0 (81)

माझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला आकार देतांना अनेक मित्रांनी, मैत्रणींनी, समवयस्क, विचारवंत, समाज सुधारक, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, पत्रकार, प्राध्यापक, गृहणी, जेष्ठ नागरीकांनी मदत केली आहे. प्रथम मी समाजातील सर्वच घटकांचे आभार व्यक्त करतो.

या सामाजिक संकल्पनेला सुरवात करतांना उपजीवकेचा मुद्दा लक्षात घेतला होताच पण त्याला एक उद्मशीलतेचे मुल्य जोडले जाईल की नाही, लोक त्याचे किती स्वागत करतील याची शंका मात्र मनात होतीच. पण ती शंका निरर्थक होती असे आज मागे वळून बघतांना वाटते. अर्थात याचे सारे श्रेय समाजाचेच आहे.
अशा या गच्चीवरची बागे विषयी माझे स्वप्न पुढील प्रमाणे….
गारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात फेसबूक, व्हॉटसऑप सारख्या सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे, लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, शुन्य खर्च, शुन्य देखभाल व बाजारमुक्त साधनांचा वापर करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. यासाठी उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताव्दारे बाग फूलवणे… ज्याव्दारे परिसर स्वच्छता तर साधली जाईल पण त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल.
भाजीपाल्याची बाग फुलवण्यात थोडे श्रम घेतले तर त्याबदल्यात 100 टक्के आनंद, समाधान मिळेलच. बोनस म्हणून रसायनमुक्त भाजीपाला सेवन करता येईल. लोकांना चांगले, सकस अन्न खायाला मिळावे व त्यासाठी लोकांनी स्वतःच प्रयोगशील व्हावे यासाठी प्रेरीत करणे. चांगल्या अन्नाच्या सेवनाने शाकाहार वाढीस लागतो. त्यामुळे भविष्यात शाकाहार वाढावा यासाठी प्रयत्तरत आहे.
परिसर स्वच्छ ठेवा असे सांगीतले तर लोक ही हजार सबबी सांगतील पण सुका ओला कचर्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून निसर्ग फूलवता येतो. तसेच काही केल्याने काही मिळतय आणि तेही आरोग्यदायी आहे असे पटल्यावर लोक कृतीशील होतात. अशी ही गच्चीवरची बाग घराघरात पोहचायवयांचे माझे स्वप्न आहे.
येत्या काळात गच्चीवरची बाग हे साधे सोपे तंत्र शिकवणारे स्वःअनुभवाधारीत पुस्तक घराघरापर्यंत पोहचवणे, तसेच इच्छुकांना भाजीपाला बाग फुलवून देणे, किचन व गार्डन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध सोप्या, बिन खर्चिक उपाय शोधणे व या सार्या उपक्रमातून लोकांना शिकतं करणे हे माझे स्वप्न आहे. घरातील व परिसरातील कचरा व्यवस्थापन करून एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे मला वाटते.
आपले आयुष्य हे निरोगी व आरोग्यदायी व्हावं तसेच आयुष्य वाढावं …या धावपळीच्या जगात निसर्गालाच आपला मित्र बनवून त्यात आपले अशांत मन शांत करावे. त्यासाठी निसर्ग हाच सर्वेत्तम उपाय ठरावा. तसेच वाढत्या शहरातील सिमेंटच्या जंगल हे हिरवेगार व्हावे असे स्वप्न आहे व हे जीवन रंगीत, चवदार, आरोग्यदायी, हिरवेगार, टवटवीत व्हावे व या आनंदयात्रेत समाजानेही सहप्रवासी व्हावे हे माझं स्वप्न आहे. अर्थात ही स्वप्न साखळी एकमेंकात गुफंली आहे. याची पहिली कडी अर्थात गच्चीवरची बाग फुलवण्यातूनच होणार आहे. ती प्रत्येक शहऱातील प्रत्येक घरात, गच्चीवर फुलावी हे स्वप्न घेवून मी काम करत आहे. अर्थात यात आपलीही मदत हवीच आहे.
संपर्कः 9850569644

Email:sandeepkchavan79@gmail.com

आय हॅव ड्रीम …Click for Video0 (1)