Write In 2024 Of Magic Garden Story !
Write Form Your Mind Magic Garden Story !
Magic Garden Story – लिहिते व्हा !
Magic Garden Story लिहा- जगाला सांगा !
लिहिते व्हा… ! Magic Garden Story बागकाम करतांना अनेक अनुभव येतात. अगदी व्यक्तिगत बागकाम करतांना, व्यावसायिक बागकाम सेवा देतांना व शिक्षक म्हणून शाळेत शिकवतांना, अशा विविध क्षेत्रात विविध अनुभव असतात. हे तुमचे अनुभव वरील वर्गवारीत शब्दबध्द करा. आणी आम्हाला पाठवा. त्यास तुमच्या फोटों सहित आमच्या गार्डेनिंग ब्लॉगवर प्रकाशित करू. कारण निसर्ग हा प्रत्येक ठिकाणी विविध पद्दधतीने फुलत असतो. मनुष्य चंद्रावर येऊ जावू लागलाय खरा. पण त्याला आपल्या कुंडीतला निसर्ग अजून कळाला नाही. कारण निसर्गाचे विज्ञान अघात आहे. ते तुमच्या व माझ्या अनुभवाने समृध्द करण्याचा विचार आहे. तेंव्हा लिहिते व्हा. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक मेन्टॉर व कोच
Table of Contents

1. का लिहाव ?
निसर्ग हा विविधेतेने काम करतो. त्याची प्रतिक्रिया ही प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी सारखी असेनच याचा काही नेम नाही. वातावरण, तापमान, भौगोलिक स्थान हे सारखे असले तरी त्यात विविधता दिसून येते. आणि बागकाम हा तर प्रत्येकाचा आवडीचा विषय. अगदी वैयक्तिक गार्डेनिंग पासून तर शिक्षकांना शालेय पोषण बाग फुलवण्या पर्यंत तर अगदी व्यावसायिक सेवा पुरवणार्या लोकांपर्यंत. निसर्गात जेवढी विविधता आहे तेवढीच प्रत्यक्ष काम करतांना, त्यातून आलेल्या अनुभवांत विविधता आहे. ही विविधता गच्चीवरची बाग, अर्थात ग्रो ऑरगॅनिक व्दारा प्रकाशित होणार्या ब्लॉग Magic Garden Story मधे शब्द बध्द करण्याचा विचार आहे. जेणे करून वाचकांना निसर्गाबद्दलची जाण, संवेदना व त्याच्या संवर्धनेसाठी कृतीशिलता वाढीस लागेल.
2. कोण कोण लिहू शकत ?
- व्यक्तिगत बागकामः या लेखात Magic Garden Story अगदी जे व्यक्तिगत पातळीवर विविध जागेवर बागकाम करताहेत ते यात आपले अनुभव नक्की लिहू शकता. जसे की तुम्ही टेरेस गार्डेन, किचन गार्डेन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, फार्महाऊस या सर्वाबद्दल तुम्ही तुमचे अनुभव लिहू शकता.
- शिक्षकः आज शाळा शाळात शासन आदेशाप्रमाणे शालेय पोषणबाग स्पर्धा आयोजन केले जाते. संवदेनशिल शिक्षक या बाबत कार्यरत असतातच. त्यांना शालेय पोषणबाग फुलवतांना काय काय अनुभव आले त्याचे शब्दाकंन करू शकता.
- व्यावसायिकः बागकामाची सेवा आपण विविधे प्रकारे देत असतात. त्यात बागकामाची देखभाल अर्थात Garden Maintance करतांना तुम्हाला विविध अनुभव येत असतात. त्या बद्दल तुम्ही तुमचे अनुभव येथे शब्ध बद्ध करू शकता.
3. काय लिहावं ?
- बागकामाचे सुरुवातीचे आव्हान : बागकाम करतांना तुम्हाला आलेल्या सुरूवातीचा प्रसंग किंवा सुरूवात किंवा त्यांनंतर आलेल्या अनुभवांचा व अडचणी येथे लेख लिहू शकता.
- वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव : बागकाम करतांना, तसेच बागकामात तुम्ही अनुभवातून Magic Garden Story शिकलेल्या गोष्टी येथे लिहू शकता.
- निसर्गाच्या विविध पद्धती : निसर्ग विविध प्रकारे कसा फुलतो या विषयीचे बारिक सारिक शिकवणं, धडे, प्रसंग येथे लिहू शकता.
- तुमची बाग – तुमची कथा : तुमच्या बागकाम अनुभवांची कथा तुम्ही येथे लिहू शकता. ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली होती.
- वैयक्तिक अनुभवांची महत्त्वता : अनुभवातून मिळणारे बागकाम यश हे तसे खूप कौतुकाचे व अभिमानाचे असते. त्याविषयी तुम्ही येथे लिहू शकता.
4. परिणाम काय होईल ?
- व्यक्तिगत पातळीवरः व्यक्तिगत पातळीवर जे कोणी बागकामाला सुरू करत आहेत किंवा आता सुरूवात करणार आहेत. त्या सर्वांसाठी आपले लिहलेले अनुभव हे प्रेरणादायी ठरणार आहेत.
- शाळा व शिक्षक पातळीवरः जेणे करून तुमचे अनुभव इतर शाळा व शिक्षकांना कामास येतील. त्यातून निकोप स्पर्धा वाढीस लागेल व पर्यायाने लिहणार्या शिक्षकांचे व काम करणार्या विदयार्थांना त्याचा फायदा होईल. व शालेय स्तरावर बागकाम करणे अधिक सोपे व सहज होईल.
- व्यावसायिक पातळवीवरः बागकामाची सेवा व सुविधा प्रदान करतांना तुम्हाला येणारे अनुभव हे इतर नव्याने होऊ पाहणार्या व्यावसायिकांना Magic Garden Story नक्कीच होणार आहे.
5. काय प्रक्रिया असेल ?
- काय लिहावं या नुसार तुम्ही तुमचे अनुभव लिहू शकता. कमीत कमी ५०० शब्द ते अमर्याद लेख लिहू शकता.
- तुमचा वैयक्तिगत फोटो, बागेचा फोटो, Magic Garden Story शाळेचा फोटो पाठवू शकता.
- लेख अर्थातच gacchivarchibaug@gmail.com वर पाठवावा.
- लेख प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला लेखाची लिंक पाठवली जाईल.
- या प्रकाशित लेखाची लिंक व त्यासोबतची प्रस्तावना तुम्ही कुणालाही फॉरवर्ड करू शकता.
- या लेखाने कोणतेही मानधनाची सुविधा सध्यातरी आमचेकडे नाही.
- तुम्ही तुमच्या स्वंयस्फुर्तिने समाज शिक्षणासाठी लिहावे.
- तुमचा लेख आमच्याकडील तिन हजार पेक्षा जास्त लोकांना पाठवला जाईल.
- बागकाम विषयावरील लेखाचा हेतू हा रोजचे ऑरगॅनिक गार्डेनिंग बद्दलची जागृतता असावी.
6. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण
- यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज
7. बागकाम विषयावरील लेखः
टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन
8. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :
टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स , फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
9. व्हेजेटेबल सिड्स उपलब्ध
एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक: बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

- Sart Organic in 2026
- आज नाही तर… Window Garden पुन्हा पुढे ढकललं जाईल
- हा Grow Bundle तुमच्यासाठी आहे का? प्रामाणिक उत्तर
- Grow Bundle: Window Gardening साठी Ready-to-Start Kit
- खिडकीत बाग आली… आणि आयुष्य बदललं
जादुई बाग, magic garden, garden secrets, Magic Garden Story. gardening tips, enchanted garden, #MagicGardenStory #GardeningSecrets #GardenMagic #GardeningTips #जादूईबाग #बागकाम
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.