Importance of Organic Gardening, Benefits, and Celebrating on day of International Kitchen Gardening Day
आंतरराष्ट्रीय किचन गार्डनिंग डे: जैविक बागकामाचे महत्त्व आणि फायदे
Table of Contents
आंतरराष्ट्रीय किचन गार्डनिंग डे International Kitchen Gardening Day. आपल्याला आपल्या घर, घर परिसर व आंगण या ठिकाणी ताज्या, पोषणमूल्यपूर्ण, आणि विषमुक्त भाज्या उगवण्याची प्रेरणा देतो. या जागतिक दिवसाच्या निमित्ताने, आपण जैविक बागकामाच्या महत्त्व काय आहे? त्याचा विचार करू या. तसेच हे आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे, आरोग्य कसे सांभाळता येते. तसेच भाज्या व फळांवर होणारा खर्च थोडक्यात पैशांची बचत कशी करते, आणि पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाव कसा वाढवते. जैविक बागकाम हे केवळ पर्यावरण पूरक नाही, तर आपल्या रोजच्या आहारात पौष्टिकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. International Kitchen Gardening Day हा जगभर साजरा केला जातो. तो मुख्य म्हणजे पोषण आहार. आहार निर्मिती स्वतःचा व कुटुंबाचा सहभाग गरजेचा असतो. व या सार्या कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय किचन गार्डनिंग डे साजरा केला जातो. या निमित्ताने आपण या तत्त्वांचा अवलंब करू शकतो आणि आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवू शकतो.

परिचय:
- आंतरराष्ट्रीय किचन गार्डनिंग डेची ओळख: आंतरराष्ट्रीय किचन गार्डन डे International Kitchen Gardening Day हा दिवस किचन गार्डनिंग चे महत्च, त्यातील आनंद व त्याचे फायदे समजून सांगणारा उत्सव आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी ऑगस्ट महिण्यातील चौथा रविवार हा ठरवलेला आहे. हा दिवस जगभरात विविध पर्यावरणीय संस्था, संघटना, समुदाय व गट हे दरवर्षी या दिवशीच साजरा केला जातो. विशेषतः घरच्या घरी ताज्या भाजीपाला आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करणारा हा दिवस. व्यक्तींना, समुदायांना आणि कुटुंबांना शाश्वत गार्डनिंगच्या पद्धतींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो. ज्यामुळे नैसर्गिक अन्नाच्या स्त्रोताशी जोडले जात आणि आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळते. या वर्षी हा दिवस २५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा केला जात आहे. या दिवसाला अन्यन्य साधारण महत्व आहे. गच्चीवरची बाग, अर्थातच ग्रो ऑरगॅनिकची सुरूवातीच्या दिवसात नाशिक शहरात साजरा केला होता. हा दिवस International Kitchen Gardening Day आम्ही स्थानिक न्यूजपेपर यांच्या सामायिक समन्वयाने कार्यक्रम आखणी केली होती.
इतिहास आणि पार्श्वभूमी…
- आंतरराष्ट्रीय किचन गार्डन डे ही किचन गार्डनर्स इंटरनॅशनल (KGI) या संघटनेने स्थापन केलेली एक वार्षिक मोहीम आहे. 2003 साली स्थापन झालेल्या या संघटनेने किचन गार्डनिंगच्या पद्धतींचा प्रचार करण्यास सुरूवात केली. अन्नसुरक्षा, पर्यावरणीय शाश्वतता, आणि व्यक्तिगत आरोग्यासाठी त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. व त्याला जगभरात मान्यता व आवड दर्शवली गेली.
- हा दिवस International Kitchen Gardening Day साजरा करण्यामागील उद्दिष्ट अनेक आहेत. ते म्हणजे लोकांना आपले स्वतःचे अन्न स्वतः उगवण्यास प्रोत्साहित करणे, मग ती जागा मोठी बाग असो किंवा छोटी बाल्कनी असो. वर्षानुवर्षे, हा उत्सव साजरा केला जातो. तो आता जगभर पसरला आहे, जिथे सहभागी आपापले गार्डनिंगचे अनुभव शेअर करतात, बियाणांची आदलाबदल करतात. रोपांची देवाण घेवाण करतात. एकमेंकाच्या घरी, ठिकाणी गार्डन टूर आयोजित करतात, आणि कार्यशाळांचे आयोजन करतात. सध्या ऑनलाईन ईव्हेंट साजरे केले जातात.
महत्त्व….
- आंतरराष्ट्रीय किचन गार्डन डे International Kitchen Gardening Day : स्थानिक पातळवीर, स्थानिक अन्न उत्पादनाच्या मूल्यावर भर देणारा आहे. स्थानिक पातळीवर अन्नाची कमतरता कमी करण्यावर आणि लोकांना जमिनीशी जोडण्याच्या प्रक्रियेवर भर देतो. हा दिवस सेंद्रिय गार्डनिंगच्या पद्धतींचे महत्त्वही अधोरेखित करतो, ज्यामुळे निरोगी परिसंस्था आणि समुदायांची निर्मिती होते.
- प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या रविवारी हा दिवस International Kitchen Gardening Day साजरा केला जातो. गार्डनिंगच्या कोणत्याही स्तरावर असलेल्या गार्डनर्सना ताज्या, घरच्या घरी उगवलेल्या भाज्यांच्या आनंदाचे स्मरण करण्यासाठी केला जातो. किचन गार्डन तयार करण्याच्या अनेक फायद्यांची आठवण करून देण्यासाठी एकत्र आणतो.
- आमच्यासाठी हा दिवस तसा मोलाचा व संस्मरणीय आहे. कारण यातून International Kitchen Gardening Day आमच्या कामाला बातम्या, न्यूज चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र व देशभरात पोहचवण्यास मदत झाली. आम्ही दरवर्षी या दिवसाला विविध उत्पादने व सेवा लॉन्च केल्या आहेत. ज्या बागप्रेमीच्या लक्षात आहेत.
- जैविक बागकामाचा वाढता ट्रेंड आणि त्याचे महत्त्वः सध्या ऑरगॅनिक भाज्यांना महत्व प्राप्त झाले आहे. सजग नागरिकांना आता नैसर्गिक, सेंद्रीय व रासायनिक उत्पादन पध्दतीची माहिती कळतआहे. त्याचे शारिरिक, पर्यावऱणीय व आर्थिक काय नुकसान होते याची जाण वाढली आहे. तसेच उपलब्ध जागेत घरच्या घरी केमिकल फ्री भाजीपाला पिकवता येतो याची त्यांना आमच्या उपक्रमामुळे खात्री पटली आहे. तेव्हां येत्या काळात संकल्पनेला गती प्राप्त होणार यात शंका नाही.
मुख्य मुद्दे:
१. जैविक बागकामाचे आरोग्यदायी फायदे:
- विषमुक्त आणि ताज्या भाज्यांचा आहारातील उपयोग : आज आरोग्य हे सर्वात महत्वपूर्ण झाले आहे. हेल्थ है तो सबकुछ है. त्यामुळे आहारात रसायनमुक्त अर्थातच केमिकल फ्री भाज्या खाणे गरजेचं झाले आहे. रसायनमुक्त अन्नामुळे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अगदी योग्य प्रकारचे मिनरल्स, विटामिन्स मिळाल्यामुळे शांत झोप लागते. मन प्रसन्न राहते. कारण केमिकल फ्री अन्न उगवल्यामुळे भाज्यांमधे, फुलांमधे, फळांमधे नैसर्गिकरित्या पोषणमूल्यांचा समावेश होतो व ते तंत्र केवळ निसर्गाकडे आहे. आपण रासायनिक पध्दतीने वाढवण्याचे तंत्र अवगत केले तरी ते फार पोचट व अल्पायुषी आहे हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. International Kitchen Gardening Day साजरा करू या.
२. पर्यावरण पूरकता आणि टिकाव:
- पर्यावरणावर रासायनिक खतांचा होणारा नकारात्मक परिणामः रोज नवनविन रसायनं बाजारात येत आहेत. बरं हे एकट्याने येत नाहीत ते इंतराना सोबत घेवून येतात. म्हणजे मुळातच ही सर्व रसायनं मानव व प्राणी जातीसाठी वेगळे आहेतच. त्याचा आपल्या सजिवांवर काय परिणाम होतो याचा आता पत्ता नाही. त्यातल्या त्यात यांच्या एकत्र संयुगांमुळे किती भयानक व दूरगामी परिणाम होणार आहेत याचा कुणी अभ्यास करायला तयार नाही. त्याचे वाईट परिणाम झाले की आताची एलोपॅथी पैसा वसूल करत वेगवेगळ्या उपचार पध्दती अवलंबत स्वंतत्र्यरित्या संसोधन करत असतात. तर यांचा जल, जंगल, जमीन यांच्या सोबत वनस्पती व प्राण्यावर दुरगामी वाईट परिणाम होत आहे. ते सर्वांना मान्यपण आहे पण त्याविषयी कृती करायला कुणी तयार नाही.
- जैविक बागकामाद्वारे पर्यावरणाचे रक्षणः पण जेव्हा रसायनमुक्त भाजीपाला अथवा बाग फुलवली जाते. तेव्हा सर्व जिवांसाठी व पुढील पिढ्यांसाठी सर्वाथांने शाश्वत व पर्यायी जिवनशैली खरं तर आधीच होती.. म्हणून स्विकारणं महत्वाचं ठरतं. प्रत्येक पावलावर होणारा दुष्परिणाम हा रोखता तर येतोच पण पावलापावलावर आपण या पृथ्वीचे, वसुंधरेचे रक्षणच करतो. व हाच वारसा आपण पुढच्या पिढीलाही उपयुक्त व मार्गदर्शक ठरतो. पण लक्षात कोण घेतयं.
- टिकावू शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने पाऊलः आता हे सर्व लक्षात येतय, आलयं. तर मग त्या दृष्टीने पाऊल उचलायची तर काय करायचं… सोप्प आहे. जमेल तेथे कचरा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची, तसेच त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामुळे किचनमधील कचरा हा बाग फुलवण्यासाठी सहज सोप्या पध्दतीने वापरता येतो. फक्त त्याचं तंत्र तुम्हाला असणं गरजेचं आहे. जसा आरोग्याचा मार्ग पोटातून जातो तसाच पर्यावरण संरक्षणाचा मार्ग हा किचन गार्डेन फुलवण्याने बहरतो. दिशा देतो. त्यामुळे International Kitchen Gardening Day चं महत्व येथे अधोरेखीत होतं.
३. घरगुती खर्चात बचत:
- घरातल्या बागेतून ताज्या भाज्यांची उपलब्धता : आज सर्वात जास्त पोषक तत्व मिळतात ति ताज्या व हिरव्या भाज्यामधून. पण बाजारात मिळणार्या भाज्या या खरोखर रसायनमुक्त आहेत याची छातिठोक खात्री कोण देणार. त्यामुळे घरीच भाज्या उगवणे गरजेचे आहे. घरीच ऑरगॅनिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवली तर त्यातून भविष्यातील आरोग्यावरील अनेक गोष्टीचा खर्च वाचणार आहे. शिवाय तुमची उत्पादकता व आळशी पणा दुर होतो. आपला भ्रम आहे की घरी भाज्या उगवल्या तर भाज्यावरचा खर्च कमी होईल. पण बाजारातली भाजी हे स्वस्त असो की महाग पण ति अंतिमतः महागच पडते. कारण ति तुम्हाला हळू हळू हॉस्पीटलची, स्मशनाची वाट दाखवते त्या खर्चाचं , नुकसानीचं काय… . म्हणूनच हा सारा विचार आपल्याला International Kitchen Gardening Day निमित्त करणं गरजेचं आहे.
- स्वतःच्या बागेतून ताजे उत्पादन मिळवण्याचे फायदेः घरी बाग फुलवण्याचे अनेक फायदे आहेत. अगदी मेन्टल पीस पासून ते फिटनेस पर्यंत.. थोडक्यात हेल्थ पासून तर वेल्थ क्रिएशन पर्यंत… पण हे फक्त वाचून त्याचा अनुभव नाही घेता येत. त्यासाठी तुम्हाला
निष्कर्ष:
- आंतरराष्ट्रीय किचन गार्डनिंग डे International Kitchen Gardening Day च्या निमित्ताने आपल्या घरात जैविक बागकामाचा प्रारंभ करण्याचे महत्त्व.
- आपले आरोग्य, पर्यावरण, आणि खर्च बचतीसाठी जैविक बागकामाचे फायदे.
सुरुवात करा: International Kitchen Gardening Day च्या निमित्तीने या हेल्दी प्रवासाला सुरूवात करा. आपल्या आरोग्याबद्दल खरोखर जागृत असाल तर मनुष्य, तो कुटुंब कर्ता हा उपलब्ध साधनांमधे सुध्दा बागकाम करायला सुरूवात करतो. अगदी विडों उपलब्ध असेल तरी तेथे विंडो गार्डेनिंगला सुरूवात करतो. आजच आपल्या घरात किचन गार्डनिंग सुरू करा आणि जैविक बागकामाच्या फायद्यांचा आनंद घ्या. शिकण्यासाठी सामील व्हा: अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या जैविक बागकाम कोर्समध्ये सामील व्हा.
7. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण
- यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज
8. बागकाम विषयावरील लेखः
- टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन
9. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :
टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स , फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
भाजीपाला बियाणे….
एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक: बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करा. तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा. व्हेजेटेबल्स सिड्स
- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
- Do You Know This Plant?
English: Celebrate #InternationalKitchenGardeningDay by starting your own #OrganicGarden at home. Learn the benefits of #OrganicVegetableGardening for your health, sustainability, and cost-saving. Discover easy gardening tips and techniques to grow pesticide-free vegetables on your terrace or kitchen garden. Join the movement for a healthier, greener future with organic gardening. Marathi (m):
#आंतरराष्ट्रीयकिचनगार्डनिंगडे साजरा करा आणि आपल्या घरात #सेंद्रियबाग सुरू करा. #जैविकभाजीपाला बागकामाचे आरोग्यासाठी, टिकाऊपणासाठी, आणि खर्च-बचतीसाठी असलेले फायदे जाणून घ्या. आपल्या टेरस किंवा किचन बागेत रसायनमुक्त भाज्या उगवण्यासाठी सोप्या गार्डनिंग टिप्स आणि तंत्रे शिकून घ्या. सेंद्रिय बागकाम करून एक निरोगी आणि हरित भविष्य घडवण्यासाठी पुढाकार घ्या.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.