Swatch Bharat Abhiyan | स्वच्छ भारत अभियान |

स्वच्छ भारत अभियानात आमचे योगदान…

गच्चीवरची बाग, नाशिक या पर्यावरणपुरक कामालानऊ वर्ष पूर्ण होत आहेत. मार्च २०२१ रोजी पूर्णवेळ कामाला सुरवात करून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहोत. भाजीपाल्याची बाग छंद म्हणून सुरवात केली होती. पण नंतर त्या छंदास  पर्यावरण संवदेनशिलता, शेती, निसर्ग संवर्धन, कचरा व्यवस्थापन याची जोड मिळत आता गच्चीवरची बागेने सामाजिक उद्मशिलेतेचा आकार घेतला आहे. यात आम्ही Grow, Guide, Build, Products sale & Services पाच सुत्राव्दारे व्यवसायात बळ भरत आहोत. खरं तर या कामात अनेक बागप्रेमीचे, पर्यावरणासाठी काम करणारी मंडळीचा म्हणजे किचन वेस्ट (कचरा व्यवस्थापन) व घरी, दारी, गच्चीवर, अंगणात फुलांची वा भाज्यांची बाग फुलवणार्या मंडळीचा फार मोठा वाटा आहे. तसेच हे काम बाल्यावस्थेत असतांना हे काम लोकांपर्यंत पोहचवण्यासी विविध माध्यमांनी तोलामोलाची मदत केली आहे. आजही करत आहेत. लोकसत्ता, सकाळ मधे वर्षभर लिखाण झाले आहे.

खर तर या कामाची सुरवात सत्यमेव जयते या अमिरखान यांनी सादर केलेल्या कामातून सुरवात झाली आहे. या सार्या कामांची आमची एक घोषणा आहे. जी नेहमी आमच्या जागृती रथावर (टेम्पो) असते… “स्वच्छमेव जयते…. “

गच्चीवरची बाग नाशिक या उद्मशिलतेचा आत्मा हा गारबेज टू गार्डन असा आहे. कचरा व्यवस्थापनातून बाग फुलवावी हा आमचा मोटो आहे. गच्चीवरची बाग फुलवणे म्हणजे रसायन मुक्त भाज्या पिकवणे यासाठी तर आहेच पण त्यासोबत लोकांनी घरातील, अंगणातील, कचरा व्यवस्थापन करावे या बद्दल कौशल्य शिकवत आहोत. आमचे काम हे स्वच्छ भारत अभियानाचे महत्वाचे अंग आहे जे आम्ही पुढे नेत आहोत असे आवर्जून सांगावेसे वाटते.

स्वच्छ भारत अभियानाचे काम आम्ही पुढील पाच सुत्राव्दारे कसे पुढे नेत आहोत हे सांगण्याचा हा प्रयत्न…

 Grow: या अंतर्गत आम्ही गच्चीवर बाग फुलवतांना विटांचे वाफे तयार केले जातात. त्यासाठी आम्ही ९० टक्के पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या, वाळलेल्या फांद्या वापरल्या जातात. हे अगदी २०१३ पासून आम्ही करत आहोत. हे वापरले तर भाज्या भरपूर प्रमाणात व चिवष्ट लागतात. कुंड्या भरण्यासाठी हीच पध्दत वापरली जाते. माती कमी वापरल्यामुळे जंगल परिसरातून, शेतातून येणारी लाल माती ही कमी प्रमाणात ओरबाडली जाते. त्यामुळे मृदा संवर्धन घडते. त्यातून पूर येणे, धरणक्षेत्रात गाळ साचणे याचे प्रमाण आपोआपच कमी होणार आहे.

आम्ही देशीगायीचे पालन केले आहे. घर परिसरातून निर्माण होणारा भाजीपाल्याचा कचरा आम्हाला आणून देतात. याचे गायीला खाद्य म्हणून  वापर करतो. त्याचे बारा तासात शेणात रूंपातर होते. अशा प्रकारे आम्ही भाजीपाल्याचा कचरा निर्मुलन  करत आहोत. परिसर स्वच्छ ठेवण्याचेही काम करत आहोत.

तसेच मोठ्या प्रमाणात मिळणारा पालापोचोळ्याचा चुरा करतो त्याला BISHCOM ( Biomass Sheding Compost Materil ) बनवत आहोत.

Guide:  लोकांनी 90:10 असे प्रमाण वापरून कुंड्यामधे वाफ्यामधे बाग फुलवावी यासाठी विविध समाज माध्यमांव्दारे जागृती घडवत आहोत. मार्गदर्शन करत आहोत गेल्या आठ वर्षात आम्ही साडेसात लोकांपर्यंत पोहचलो आहोत. विविध समाज माध्यमे म्हणजे प्रिन्टं मीडिया म्हणजे विविध वर्तमान पत्रात लेख, सदर प्रकाशित केले आहेत. दृक श्राव्य माध्यमांवर बातम्या प्रसारित झाल्या आहेत.  तसेच संवदेनशील युट्यूबर्सनी आमच्या कामावर व्हिडीओ बनवले आहोत. शिवाय व्हाट्स अप,  इंस्टाग्राम, लिंकीन,  या मायक्रोब्लॉगिंग व कार्यरत आहोत. यू ट्यूबवर तर १०० व्हिडीओ अपलोड केले आहेत. तसेच घरी व शॉपवर येणार्या मंडळीना प्रत्यक्ष भेटून बोलून कचरा व्यवस्थापन, कंपोस्टींग विषयी माहिती देत आहोत. दूरध्वनीवरही माहिती मार्गदर्शन केले जाते.

Build: आम्ही भाज्यांसाठी ब्रिक्स बेड तयार करून देतो शिवाय कंपोस्टींग साठी लागणारे एरो  ब्रिक्स बॉक्स  हा कंपोस्टरही तयार करून देतो. ज्यामधे ९० टक्के पालापाचोळाचा वापर केला जातो.

Products sales & Services: भाजीपाला उत्पादनासाठी लागणारा जैविक काडी कचरा हा आम्ही सातपूर या औद्योगीक क्षेत्रातून गोळा करतो. कंपन्याबाहेरील पालापाचोळा, मंदीरातील, गणेश उत्सवात निर्मल संकलनात मिळाणार्या नारळ शेंड्या गोळा करतो. नाशिक शहरात जे काही बागबगीचा देखभालीचे काम करतो. त्यात मिळणारा पालापाचोळा हा गोळा करून त्याचे खत करतो. त्याचा मोठ्या मशीन मधे दळून त्यापासून  Bishcom : Potting Mix तयार केले आहे.

घरच्या किचन वेस्टचे कंपोस्टींग करण्यासाठी कंपोस्टींग कल्चर तयार केले. जे माठ, बादली यात वापरून कंपोस्टींगची गती पाचपटीने वाढवू शकता. तसेच कंपोस्टर्सची निर्मिती करतो आहोत. तसेच जसा कचरा तसे कंपोस्टर्स याची काही डेमो तयार केले आहेत. जे विविध ठिकाणी त्याची बांधणी केली आहे.

पालापाचोळा, कचरा जाळू नका यासाठी जागृती घडवत विटांचे हौद तयार केले आहे. घरच्या खरकट्या अन्नाचे व्यवस्थापन कसे करावे. त्याचा खत म्हणून कसा वापर करावा हे लोकांना शिकवत आहोत. थोडक्यात कचरा हा डंपिग ग्रांऊडवर न जावू देता तो घरीच त्याचे व्यवस्थापन करावे यासाठी विविध समाज माध्यमांवर जागृती घडवत आहोत.

घरी गाय पाळल्यामुळे शेण आम्ही उघड्यावर न टाकता त्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यामुळे कुठेही दुर्गंधी, वास येत नाही. त्याचे ब्रिक्स बॉक्स मधे छोट्या जागेत व्यवस्थापन करतो. ज्याचा आदर्श हा म्हशीचा गोठा असलेल्या ठिकाणी करता येईल.

दखलः या कामाची दखल स्थानिक सातपूर विभागीय कार्यालयात घेण्यात आली आहे. सातपूर विभागीय कार्यालयात गच्चीवरची बाग व्दारे कंपोस्टींग या विषयावर एक दिवसीय व्याख्यान सादर करण्यात आले आहे. शिवाय वार्डनुसार स्वच्छता निरिक्षकासोबत कंपोस्टींग कसे करावे या बद्दल प्रभात भेटी व चर्चा केल्या आहेत. सच्छ भारत अभियानात दर वर्षी होणार्या सर्वेक्षणात आमच्या कामाला तज्ञ व्यक्तिकडून भेट दिली जाते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

www.gacchivarchibaug.in


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants