आमचा निशुल्क मार्गदर्शन करणारा उपक्रम व डिजीटल प्रेझेन्स

या समाज माध्यमांमधे फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, संकेतस्थळ याचा उपयोग करत आलो आहोत. संकेतस्थळ हे आपल्याला हवे तेथे हवे तसे अपडेट करता यावे म्हणून ते स्वतः शिकून घेतले आहे. आमचे गच्चीवरची बाग हे काम वाढवण्यात वरील समाज माध्यमांवरील लोकांचा फार मोलाचा वाटा आहे.

गार्डन केअर शॉपी : इच्छुक विक्रेत्यांसाठी सुवर्ण संधी…

येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.)  कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)

भविष्यात गच्चीवरची बागेची सेवा, उत्पादनांच्या किमती आणखी कमी होणार…

आम्ही सुरवाती पासूनच या संकल्पनेचे संपूर्ण पालकत्व समाजातील दातृत्वाने एकहाती स्विकारावे यासाठी प्रयत्नात आहोत. आजही कोणी ही पालकत्व स्विकारले तर आम्हाला आमच्या सोयी सुविधा या आजच्या दरापेक्षा ५० टक्के कपात करून पुरवता येणार आहे. शिवाय महिला बचत गट, युवकांना रोजगारही निर्माण करून दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातून जो काही पर्यावरण संवर्धनात लोकसहभाग वेगाने वाढता येईल.

तुम्हाला माहित आहे का ? E Book

कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में”  थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये  तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

गच्चीवरची बाग संघर्षाची गोष्ट, एक चौरस फूटापासूनचा प्रवास हजारो फूटापर्यंत कसा पोहचला

गच्चीवरची बाग नाशिक या पर्यावरणपुरक कार्यक्रमाच्या संचालिका वैशाली राऊत यांचे मनोगत. गच्चीवरची बाग या कार्यक्रमाची सुरवातीच्या संघर्षाची गोष्ट सांगताहेत. एक चौरस फूटापासूनचा प्रवास आता नाशिक मधे हजारो फूटापर्यंत कसा पोहचला. तर जरूर पहा…

चिमणीचे घरटं

बाग फुलवतांना आपल्या बागेत चिमणीचे घरटे असणे फार आवश्यक आहे. कारण चिमणी हा पक्षी इतर पक्षांपेक्षा मानव वस्तीला राहणारा किंबहुना माणसाळलेला आहे. एकदा का चिमणी आपल्या बागेत नांदू लागली की ती इतर पक्षांनाही आंमत्रीत करते. उदाः शिंपी पक्षी, बुलबुल.

Clean_ganesh_visarjan

कोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे.

How to water conserve in gardening

पाणी वेगवेगळ्या रितीने आपण वातावरणात संग्रहीत करू शकतो. आम्ही गच्चीवर बाग फुलवतो. त्यात वाफे किंवा कुडंयामधे तळाशी नारळाच्या २० टक्के शेडंया व साठ टक्के पालापाचोळा वापरतो.  व वर २० टक्के माती. यामुळे पडणारा पाऊस हा टेरेसवरून धो धो वाहून जात नाही.

10 OxyGen Plants