Top Social Media Strategies to Boost Your Local Agro Business

27 / 100 SEO Score

Agro Bussiness: Social Media Marketing for Local Bussiness

How to sale Agri prodcuts in Local Market threw Social Media

Unlocking the Power of Social Media Marketing for Local Businesses: Benefits & Strategies

लोकल व्यवसायासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर: टिप्स आणि ट्रिक्स

Organic Marketing For Organic Products

जमाना ऑनलाईनचा आहे. आता चार पावलं चालून वेळ घालवण्यापेक्षा हातातल्या मोबाईलवर चार बटनं दाबून ऑर्डर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे घरबसल्या प्रोडक्ट हातात येवू लागलेत. पैसा फेको तमाशा देखो.. याची आता प्रचिती येऊ लागली आहे. उत्पादक, वितरण, ग्राहक यातला महत्वाचा दुवा म्हणजे ऑनलाईन सोशल मिडीया आहे. यात तोट्यापेक्षा फायद्यांचा अधिक विचार केला तर ऑनलाईन हे सर्वार्थाने सोपं सहज असा वस्तू खरेदी विक्रिचे व्यासपिठ आहे. बरेच कोर्स मेंबर्स आता खत निर्मिती करून त्याचा विक्रि करण्याच्या विचारात आहेत. फक्त खतच नव्हे तर कोणताही लोकल बिझनेस वाढीचा. विक्रिचा पाया हा सध्याचा सोशल मिडिया आहे. त्यावर प्रचार प्रसार करून सहजतेने ग्राहक मिळवू शकतात. त्यासाठी कोणताही पैसा न देता ग्राहक मिळवणे यालाच ऑरगॅनिक मार्केटिंग असेही म्हणतात. ऑनलाइन लोकल एरियात व्यवसाय करण्यासाठी आणि ऑर्गेनिक मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करणे हा एक उत्तम मार्ग आहे. येथे एक ३०-दिवसांचा प्लॅन आहे:

१. योग्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्म निवडा:

सध्या तरी आता डिजिटल युगात आपल्या प्रत्येकाच्या हातात सोशल मिडीयाचे प्लॅटफार्म्स उपलब्ध आहेत. ज्याच्या वर आपण एक कन्झ्युमर न रहाता तेथे क्रिएटर म्हणून आपली भूमिका असेल तर ही माध्यमं आपल्याला आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी उत्तम प्रकारे मदत करतातत. ही माध्यमं कोणती आहेत त्याची यादी खालील प्रमाणे.

  1. Facebook: लोकल ग्रुप्स आणि पेजेसवर व्यवसाय प्रमोट करण्यासाठी याचा उपयोग करता येतो.
  2. Instagram: व्हिज्युअल कंटेंटसाठी (फोटो आणि व्हिडिओ) उत्तम प्लॅटफॉर्म आहे.
  3. WhatsApp: डायरेक्ट मेसेजिंगसाठी आणि क्लोज्ड कम्युनिटीसाठी हे वापरता येईल.
  4. YouTube: लांबलचक व्हिडिओसाठी, टिप्स आणि ट्यूटोरियल्ससाठी युट्युब बेस्ट आहे.
  5. Google My Business: स्थानिक सर्चमध्ये व्यवसाय दिसण्यासाठी याचा वापर करावा.

३० दिवसांचा प्लॅन:

तुम्ही या सोशल मिडीयावर सातत्याने विविध आशयाच्या व विविध फॉरमॅट मधे पोस्ट करता येऊ शकता. सध्या तरी ग्राहकांच्या किंवा अपेक्षित लोकांचे लक्ष वेधीसाठी ३० ते ९० दिवासांचा प्लॅन करू शकता. पण याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. उठ सुठ पोस्ट करून चालणार नाही. यावर नेमंक काय व कसं पोस्ट करायचे याचे नियोजन खालील प्रमाणे देत आहे.

पहिले १० दिवस: पहिल्या दहा ः

पहिल्या दहा दिवसात तुम्ही तुमचे अंकाऊट तयार करणे, त्या संबधीत ठरवून दिलेल्या आकारात फोटो अपलोड करून प्रोफाईल तयार करणे, त्याला अंकाऊट ऑप्टोमाझेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध अंकाऊंटचा अभ्यास करूनच करावा.

  1. दिवस १-३: सोशल मीडियावर प्रोफाइल सेटअप करा.
    • Facebook: व्यवसायाचे पेज तयार करा.
    • Instagram: बिझनेस अकाउंट सेट करा.
    • WhatsApp: बिझनेस अकाउंट तयार करा.
    • Google My Business: प्रोफाइल सेट करा.
  2. दिवस ४-७: ब्रँडिंगसाठी आवश्यक सामग्री तयार करा.
    • लोगो, बॅनर, प्रोफाइल पिक्चर.
    • प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वापरण्यासाठी ब्रँड टेम्प्लेट्स.
  3. दिवस ८-१०: प्री-लॉन्च टिझर्स आणि पोस्ट तयार करा.
    • प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्री-लॉन्च पोस्ट करा.
    • लोकांना उत्सुकता निर्माण करण्यासाठी छोट्या टीझर व्हिडिओ तयार करा.

मधले १० दिवस:

या कालावधीत तुम्ही तुमचे पोस्ट करण्याचे कॅलेंडर तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ति साहित्य सामुग्री तयार करून ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे कॅलेंडर नुसार ते तुम्हाला पोस्ट करणे सहज सोपे होईल. त्यातील नियोजनाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

  1. दिवस ११-१५: कंटेंट कॅलेंडर तयार करा.
    • प्रत्येक दिवसासाठी किंवा आठवड्याच्या काही दिवसांसाठी पोस्ट प्लॅन करा.
    • कंटेंट प्रकार: फोटो, व्हिडिओ, स्टोरीज, लाइव्ह सेशन्स.
  2. दिवस १६-२०: सहभाग वाढवा.
    • लोकल ग्रुप्समध्ये सहभागी व्हा, तुमचा व्यवसाय प्रमोट करा.
    • इंस्टाग्रामवर लोकल हॅशटॅग वापरा.
    • WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा.

शेवटचे १० दिवस:

शेवटच्या दहा दिवसात तुम्हाला तुमच्या अंकाऊट व कोणत्या प्रकारच्या पोस्टला, कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया, लाईक्स येतातहेत याचा सातत्याने अभ्यास करणे गरजेचं आहे. म्हणजे निघालेल्या निर्ष्कातून तुम्हाला अधिक पोहोच वाढवण्यासाठी पोस्ट तयार करता येतील.

  1. दिवस २१-२५: साप्ताहिक रिपोर्ट्स तयार करा.
    • कोणत्या प्रकारचे पोस्ट सर्वाधिक इंटरॅक्शन मिळवत आहेत.
    • कोणते प्लॅटफॉर्म सर्वाधिक प्रभावी आहेत.
  2. दिवस २६-३०: सुधारणा करा.
    • परिणामानुसार स्ट्रॅटेजी अॅडजस्ट करा.
    • जर गरज असेल तर नवीन पोस्ट प्रकार आणि टार्गेटिंग पद्धती आजमवा.

नियमित काय करावे:

तुमच्या पोस्टवर येणार्या कॉमेंटला प्रतिसाद द्या. म्हणजे तुमची उपस्थिती नोंद होत राहिल. त्याने अधिक प्रमाणात पोस्टची पोहोच वाढेल.

  • रोजच्या पोस्टवर प्रतिक्रिया द्या.
  • नवीन लोकांशी संपर्क साधा.
  • लाइव्ह सेशन्स आणि क्यू&A सेशन्स घ्या.
  • ग्राहकांच्या फीडबॅकचा उपयोग सुधारण्यासाठी करा.

हा प्लॅन तुम्हाला तुमचा ऑनलाईन व्यवसाय सेटअप करण्यास आणि ऑर्गेनिक मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करण्यास मदत करेल. हे अगदी सोपं नाही. पण जेवढी कल्पना करतो तेवढं अवघड पण नाही. वेळ लागेल. पण त्यातून येणांरा परतावा हा अधिक असतो. तर तुम्हाला एग्रो बिझनेसस नव्हे तर इतर लोक बिझनेस साठीही ही डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा वापर करता येईल. आम्ही ऑनलाईन ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग सोबत याही गोष्टी शिकवतो.

मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक मेन्टॉर, कोच व कन्संलटंट संपर्कः +91 Wts app: +91

➡️🔥 हॉट कोर्स फॉर कूल गार्डनिंग

🌱 *घरी, दारी, खिडकी, जमीन, गच्ची, शेत, शाळा व फार्महाऊसवर फुलवा*
*फळं, फुल, ऑरगॅनिक भाज्यां व औषधी वनस्पती व झाडं-वृक्ष* 🌱
🍀 तुमच्या आवडीला आजच रचनात्मक पध्दतीने शिकण्याची जोड द्या.
👉 *ते ही आजपासून वर्षभर चार ऑनलाईन फिचर्स सोबत
👉 भारतातला पहिला मराठी भाषेतला कोर्स
*सविस्तर माहितीसाठी*
➡️🔥 हॉट कोर्स फॉर कूल गार्डनिंग
https://www.groworganic.club/courses
Update साठी मो. न. आताच सेव्ह करा.
फक्त संपर्कः 9850-56-9644
फक्त व्हॉट्स अप 8087-47-5242

लोकल व्यवसाय, सोशल मीडीया मार्केटिंग, ऑर्गेनिक मार्केटिंग, व्हाट्सएप मार्केटिंग, गुगल माय बिझनेस, लोकल व्यापार, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑर्गेनिक मार्केटिंग, व्हाट्सएप मार्केटिंग, गूगल माय बिज़नेस, Local business, Social media marketing, Organic marketing, WhatsApp marketing, Google My Business, लोकल व्यवसायासाठी सोशल मीडीया टिप्स, इंस्टाग्राम ऑर्गेनिक मार्केटिंग तंत्रे, व्हाट्सएप आणि गुगल माय बिझनेसचे फायदे, ऑनलाईन व्यवसाय यशाचे रहस्य, लोकल मार्केटिंगसाठी प्रभावी रणनीती, लोकल व्यापार के लिए सोशल मीडिया टिप्स. इंस्टाग्राम ऑर्गेनिक मार्केटिंग तकनीकें, व्हाट्सएप और गूगल माय बिज़नेस के फायदे, ऑनलाइन व्यापार की सफलता का रहस्य, लोकल मार्केटिंग के लिए प्रभावी रणनीतियाँ, Social media tips for local business, Instagram organic marketing techniques, Benefits of WhatsApp and Google My Business, Secrets of online business success, Effective strategies for local marketing, #लोकलव्यवसाय, #सोशलमीडियामार्केटिंग, #ऑर्गेनिकमार्केटिंग, #व्हाट्सएपमार्केटिंग, #गुगलमायबिझनेस, #लोकलव्यापार, #सोशलमीडियामार्केटिंग, #ऑर्गेनिकमार्केटिंग, #व्हाट्सएपमार्केटिंग, #गूगलमायबिज़नेस, #LocalBusiness, #SocialMediaMarketing, #OrganicMarketing, #WhatsAppMarketing, #GoogleMyBusiness


    Discover more from Grow Organic

    Subscribe to get the latest posts sent to your email.

    Discover more from Grow Organic

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    Discover more from Grow Organic

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    Save Earth (English) Earth is like (English) Organic Farming & Gardening Coach in India Importance of Home grown Hindi (Copy)
    10 OxyGen Plants