“की फरक पैंदा”?

41 / 100 SEO Score

“काय फरक पडतो”? बाजारातील Healthy Food भाज्या खाल्याने!

बाजारातल्या भाज्या की घरच्या बागेतील Healthy food औषध?

“काय फरक पडतो?”
हे मीही एकदा बोललो होतो.
…पण जेव्हा फरक पडतो, तेव्हा उशीर झालेला असतो! – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.

Healthy _food
A vibrant assortment of fresh vegetables including eggplants, cucumbers, and peppers, arranged in a basket, showcasing the theme of homegrown healthy food.

गेल्या २५ वर्षांपासून नाशिकमध्ये आम्ही रसायनमुक्त भाजीपाला घरपोच Healthy food पिकवतोय पण आता शिकवतोय.. त्याआधी आमचं घर म्हणजेच आमची बाग होती – गच्चीवर हिरवळ, टोपल्यात टाकलेल्या बिया, आणि रोज ताटात येणाऱ्या Healthy food विषमुक्त भाज्या!

त्यामुळे काय झालं होतं?
लहानसहान आजार कमी झाले, औषधांचा खर्च आटोक्यात आला, आणि सगळ्यात महत्त्वाचं – घरातलं आरोग्य हसतं राहिलं!

पण गेल्या वर्षी आम्हीच त्या बागेकडे दुर्लक्ष केलं.
(म्हटलं बघू, थोडे दिवस बाजारातल्या भाज्याही चालतील…)
आणि त्याचे परिणाम काही आठवडे थांबत नाहीत… ते थेट दवाखान्याच्या बेडवर नेऊन ठेवतात.

बायकोला हायपरटेंशनचं ऍटॅक… आणि आठवडा भर अ‍ॅडमिट!
म्हणजे – जेव्हा घरच्या बागेची जागा बाजारातल्या भाज्यांनी घेतली…
तेव्हा खर्च वाढला, औषधं वाढली, त्रास वाढला.
आणि तेव्हा ‘काय फरक पडतो?’ या वाक्याचा ‘फरक’ कळला.

त्या काळात काम बुडालं ते नुकसान वेगळचं. तसंच शरिरात रासायनिक औषधांचा मारा झाला तो वेगळाच. घरी भाज्या न पिकवणं हे एकूणच महागात पडलं होतं.शक्यतो रोज संध्याकाळी वरण भात हा ठरलेला असतो. इतर कडधान्याच्या भाज्याही होतातच. (बाजारातल्या ताज्या भाज्या पेक्षा कडधान्यात कमी विषतत्व असतात. कारण बाजारात आलेल्या भाज्यावर रसायनं मारून २४ तासाच्या आत त्या शिजवून पचवलेल्या असतात. रेसुड्यू फ्री नसतात) त्यामुळे घरच्या हिरव्या भाज्या आठवड्यात तीन –चार असल्यातरी पुरेशा होतात. पण त्याहीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं. याचा मला चांगलाच अनुभवाचा चटका लागलाय.

रसायनं म्हणजे स्लो पॉईझन – आणि ती रोज खाल्ली जातात!

रोजच्या भाज्या बाजारातून येतात.
त्या दिसायला ताज्या, पण…
रेसिड्यू फ्री नसतात.

म्हणजे… त्या भाज्यांमध्ये वापरलेली रसायनं अजूनही आपल्या पोटात,
मग तिथून आपल्या रक्तात मिसळतात.
आणि तेच हळूहळू आपल्याला कमकुवत करतं –
बाहेरून नाही… आतून!


घरच्या भाज्या = नैसर्गिक औषधं!

घरी उगवलेल्या भाज्या जरी मूठभर असल्या,
तरी त्या तुमच्या शरीरासाठी Healthy food औषधापेक्षा कमी नसतात.

त्या केवळ अन्न नाही,
त्या संजीवनी असतात.

रोज एक वाटी वरणभात, आणि त्यासोबत घरच्या बागेतील एखादी हिरवी भाजी Healthy food! – एवढं साधं बदललं, तरी आरोग्यावर जबरदस्त परिणाम होतो.


बागकाम म्हणजे आरोग्याची सूक्ष्म वीण

जसं एक वस्त्र बारीक धाग्यांनी विणलं जातं,
तसंच आपलं शरीर, मन, जगणं –
छोट्या छोट्या सवयींनी सुदृढ होतं.

घरच्या भाज्या Healthy food ही सवय जपली पाहिजे.
ती विस्कटली… की मग शरीरही हळूहळू तक्रार करू लागतं.

कापडं बदलता येतील,
पण शरीर…?


व्हिडिओ बघा – आरोग्याचं नवं दालन उघडा!

🟢 घरच्या गच्चीवर किंवा जमिनीवर आम्ही विटांच्या वाफ्यांमध्ये रसायनमुक्त भाजीपाला उगवतो.
🟢 तुम्हीही शिकू शकता – कमी जागेत, कमी खर्चात, तुमच्या घरासाठी स्वतःच्या हातानं.

🎥 बघा:
👉 व्हिडिओ 1 – आमचं गच्चीवरील बागकाम
👉 व्हिडिओ 2 – रसायनमुक्त वाफा तयार करण्याची पद्धत
👉 व्हिडिओ 3 – आरोग्यवर्धक बागकामाचा परिणाम
👉 व्हिडिओ 4 – बाजारातल्या भाज्यांमधील रसायनांचा उलगडा


तुमच्या आरोग्याचा निर्णय तुमच्याच हातात आहे!

भाज्या बाजारातून आणायच्या की बागेतून उगवायच्या?

👇 कमेंट करा: “मी सुरुवात करणार!”
👇 लेख आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Importance of Gardening (English) importance Of Gardening (Hindi) Earth is like (English)
10 OxyGen Plants