माणूस (सो कॉल्ड) प्रगत होत गेला. ही प्रगती म्हणजे रामयणातील सुर्वर्णीत हरणासारख झालं. हातातून काय निसटत चाललयं. याचा काहीच विचार नाही. त्याच्या खाण्यात भेसळ झाली. भविष्यात अनेक आरोग्यविषयक प्रश्न  वाढवून ठेवलंय याची झलक कोरोनाच्या रूपाने दिसून आली. पण यातून शिकेल, सावरेल तो माणूस कसला.. या बुध्दीवान प्राण्याची अवस्था आता बेडकासारखी झालीय. सारा रोम जळतोय पण हा बसलाय मस्त आत्मसुखाची गिटार वाजवत. आज कितीतरी पर्यावरणीय प्रश्न निर्माण झालेत. वेळीच काही केले नाही तर माणूस नावाचा हा प्राणी स्वतः बरोबर इतरांनाही नामशेष करेन. खरं तर या शक्यतेची सुरवात खूप आधीच सुरू झाली आहे. या विषयी वाचनात आलेला एक लेख तुम्हाला सांगतो.

एकदा शास्त्रज्ञांनी बेडकावर प्रयोग केले. त्यांनी एका बेडकाला गरम पाण्यात टाकले. गरम पाण्यात बेडूक टाकल्याबरोबर क्षणार्धात तो  बेडूक धडपडत बाहेर पडला. तर दुसर्या बेडकाला पाण्यात ठेवून ते पातेले तापवायला ठेवलं. हळू हळू पाणी तापू लागलयं. पण बेडूक काही हलेना… तो तेथेच. पाणी अधिकच गरम झालं पण तो हलला नाही. तेथेच बसून राहिला. शेवटी पाणी उच्च तापमानाला पोहचले, तो दगावला पण जागचा हलला नाही. पाणी तापताय, पण ते एका मोठ्या संकटाची चाहूल आहे याची त्याला जाणीव झाली नाही.  पण हे काय एवढचं ना,  मागचा उन्हाळा बरा होता असं म्हणत तो काहीच न करता तेथेच राहिला.

माणसाचे पर्यावरण संकटाबाबत असेच झाले आहे. पाण्याचा साठा कमी होतोय. नैसर्गिक इंधनाचे साठे संपत चाललेय. जंगल नष्ट झालीय. पावसाचे ऋतू चक्र बदलय. एक ना अनेक पर्यावरण निगडीत प्रश्न.. शेवटी तो आता नैसर्गिक संकटात सापडाय पण आता हातातली वेळ निघून चाललीय. आपली गंमत त्या दुसर्या प्रयोगातील बेडकासारखी झालीय. वेळीच सावध झालं पाहिजे. थेंब थेंब साचून तलाव भरतो तसा छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरण जपता येते . ते फार अवघड नाही. व वेगळेही सांगण्याची गरज नाही. तसे आपण सारेच सुज्ञ आहोतच. पण थोडे थंडावलो आहोत.

पण यात मी एकटा काय योगदान देवू शकणार व त्यात मला काय फायदा हा विचार मनात येणार, आपल्याला रोजच्या कृतीतून पर्यावरण सांभाळता आलं तर, त्याच संवर्धन करता आले तर , अगदी पिण्यासाठी लागणारं घोटभर पाण्यासाठी लोटीभर पाणी कशाला वाया घालवयाचं असा विचार व कृती अवलंबता येईल, तर अगदी घरी उपलब्ध जागेत कचरा व्यवस्थापन करत आपल्याला ऑरगॅनिक भाज्या पिकवता येतील का असाही विचार करायला काय हरकत आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644 / 8087475242