वाढत्या तापमनात आपली बाग कशी जगवाल…

HOW TO SURVIVE GARDEN IN HIGH TEMPERATURE

गेला उन्हाळा बरा होता… असं आपण प्रत्येक जणच म्हणत असतो. वाढता उन्हाळा हा सारीकडेच चर्चेचा विषय ठरतो खरा.. पण त्यावर कृती मोजकेच लोक करतात. कृतीशुन्य असणारी माणसे केवळ हातावर हात ठेवून वेळ वाया घालवतात. खरं तर अशा मानव प्राण्याची गंमत त्या हळू हळू गरम होणार्या पाण्यात बसलेल्या बेडकासारखी गोष्ट झाली आहे. गरम होणारे पाणी एक दिवस उकळेल व जिव घेईल हे त्याच्या लक्षातच येत नाही. मग तो त्यातच मरून जातो.

आपल्याच सोकाल्ड प्रगतीमुळे मानव आता कधी न परतू शकणार्या अशा जागतिक तापमान वाढीच्या महामार्गावर वेगाने प्रवास करत आहे. खर तर तापमान वाढ ही हिमयुगाकडे वाटचाल करणारी ठरणार आहे. सध्या आपल्या सर्वांनाच ग्लोबल वार्मिंगचे चटके बसू लागले आहेत. पण या विनाशाच्या प्रवासाची दाहकता छोट्या, छोट्या कृतीने नक्कीच कमी करू शकतो. काय आहेत उपाय…

आपण सारेच सिमेंटच्या जंगलात राहतो. पूर्वी मातीची घरे हे उशिरा तापायची व लवकर थंड व्हायची. पण सिमेंट हे लवकर तापते व उशीरा थंड होते. अगदीच विरूध्द गुणधर्म असलेल्या बांधकाम साहित्यात आपण राहतो. पण त्याला काही पर्यात नाही. मग करायचे काय… लवकर तापणार्या सिमेंटला आपण उशीरा तापवता येईल याची नक्कीच उपाययोजना करता येऊ शकते.

गच्चीवर फुलवा बाग…

गच्चीवर बाग फुलवण्याने तापणारे टेरेस हे १२ ते १४ अंशाने कमी होते. तसेच टेरेसचे आयुष्यमान वाढते. उशीरा टेरेस तापल्यामुळे छताखाली राहणार्या कुटुंबाला लगेचच एसी. वा पंखा लावायची गरज पडत नाही. या सार्यामुळे विजेच्या बिलातही बर्याच प्रमाणात घट होते. तसेच पहाटे वातावरणात गारवा तयार होतो. या सार्यांचा परिणाम विज व पैशाची व पर्यावरणाची बचत करता येते.

वाढत्या व घटत्या तापमानात टेरेस हे आकुंचन व प्रसरण पावत असते. त्यामुळे त्याचे आयुष्यमान कणा कणाने घटत जाते. त्यामुळे टेरेसवरील घोटाईला पापडी धरली जाते व ती स्लॅप पासून वेगळी होते. थोडक्यात अधिक तापमानाला टेरेस तापल्यामुळे एका अर्थाने घराचे नुकसान होते. ते वाचवायचे असेल तर छतावर बाग करण्याशिवाय पर्याय नाही.

छतावर बाग असेल तर असे करा उपाय…
आपण छतावर कुंड्यामधे बाग तयार केली असेल तर अर्धवेळ ऊन लागेल अशा ठिकाणी कुंड्या हलवा. दोन वेळेस पाणी द्या..

  • न हालवता येणारी बाग म्हणजे मोठ्या कुंड्या, वाफे असतील तर त्यावर ३० ते ५० टक्के सुर्यप्रकाश झिरपेल अशा प्रमाणाचे हिरवे कापड टाका. तसेच आपल्या छतावर वारा वाहत असेल तर बाजूने कापड लावा. एक बाजू खुली ठेवा.. हवा खेळती राहिली पाहिजे नाहीतर कीड वाढते. पण वरून कापड लावलेच पाहिजे.
  • आपण नुकतीच बागेला सुरवात केली असेल म्हणजे आपल्या छतापेक्षा बाग ही २० टक्केच जागेवर असेल तर ८० टक्के छताची गरम हवा २० टक्के बागेला करपून टाकेन. त्यामुळे त्याठिकाणी अरेका पामच्या कुंड्याचा अडसर तयार करून वनभिंतासारखी भिंत तयार करा. म्हणजे गरम हवेला अटकाव होईल व आपल्या बाग फुलवण्याच्या प्रयत्नांना यश येईल.

केवळ छतावर, अंगणात पाणी मारून गारवा तयार होणार नाही. हे फक्त पाणी वाया घालवणं होईल. तेच पाणी किंवा त्याही पेक्षा कमी पाण्यात छतावर बाग फुलवली तर छत गार राहण्यात मदत होईल.

छत गरम होते म्हणून काही मंडळी सफेद रंग देतात. निःसंशय छत गार राहण्यास मदत होते. पण सुर्य किरण आकाशात परावर्तित होतात त्यामुळे तापमान वाढते. पण बागेतील काडीकचरा, पालापाचोळा यात ते सामावून जातात त्यामुळे तापमान कमी होते.

पाण्याची टंचाई किंवा पाणी कमी प्रमाणात द्यावयाचे असल्यास आपल्याला पाण्याच्या बाटली व्दारेही ठिबक पध्दतीने पाणी देऊन बाग जगवता येईल. हे उपाय आपण बाल्कनीत, जमीनीवर परसबाग असेल तर कल्पकतेने तेथेही करता येतात.

दुपारच्या वेळेत दारं, खिडक्या बंद ठेवा.. कारण गार हवेची जागा ही गरम होत असते. दारं खिडक्या उघडे असतील तर घर गरम होण्यास वेळ लागणार नाही.  तेव्हा करा काही तरी… नुकतेच उन्हाळा उन्हाळा म्हणून रडत बसण्यात अर्थ नाही.. कृती करण्यात खरी सार्थकता आहे.

अधिक माहितीसाठी .. WWW.gacchivarchibaug.in 9850569644

कमी पाण्यात बाग फुलवण्याचा व्हिडीओ पहा..

सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला पिकवत असाल तर कच्च खायला शिका… जे आरोग्यदायी आहे…