Struggling with Rainy Garden Setup?
पावसाळ्यातील बागेची पूर्वतयारी
पावसाळयात बाग फुलवू असं समजून तुम्ही शांत बसला असाल तर मोठी चूक करताय. जर तुम्हाला पावसाळ्यात सुंदर फुलांनी व हिरवळीने भरलेली बाग हवी असेल, तर Rainy Garden Setup करून पूर्वतयारी करा. आताच योग्य प्रकारे तयारी न केल्यास तुमचे आर्थिक नुकसान तर होईलच. पण शिवाय मनाची शांतता भंग पावून मनस्ताप झेलण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. आजच नियोजनाला लागा आणि बाग फुलवा! उन्हाळ्यातील 55 डिग्री सेल्सीयस उष्णतेमुळे बागकामाकडे दुर्लक्ष होते, पण पावसाळी बाग फुलवायची असल्यास आतापासून तयारी आवश्यक आहे. योग्य नियोजन, साहित्य, आणि दिशादर्शक पावले उचलल्यास आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तुमच्या बागेचा आनंद द्विगुणित होईल. चला, ५ स्टेप्समध्ये पावसाळी बागेच्या तयारील लागू या..! या ब्लॉगमध्ये आपण उन्हाळ्यात बागेची तयारी कशी करावी. कोणती साहित्ये गोळा करावी आणि योग्य दिशेने नियोजन कसे करावे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. –संदीप चव्हाण, G₹OW O₹GANIC,

Table of Contents
1. उन्हाळा असला म्हणून काय झालं? हीच ती योग्य वेळ!
उन्हाळा आला, म्हणजे बागकाम करायचचं नाही, बागकाम थांबवायचं असं आजिबात नाही! उन्हाळ्यात बागेची पूर्वतयारी केल्यास पावसाळ्यात Rainy Garden Setup तुमच्या गच्चीत, बाल्कनीत, फार्महाऊस किंवा परसबागेत सुंदर हिरवळ पाहायला मिळेल. काही लोक उन्हाळ्यात बागेचा विचारच करत नाहीत आणि अचानक पावसाळा आला की “आता बाग करावी” असं ठरवतात. मग त्यात येतात मोठ्या चुका!
- आली लहर, केला कहर! बऱ्याच वेळा लोक “अचानक” बागकाम सुरू करतात आणि शेवटी काहीच साध्य होत नाही. परिणामी, पैसे वाया जातात आणि बाग सुंदर फुलण्याऐवजी कोमेजते. म्हणूनच उन्हाळ्यात बागकाम सुरू करणे अथवा त्याची पूर्वतयारी करणे हे खूप महत्त्वाचे आहे.
- उन्हाळ्यात बागकाम का आवश्यक आहे? पावसाळ्यात झाडे व्यवस्थित वाढण्यासाठी आधीपासून नियोजन करणे गरजेचे आहे. योग्य वेळी बियाणे लावणे, खते टाकणे, झाडे तयार करणे ही प्रक्रिया उन्हाळ्यात सुरू करावी लागते. तर त्याची सर्व नियोजन करून ठेवावे लागते. तहान लागली व विहीर खोदायला घेतली असे नको व्हायला.
2. आताच मार्गदर्शन घ्या
योग्य सल्ला घेतल्यास चुका टाळता येतील. आली लहर केला कहर असं बरेचदा बागप्रेमींच्या आयुष्यात व प्रामुख्याने पावसाळ्यात बाग फुलवतांना होत असते. बाग फुलवायची म्हणजे इंटेरनेट वर जावून साहित्य गोळा करणे. त्याची खिचडी अर्थात मिश्त्रण तयार केले, कुंड्यात भरले, झाडे लावले की फुलली बाग असं आजिबात नाही. प्रत्येकाचं गार्डेन हे युनिक, वैशिष्ट्य पूर्ण असते. तुमच्या गार्डेनसाठी सर्वंच प्रश्नांची उत्तरेही इंटरनेट, फ्री सेमिनारमधे मिळतील हे नक्की नाही. ते मिळतील ही पण त्यात तुमचा वेळ खर्च होण्याीच शक्यता असते. त्यामुळे तज्ञ व्यक्तिशी बोलून, त्यांना तुमचे गार्डेन, त्यातील प्रश्न याविषयी सविस्तर चर्चा करून बागकामाच्या Rainy Garden Setup पूर्वतयारीला लागा.
3. नियोजन करा
कोणत्या झाडांची लागवड करायची याचा आराखडा तयार करा. जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा याविषयी विचार करा किंवा त्याचा सल्ला घ्या. नियोजनाने अर्धी लढाई जिंकता येते. कारण त्यासाठी आपला मेंदू हा तयार असतो. स्पेशल वही तयार करा. त्यात डोक्यात येणारे बारिक सारीक गार्डेन आयडियाज लिहून ठेवा. शक्य झाल्यास महिना, आठवडा, दिवसांचे नियोजन करा. भले मुंगीच्या गतीने प्रगती करा. पण Rainy Garden Setup अर्थात पावसाळ्यापूर्वी बागेच्या तयारीला लागा. तज्ञांसोबत पर्सनल कंन्सलटेशनचा आढावा घ्या. शक्य झाल्यास ऑनलाईन गार्डेनिंग कोर्सेस जॉईन करा.
4. दिशा ठरवा
बागेची योग्य दिशा आणि जागा निवडा. एकद्या इंटेरियर डिझायनर प्रमाणे विचार करा. तुम्ही नविन असाल तर तुम्हाला नेमकं कसं गार्डेन तयार करायचे? कशाचे गार्डेन तयार करायचे याची दिशा आताच ठरवा. कारण या दिशेवरच तुमच्या पुढील बागेत करावयाचे खर्च, साहित्य खरेदी, त्यासाठी लागणारा वेळ, माहिती, शिकण्याची तयारी हे ठरत असते. त्यामुळ तज्ञांशी बोलून योग्य दिशा लक्षात घेवून Rainy Garden Setup पावसाळ्यापूर्व बागेच्या तयारीला लागा.
5. साहित्य गोळा करा
आवश्यक खत, माती आणि भांडी तयार ठेवा. बागकामासाठी सहसा कोणत्याही साहित्याची गरज लागत नाही. तुम्ही सोशल मिडीवरील रिल्स बघून प्रभावीत होवून तुम्ही इंटरनेटवरून साहित्य खरेदी करत असाल तर फसाल. कारण शुन्य खर्चात बाग फुलवता येते. तुमच्याच आजूबाजूला असलेला काडीकचरा व विस टक्के मातीचा वापर करता येतो. शिवाय ज्यात माती सामावेल असे कोणतेही साहित्य हे गार्डेन पॉट्स म्हणून वापरता येईल. पण या साहित्याची तयारी आतापासूनच करावी लागते. त्यामुळे तंज्ञाशी झालेल्या सल्ला मसलतीत मुद्दे आमंलात आणा व Rainy Garden Setup पावासाल्यापूर्व बागकामाला सुरूवात करा.
6. रेडी, स्टेडी, गो!
आता प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात करा! सर्व तयारी करून ठेवा. 5 जून पर्यंत पावसाचे वातावरण तयार व्हायला सुरूवात होेतं. तुमचे पूर्वनियोजन पक्के असेल तर तुमची मनाची भंबेरी व तारांबळ होणार नाही. सर्व काही तुमच्या कंट्रोल मधे असणार आहे. आणि बागकामाच्या सर्व गोष्टी कंट्रोलमधे असने हे गुड लर्नर- गुड गार्डनर चे लक्षण आहे. ते रेडी स्टेडी गो रहा. Rainy Garden Setup तयार करा. शिका उगवा व स्वस्थ रहा.
6. Gardening Learning Resources
टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स , फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
Key words and Hashtag
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
- Do You Know This Plant?
- Seeds did you recognize?
उन्हाळ्यात बागकाम, पावसाळी बाग, गच्चीवरील बाग, जैविक शेती, #GardeningTips, #OrganicFarming, #UrbanGardening, #TerraceGarden, #गच्चीवरीलबाग
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.






Kindly share webinar link on mail .bcoz my whatsapp no which is in group
not working.thank you