How to grow garden…

Picture  with name 44.jpg

बाग कशी फुलवावी…

बाग म्हटली की त्यासाठी जागा, रोप फुलवण्यासाठी कुंड्या व भरण पोषणासाठी साहित्य हे गरजेचे असते.

बरेचदा आपण ते सारेच खर्चिक बाब म्हणून ते टाळत असतो. पण म्हणतात ना.. इच्छा तेथे मार्ग.. उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत व उपलब्ध नैसर्गिक संसाधनात फुलांची, शोभेच्या झाडांची अगदी भाजीपाल्याची बाग फुलवता येते. बाजारात कुंड्याचे असंख्य प्रकारात म्हणजे सिमेंट, माती, प्लास्टिक, बॅग्ज स्वरूपात उपलब्ध आहेत.

तसेच विविध आकारात गोल, चौकोनी, आयताकृती, लांबोळक्या स्वरूपात उपलब्ध होतात. जागेच्या उपलब्धतेनुसार हॅंगीग, भिंतीवर(व्हर्टीकल) मांडणी करता येईल यानुसारही उपलब्ध होतात. कुंड्यासाठी खत, कोकोपीठही उपलब्ध असते. यापैकी आपण निवड करता येते.

पण ही झाली खर्चिक बाब. खर्च जरूर करावा पण गरजेनुसार, आवडीनुसार. पण कमी खर्चातही आपल्याला सहजतेने उपलब्ध जागेनुसार घरात, घराच्या आवतीभोवती. विंडो ग्रील, हालच्या खिडकीत, किचन समोरील खिडकी, पायरी, टेबल यावर सुध्दा बाग फुलवता येते.

कुंड्या म्हणून शितपेयाची बाटली, दुधाची पिशवी, लेडीज पर्स, नारळाची कंरवटी, छोट्या नर्सरी बॅग्ज अगदी जे जे मिळेत की ज्यात बिया, रोपं रूजतील वाढतील, अशा साहित्याचा कल्पकतेने वापर करता येतो. शेवटी कुंडीतील रोप हे किती सुंदर वाढलय, हिरवगार आहे यावरून कुंडीची शोभा वाढते.

बरेचदा माती, खत कुठुन आणावयाचे हा प्रश्न असतो. अगदी शुन्य मातीतही आपण बाग फुलवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला थोड्या पेशन्सची, धिराची गरज असते. माती थोडीफार म्हणजे कुंडीच्या आकारमानाच्या २० टक्के माती उपलब्ध असेन तरी चालते. माती ही शक्यतो लाल रंगाची असावी. काळी माती असेन तर त्यात मुरूम, लाल माती, वाळू मिश्त्रीत करता येते.

कुंडी कशी भरावीः एक फूट उंचीची कुंडी कशी भरावी यासाठी पुढील प्रमाणे प्रमाण देत आहे. ते कुंडीच्या उंचीनुसार बदलू शकतो. कुंडीला खाली तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी भोकं असावीत. त्यावर नारळाच्या शेंड्याच्या चार इंचाचा थर द्यावा, त्यावर वाळवलेले किचन वेस्ट (प्रि-कुक्ड म्हणजे भाज्याची सालं, काड्या), पालापाचोळा यांचा आठ इंच थर द्यावा. त्यावर खत मिश्त्रीत मातीचा दोन इंच थर टाकावा. एकादे झाडं लावावयाचे असल्यास कुंडी दिलेल्या प्रमाणे अर्धी भरून त्यात हुंडीतील झाडं मधोमध लावावे त्याभोवती सुका कचरा भरून वरून २ इंच मातीचा थर दयाव. पाणी मोजके द्यावे, पाणी जास्त दिल्याने कुंडीतील आवश्यक घटक वाहून जातात.

कालांतराने कुंडीतील झाडं रिपोटींग करण्याची गरज असते. वरील प्रमाणे भरलेल्या कुंडीतील माती ही भुसभूशीत, रवाळ, वजनाला हलकी पण उत्पादक असते. याच मातीचा पुन्हा वापर करून आपण दोन ते तीन कुंड्या पून्हा वरील प्रमाणे भरू शकतो.

बागेसाठी खत म्हणून घरच्या घरी कंपोस्टींग करता येते. आपल्याकडे कचरा किती निर्माण होतो, त्यासाठी जागा किती उपलब्ध आहे. यानुसारही बाजारात किंवा घरच्या घरी कंपोस्टीग सेटअप तयार करता येतात. अगदी माठ, जूनी बादली, टब, कापडी पिशवी, बास्केट ही वापरता येते. फक्त त्याचं विज्ञान, त्यामागील तंत्र, मंत्र शिकून शिकून घेणं गरजेचे आहे. अगदीच जमलं नाही तर त्याला वाळवून कुंडयामधे भरण पोषण म्हणून त्याचा वापर करता येतो.

आपल्याला जसे नास्ता, जेवणात विविध प्रकारचे घटक लागतात. तसेच झाडांना पोषणासाठी केवळ एकच प्रकारचे खत वापरून चालत नाही. त्यातही विविधता असावी, उदाः शेणखत, गांडूळखत, लिंबोळी खत, राख, खरकटे पाणी, गोमुत्र, जिवामृत, खरकट्या अन्नाचे फंरमेंट केलेले पाणी अशी विविधता आपल्याला साधता येते.

आणल्या कुंड्या, भरली माती व खत की झाडे जगतात असे मुळीच नाही. आपल्याला त्यासाठी अभ्यासाची गरज असते. त्यासाठी अनुभवी लोकांशी बोलावं, इंटरनेटवरही मराठीतही बरीच माहिती, युट्यूबवर व्हीडीओ उपलब्ध आहेत. हा अभ्यास रोज थोडा थोडा करावा व त्याला सरावाची जोड दिल्यास आपल्याला बाग फुलवता येते. यातील महत्वाचे शिकण्याचे का असा प्रश्न स्वतःला विचारावा, उदाः एकादे झाडं चांगले का वाढले, अचानक का पिवळे पडेले, पाणी जास्त झाले की कमी झाले. झाडांना उन, सावली किती आवश्यक आहे. असे प्रश्न विचारल्यास घरात थोडी चर्चा केल्यास त्यातून स्वतःला बरेच काही शिकता येते. एकादे झाडं, हे कशापासून उगवतं म्हणजे बियापासून, फांद्यापासून की कंदापासून याचाही अभ्यास गरजेचा असतो. अर्थात तो रोजच्या निरीक्षणातून आपल्याला साध्य होतो.

बागेची निगा राखण्यासाठी मी रासायनिक खतांचा, फवारणीचा वापर शक्यतो टाळावा. त्यासाठी आपल्या पारंपरिक उग्र वासाच्या पदार्थापासून कीड नियंत्रक तयार करेन, उदाः दही पाणी, लसून पेस्ट पाणी, हिंग पाणी, गोमुत्र पाणी याची फवारणी ही दर सात ते पंधरा दिवसांनी करावी. म्हणजे कीड ही दूर राहते. अगदीच जमले नाही तर हातात धरता येईल अशा एक लिटरच्या पंपात पाण्याचा फवारणी केली तरी झाडे ही धूळमुक्त होतात. त्यांची प्रकाश संश्लेषंणाची प्रक्रीया उत्तम होते. झाडे ही स्वतःचे अन्न स्वतःत तयार करतात. व झाडे निरोगी राहण्यास मदत होते.

घरात, खिडकीत छोटं छोटं झाडं लागवड करता येतात. त्यात शोभेची झाडे, निवडूंग कमी पाणी, कमी सुर्यप्रकाश, यावर जगणारी, प्राणवायू देणारी झाडे निवड करता येतात. दोन महिने फुलं देणारी फुलं झाडं तसेच घच्या घरी, कोथंबिर, मेथी, पुदीना, अळूची पाने अशी सहज येणारी पालेभाजी लागवड करता येते.

झाडांच्या सहवासात वेळ जातो. डोळ्यांना सुखवतं, मन शांती देतं, थकवा घालवत. समाधान पावतं. निसर्गाच्या सानिध्यात, सहवासात बरच काही शिकता येते. आपल्याला छोट्याश्या प्रयत्नांनी वाढत्या प्रदुर्षणावर मात करता येते.

=============================================================

IMG_20181114_190053_227

पालापाचोळा, किचन वेस्ट, चला फुलवूया बगीचा बेस्ट. घरच्या घरी फुलवा भाजीपाल्याचा मळा… घरच्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवण्यासाठी वाचणीय, उपयुक्त, संग्रही ठेवावं, वाढदिवसाला भेट द्यावी अशी गच्चीवरची बाग पुस्तिका… २४० रू. बाय पोस्ट घरपोहोच…

============================================================

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

www.gacchivarchibaug.in /808747524

लेखावरून १५ जून १९ रोजी प्रकाशीत झालेली बातमी…

4 FB sakal news 15 06 19 edited.jpg


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants