Syllabus Of Gardening Courses

25 / 100 SEO Score

कोर्स मधे काय शिकवणार ?

कोर्समधून तुम्हाला काय मिळणार ?

कोर्समधून तुमच्या आयुष्यात काय बदल होणार?

मराठी भाषेत ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स उपलब्ध, घरी, दारी, जमीनीवर, टेरेसवर, शेतात, फार्महाऊससाठी उपयोगी. या कोर्स मधे तुम्हाला आम्ही काय शिकवणार आहोत, त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे. तसेच या कोर्स मधून तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत. या विषयी हा सविस्तर लेख देत आहोत. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कंन्सलटंट व कोच.

Organic Gardening Courses

१/3 कोर्स मधे काय शिकवणार ?

  • 1) उपलब्ध जागेचा (विंडो गार्डेनपासून ते फार्महाऊस) सृजनशिलतेने उपयोग करायला शिकवणार.
  • 2) उपलब्ध साधनांचा उपयोग शिकवणार
  • 3) रोपं झाडं वाढवण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करायचा हे शिकवणार
  • 4) रोपं झाडं वाढीसाठी नैसर्गिक तंत्र शिकावणार
  • 5) कोणताही खर्च न करता झाडंंची वाढ कशी करायची हे शिकवणार
  • 6) निसर्ग नेमका कसा काम करतो याचे मुलभूत सुत्र शिकवणार
  • 7) प्रत्येक झाडाचा स्वभाव कसा आहे.
  • 8) झाडाची, पाण्याची गरज किती आहे.
  • 9) झाडाला, उन्हाची गरज किती आहे हे शिकवणार
  • 10) पाणी देण्याचे तंत्र शिकवणार
  • 11)कमी वेळात घरच्या घरी कचर्याचा वापर खत म्ह्णून कसा करावा हे शिकवणार
  • 12) झाडं ही विनासायास कशी वाढवायची हे शिकवणार
  • 13) फुलं, फळं, भाजीपाला बियाणांची ओळख शिकवणार
  • 14) चांगल्या बियाणांची रोपांची निवड कशी करायची हे शिकवणार.
  • 15) बिज संस्कार काय असतात हे शिकवणार
  • 16) बियाणांपासू रोपं कशी तयार करायाची हे शिकणार
  • 17) छोटी रोपं ही कधी, कुठे व कशी लागवड करावीत याचे तंत्र शिकवणार.
  • 18) बियाणांपासून ओरग्यदायी मायक्रो ग्रिन्स कशी व कशात उगवायची हे शिकवणार
  • 19) मोसम नुसार बियाणंपासून भाज्या कशा उगवायच्या हे शिकवणार
  • 20) बागकाम, शेतातील कामं हे काम न राहता ते आनंदायची कसं होणार हे शिकवणार
  • 21) तुमच्या पूर्वानुभव, आवड लक्षात घेवून तुमची व्यक्तिगत शिकवणी घेणार
  • 22) मागील वर्षाच्या रेकॉर्डेड व चालू वर्षाच्या लाईव्ह कोर्स व्दारे प्रॅक्टीकली शिकवणार.
  • 23) मुलांमधे बागकामाची आवड कशी वाढवावी यासाठी तंत्र शिकवणार
  • 24) हॅेगीग गार्डेन कसे तयार करायचे हे शिकवणार
  • 25) व्हर्टिकल गार्डेन कसे तयार करायचे शिकवणार
  • 26) होम मेड हायड्रोफोनिक्स कसे तयार करावे हे शिकवणार
  • 27) टेरेस गार्डेन, किचन गार्डेन शेती कामासाठी विविध सेसअप कसे तयार करावे हे शिकवणार
  • 28) बागकामात खर्च कसा वाचवायच्या याच्या हजारो टिप्स व ट्रिक्स शिकवणार.
  • 29) बाग स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठीचे उपाय शिकायला मिळणार
  • 30) बागकाम साहित्याची निवड व ते वापरावयाचे कौशल्य शिकवणार
  • 31) बागेतील कीड नियंत्रण कसे करायचे याबदद्ल शिकवणार
  • 32) बागेत कीड येणारच नाही याचे नैसर्गिक पिकसापळ्यांचे तंत्र शिकवणार
  • 33) कीड नियंत्रणासाठी घरच्या घरी औषधं कशी तयार करावयाची हे शिकवणार
  • 34)फूल, फळं भाज्या काढणीसाठीचे योग्य कालावधी काय असतो हे शिकवणार.
  • 35) सावलीत येणारी, अर्धवेळ सावलीतील, पूर्णवेळ उन्हातील झाडांची वर्गवारी शिकवणार
  • 36)कमी जागेत जास्तीत जास्त झाडं उगवायचे, मांडणी व रचना कौशल्य शिकवणार
  • 37)मोसमानुसार (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) बागेची काळजी कशी घ्यायची शिकवणार.
  • 38) निस्तेज असलेल्या, वाढ खुंटलेल्या झाडांला पूर्नजिवित करायचे तंत्र शिकवणार
  • 39) नर्सरीतून आणलेल्या झाडांचे रोपन, पूर्नरोपन कसे करायचे याचे तंत्र शिकवणार.
  • 40) किचनमधील बागेत व बागेतील किचनमधे याची सायकल कशी काम करते हे शिकवणार.
  • 41) कमीत कमी १० टक्के मातीत झाडे कशी उगवायची हे शिकवणार.
  • 42) कुंड्या हलक्या कशा कराव्यात याचे तंत्र शिकवणार
  • 43) नैसर्गिक फुलं, फळं, भाज्या व औषधीवनस्पतीचें आरोग्यदायी फायदे व वापर हे शिकवणार.
  • 44) बागकाम हे आपल्या आयुष्यात सुख शांती व समृध्दी कशी आणते हे शिकवणार.
  • 45) बागकामातून स्वावलंबन, आत्मिक विकास कसा साधावा हे शिकवणार.
  • 46) बागकामात आधुनिक माध्यमांचा कसा वापर करायवयाचा हे शिकवणार
  • 47) बागकामात विज्ञान कसे काम करते हे शिकायला मिळणार.
  • 48) बागकामातून वैयक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक फायदे काय काय असतात हे शिकवणार.
  • 49) बागकामासाठी गार्डेनरचा, मजूरीचा खर्च कसा वाचवायचा हे शिकवणार.
  • 50) तुमची बाग ही आश्चर्यांची, संशोधनाची, शोधांची खाण आहे हे शिकवणार.
  • 51) रसायनमुक्त भाजीपाला, फुलझाडे फुलवणाचे महत्व काय असते हे शिकवणार.
  • 52) शहरी शेती, विषमुक्त अन्न निर्मितीचे महत्व व आरोग्यावर होणारा परिणाम हे शिकवणार.
  • 53) उपजावू, उत्पादनशील माती कशी तयार करायची हे शिकवणार
  • 54) माती रिचार्ज करण्याचे नैसर्गिक तंत्र शिकवणार.
  • 55) होम कंपोस्टींगचे अनेक प्रकारचे छोटे पासून तर मोठे असे विविध सेटअप शिकवणार.
  • 56) शेती किंवा फार्महाऊससाठी माती, पाणी परिक्षण गरजेचं आहे की नाही हे शिकवणार.
  • 57) उपलब्ध मनुष्यबळात उत्पादनशील कामं कशी करावीत हे शिकवणार
  • 58) निरिक्षण, नोंदी यातून अभ्यास कसा करावा हे शिकवणार.
  • 59) द्राव्य व विद्राव्य खत निर्मिती, त्याचा वापर, त्याचे प्रमाण व वारंवारिता शिकवणार.
  • 60) शेतीचे प्रकार, गार्डेनिंगचे प्रकार शिकवणार. (प्राचिन ते भविष्य)
  • 61) तुमच्यातील आवडीला व्यवसायात कसे रूपांतरीत करावयाचे हे शिकवणार
  • 62) माध्यमांचा वापर करून तुमच्या व्यवसायाला कशा पध्दतीने वाढवायचा हे शिकवणार.
  • 63) झाडांसाठी पोषक तत्वं कोणती व कशी तयार करायची हे शिकवणार.
  • 64) नर्सरीतील झाडे कशी वाढवली जातात हे शिकवणार.
  • 65) युट्यूबवर दाखवले जाणारे व्हिडीओ खरे असतात का त्याला कसे ओळखावे हे शिकवणार.
  • 66) झाडांच्या स्वभावानुसार, मोसमानुसार कधी कसे कंटीग. छाटणी कशी करावी हे शिकवणार.
  • 67) होम गार्डेनिंग ही उद्याच्या फार्मिंगची लॅब कशी आहे हे शिकवणार.
  • 68) व्यक्तिमत्व वाढीसाठी बागकाम कसे सहाय्य करते हे शिकवणार.
  • 69) बॅग गार्डेनिंग, एरिओ ब्रिक्स सेटअप, कुंड्याची बाग, या विषयी सविस्तर शिकवणार.
  • 70) गावाला गेलात तर बागेला पाण्याची व्यवस्था कशी करावयाची हे शिकवणार
  • 71) माती व मातीचे प्रकार, झाडानुसार त्यांची निवड हे शिकवणार.
  • 72) कीड का लागते. त्याची कारणे काय आहेत हे शिकवणार.
  • 73) मल्चिंग म्हणजे काय, मल्चिंगचे प्रकार व त्याची प्रभावी वापर शिकवणार.
  • 74) माती ही वाळवावी का? त्याची गरज व त्यासाठी सोपी उपाय योजना शिकवणार.
  • 75) इंडोअर आऊट डोअर गार्डेनिग शिकवणार.
  • 76) ऑरगॅनिक फार्मिग बिगिनर्स टू बिझिनेस कन्संलटेशन शिकवणार.
  • 77) गार्डेनर असाल तर व्यवसाय कसा वाढवावा हे शिकवणार.
  • 78) गार्डेनिंग संदर्भात इको सिस्टिम कशा तयार करावी हे शिकवणार.
  • 79) नेहमीच्या भाज्यांपेक्षा ऑफसिझन भाज्यांची रेसिपी शिकवणार.
  • 80) बागेत कमी पाण्याचा वापराचे तंत्र शिकवणार.
  • 81) भारतीय भाज्या बरोबर एक्सोटिक्स भाज्या उत्पादन कसे करावयाचे हे शिकवणार.
  • 82) आणखी बरेच काही…..

2/3 कोर्समधून तुम्हाला काय मिळणार ?

  • 1)बागकामासाठी कोणतंही वस्तू विकत घेण्याआधी सल्ला मार्गदर्शन मिळणार.
  • 2)तुम्हाला गरज असेन तेव्हा मार्गदर्शन मिळणार.
  • 3)बारा मोड्यूल्सव्दारे बागकामाचे तंत्र व मंत्रांचे मागील वर्षाचे रेकॉरडेड सेशन्स मिळणार
  • 4)प्रत्येक महिण्याच्या १ ल्या शनिवार/ रविवारी मोड्यूल्स सेशन मधे सहभागी व्हायला मिळणार
  • 5)उरलेल्या शनि, रवि प्रश्न उत्तरे व प्लॅन्ट टॉपीक्स वर लाईव्ह सेशन्समधे सहभागी व्हायला मिळणार
  • 6)तुमच्या कुटुंबाला पण लाईव्ह सेशन एंटेंड करायला मिळणार.
  • 7)लाईव्ह सेशन्स व्दारे इतर लोकांशी बोलायला, त्याचे अनुभव ऐकायला मिळणार
  • 8)इतरांचे अनुभवातून आपल्याला प्रोत्साहन, प्रेरणा मिळणार.
  • 9)आमचा कंन्टेंट ब्लॉग व्दारे बागे संदर्भात लेखाचे अपडेट मिळणार.
  • 10)युट्यूब, इंस्टाग्राम व फेसबूकस व्हॉट्सअप व्दारे कनेक्ट राहण्याची संधी मिळणार.
  • 11)बागकामा संदर्भात कुठेही, कसलीही अडचण, विचारपूरस केली तर लगेच मार्गदर्शन मिळणार.
  • 12)ऑरगॅनिक पध्दतीने बाग कशी फुलवायची हे शिकायला मिळणार
  • 13)मागील तेवीस वर्षाचे व्यावसायिक अनुभवातून तुम्हाला तंत्र व मंत्र मिळणार.
  • 14)कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे करावयाचे याचे तंत्र मिळणार
  • 15)झाडांचे रोग नियंत्रण व त्याचे व्यवस्थापन याचे तंत्र मिळणार.
  • 16)सातत्याने फुलं, फळं, भाजीपाला निर्मितीचे तंत्र मिळणार.
  • 17)फूलं फळं, भाज्या कधी खुडायच्या याचे तंत्र मिळणार.
  • 18) बागकामातून स्वसंवाद, कौटुंबिक संवाद कसा वाढवायचे याचे तंत्र मिळणार.
  • 19) बागकामातील आव्हाने व प्रश्न कसे सोडवायची याचे मिळणार.
  • 22)बागकामातून स्वविकास, अध्यात्मिक विकास, प्रगती कशी साधावी याचे मंत्र मिळणार.
  • 23)ऑरगॅनिक प्रॅक्टीसेस मधून जैवविविधता कशी काम करते हे शिकायला मिळणार.
  • 24)टेरेस गार्डेन, किचन गार्डेन, विंडो गार्डेन बद्दल आपल्याला उन्नत प्रगतीशील तंत्र मिळणार
  • 25)विषमुक्त फुलांचा, फळांचा व भाज्याचे विविध आरोग्यदायी उपयोग करायला मिळणार.
  • 26)मायक्रो ग्रीन्स ज्यूस, सूप, सलाद, भाजी तयार करण्याचे तंत्र मिळणार.
  • 27)घरच्या भाज्या उत्पादनातून आनंद व समाधान मिळणार
  • 28)विषमुक्त अन्न निर्मितीचा पाया भक्कम होणार.
  • 29)तुमच्या बागकामाच्या, निसर्गाशी जोडण्याच्या व्यक्तिगत ध्यैयाशी जोडले जाणार.
  • 30)योग्य जागेसाठी योग्य कुंडी वा सेटअप व झाड लागवड शिकायला मिळणार.
  • 31)ऑरगॅनिक प्रॅक्टीसेस मधून जैवविविधता कशी काम करते हे शिकायला मिळणार.
  • 32)बेसिक टू एडव्हॉन्स केमिकल फ्री गार्डेनिंग शिकायला मिळणार.
  • 33)विनाखर्चिक बागकामाच्या टिप्स व ट्रिक्स शिकायला मिळणार
  • 34)पर्सनल गार्डेनिंगसाठी पर्सनल 1:1 मार्गदर्शन मिळणार.
  • 35)होम कंपोस्टीगं साठी बिगनर्स टू एडव्हॉन्स तंत्र मिळणार
  • 36)कचरा व्यवस्थापनाचे प्रभावी तंत्र व मंत्र मिळणार.
  • 37) माती सुपिक कशी बनवावी याचे तंत्र मिळणार.
  • 38) आणखी बरेच काही…

3/3 कोर्समधून तुमच्या आयुष्यात काय बदल होणार?

  • 1) स्वसंवाद वाढेल.
  • 2) एकमेंकात सुसंवाद वाढीस लागेल.
  • 3) व्यक्तिमत्वात सुधारणा होणार
  • 4) व्यक्तिगत व कुटुंबाचे आरोग्य सुधारणार
  • 5) आरोग्यावर होणारा दवाखाण्याचा अनाठायी खर्च वाचणार
  • 6) कर्करोग, रक्तदाब, अशक्तपणा, लठ्ठपणा, डायबेटीस सारख्या गंभीर आजारापासून दूर राहणार
  • 7) व्यक्तिगत पातळवीर विश्लेषणाची क्षमता वाढीला लागणार.
  • 8) कुटुंब बांधणी, कुंटुबात जबाबदार्यांचे जाणीव होणार.
  • 9) मुलांमधे निसर्गाबद्दलची आवड वाढीस लागणार.
  • 10) चिडचिडेपणा, रागीट स्वभाव कमी होणार
  • 11) आहारातील मीठ, मासं, मैदाचे पदार्थ कमी होणार.
  • 12) टाकावूतून टिकावू, जे उपलब्ध आहे त्याचा उपयोगातून सृजनशिलता वाढणार.
  • 13) तुम्ही आपल्या मित्र परिवारात मार्गदर्शक बनाल.
  • 14) आवडीतून व्यवसाय वाढ होणार.
  • 15) गार्डेनिंग एक्टॅव्हिटीज व्दारे शारिरीक व्यायामातून फिटनेस मिळेल.
  • 16) ताण तणाव कमी होईल. मनोशारिक आजारातून मुक्तता मिळेल.
  • 17) बागेत काम केल्याने मेन्टंल हेल्थ सशक्त होईल.
  • 18) बागेत काम केल्याने व्हिटामिन डी व डोळ्यांची शक्ती वाढेल.
  • 19) बागकामातून तुमची सहनशक्ती, विचारातील खोली वाढेल.
  • 20) बागकामातून नैराश्य कमी होऊन मूड सुधारेल.
  • 21) कमी वेळात अधिक शांतनेने झोप पूर्ण होईल.
  • 22) बागकामात रोज ताजा प्राणवायू मिळू लागेल.
  • 23) ऑरगॅनिक भाज्यांच्या सेवनाने विषमुक्त पोषण तत्व मिळू लागतील.
  • 24) बागाकामातून सृजनशिलता वाढीस लागेल.
  • 25) बागकामातून तुम्हाला आत्मविश्वास वाढीस लागेल.
  • 26) बागकामातून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागेल.
  • 27) आणखी बरेच काही.

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Earth is like (English) Importance of Gardening (English) importance Of Gardening (Hindi) Great Technic for Orgnic Vegetables gardening
10 OxyGen Plants