समाधान काही औरच असते.

9. कमीत कमी विजेचा वापर करा

दिवाळीत संपूर्ण घर रोषणाई करतो, पण हा वीजेचा वापर खूप वाढवतो. यंदा सूर्यास्तानंतर थोडे वेळच रोषणाई ठेवा. तसेच LED दिवे वापरल्यास वीजेचा वापर कमी होईल. हेच दिवे वारंवार वापरता येऊ शकतात, त्यामुळे खर्चही वाचतो आणि पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. Eco-Friendly Diwali हाच तर खरा संदेश आहे.

10. लोकल बाजारातून खरेदी करा

दिवाळीत खरेदी करताना मोठ्या ब्रॅण्डच्या वस्तू आणण्या ऐवजी स्थानिक बाजारातून वस्तू खरेदी करा. यामुळे स्थानिक विक्रेत्यांना मदत होते, त्यांचे उत्पन्न वाढते, आणि मोठ्या शहरातून येणाऱ्या वस्तूंमुळे होणारे प्रदूषण कमी होते. हा लेख वाचणार्यांना आमी गच्चीवरची बाग आणि इको हब कडून नम्र विनंती आहि कि आपण सर्वांनी लोकल बाजारातूनच खरेदी करा. हि दिवाळी फक्त आपली नाही सर्वांची आहे.  “इस दिवाळी धन बारसे या ना बारसे पेर कोई रोटी के लिये नाही तारसे ” एव्हढीच इच्छा आहे. आणि हो लोकल खरेदी करताना आम्हाला स्टोरी किंवा reel मधून टॅग करू शकता. तुम्हाला आम्ही दिवाळी च्या शेवटी एक खास गिफ्ट मिळवू शकता. अधिक माहिती साठी @ecohub_by_Akanksha फोल्लो करा आणि संपर्क साधा. दिवाळीचा आनंद हा आनंदाने साजरा व्हावा, निसर्गाशी जुळवून साजरा व्हावा. यंदा थोडे बदल करून आपण सणाचा आनंद अधिक संवर्धित करू शकतो, निसर्गाची काळजी घेत, एक नवा पर्यावरणपूरक दिवाळी Eco-Friendly Diwali सण साजरा करूया.

11. एग्रीकल्चरिस्ट आकांक्षा कांबळे

यांचा बागकाम विषयावरील लेख. इंस्टाग्राम पेज @ecohub_by_Akanksha

12. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण

  • यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज @gacchivarchi_baug
Free gardening Course

13. बागकाम विषयावरील लेखः

14. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

Vegetables Seeds

15. व्हेजेटेबल सिड्स उपलब्ध

एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक: बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

Ecofriendly Diwali, Eco-Friendly Diwali #EcoDiwali, #GoGreen, #SustainableDiwali, #DiwaliTips, पर्यावरणपूरक_दिवाळी, #GreenCelebration, #CelebrateSustainably, #OrganicDiwali, #ClayDiyas”

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Importance of Gardening (English) importance Of Gardening (Hindi) War n Climate change (HIndi)
10 OxyGen Plants