आज शहरीकरणाचा वेग व त्यामुळे होणार्या प्रदुर्षणाने सुध्दा सुपर फास्ट गाडीसारखा वेग घेतला आहे. आज प्रत्येकजण प्रदुर्षणाचा बळी पडत आहे. विकास प्रत्येकाच्याच पोटाला चार घास देतोय पण तो येणार्या पिढ्यांचा, पर्यायाने पर्यावरणाचा जीव घेणार हे मात्र नक्की… मग करायचं काय.. झाडं लावणे हा झाला एक उपाय.. पण फक्त एकाच उपायवार काम भागणार नाही. ज्या अनेक तोडांनी प्रदुर्षण वाढीला चालना दिली त्याचं अनेक हातानी व सुक्ष्मविचारांनी आपल्याला प्रदुर्षणावर मात करता येणार आहे… मग काय काय करता येईल असा विचार केला तर शक्यतांच आकाश किती मोठं आहे याचा प्रत्यय येईल..
मी कचरा कमी करेनः कचरा होईल अशी वस्तू, सेवा शक्यतो नाकारेल, नाईलाज असेल तर त्याचं व्यवस्थापन मी स्वतः करेन, जमेल तेवढं त्याच पुर्नचक्रीकरण करेन, त्यास पुन्हा पुन्हा वापरेन. मी घरच्या घरी कचर्याचं कंपोस्टींग करेन, त्याचं विज्ञान, त्यामागील तंत्र, मंत्र शिकून घेईन. त्याचे फायदे जाणून घेईन.
मी माझ्या घरात, घराच्या सभोताल, उपलब्ध असेन अशा जागेत निसर्ग फुलवेन. अगदी विंडो ग्रील, किचन समोरील खिडकी, पायरी, टेबल यावर सुध्दा…
शक्यतो बाजारातून कुंड्या विकत आणण्यापेक्षा शितपेयाची बाटली, दुधाची पिशवी, लेडीज पर्स, नारळाची कंरवटी अगदी जे जे मिळेत की ज्यात बिया, रोपं रूजवेन व वाढवण्यास उपयुक्त साहित्य भरता येईल असं साहित्य वापरेन.
यासाठी माती नाही, खत नाही याचा अट्टहास नाही करणार. त्यासाठी मी उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा वापर करेन. थोडी माती, घरचं कंपोस्टींग खत, सुका पालापाचोळा, वाळवलेले किचन वेस्ट अशा उपयुक्त कचरा वापर करेन.
मी झाडांचा स्वभावाचा अभ्यास करेन, त्याला किती जागा, उन लागतं, ते कशापासून उगवतं म्हणजे बियापासून, फांद्यापासून की कंदापासून याचां हळू हळू अभ्यास करेन. कुठे गेलो तर त्याची चौकशी करेन. त्यांची निगा राखण्यासाठी मी रासायनिक खतांचा, फवारणीचा वापर करणार नाही. त्यासाठी आपल्या पारंपरिक उग्र वासाच्या पदार्थापासून कीड नियंत्रक तयार करेन, उदाः दही पाणी, लसून पाणी, हिंग पाणी. इ.
मला आपडेल ते छोटं छोटं झाडं लावेन. शोभेची असतील, निवडूंग असतील. कमी पाणी, कमी सुर्यप्रकाश, यावर जगणारी, प्राणवायू देणारी असतील. दोन महिने फुलं देणारी फुलं झाडं आणेन. जगवेन.. तसेच घच्या घरी, कोथंबिर, मेथी, पुदीना, अळूची पाने अशी सहज येणारी पालेभाजी लागवड करेन…
मी तसा खूप लहान आहे. चंद्रावर जावून आलोय. मंगळावर जाण्याची तयारी करतोय पण निसर्गा तुझी गुंतागुंत, तुझ्या अंगी असलेला सृजनशीलपणा, तुझे चमत्कार हे लहान बाळासारखे आहेत. तूझ्या सहवासात वेळ कसा जातो ते कळत नाही. तूझं असणं माझ्या डोळ्यांना सुखवतं, मन शांती देतं, थकवा घालवत. समाधान पावतं. तुझ्याकडून मला बरचं काही अजून शिकायचं आहे… मला बरच काही शिकायचं आहे.
कारण, कारण…. कारण आता वेळ आलीय. निसर्गा तूला समजून घेण्याची… आम्ही चूकलोय… आम्ही वेगाची, विकासाची दिशा पकडली पण तूझ परवड केली, तूझी खूप दशा केलीय.. पण आता नाही… मी तूला फुलवेन..
तकूला फुलवतांना मी हार पत्करणार नाही… तूला माझ्या भवताली वाढवेन, सजवेन, तू ज्या मायेने आमचा माय बाप बनून खावू घातलं, वाढवलं, चालायला शिकवलं आता तूला तुझ्या आजारपणात म्हणजे अडचणीच्या काळात तूला सोबत करेन… त्यासाठी मी इतरांना प्रेरीत करेन… माझी माय… धरणी माय… तिची काळजी घेईन. तूला पुन्हा धडधाकट करेन, कारण तू आहेस तर आम्ही आहोत… हे आम्हाला पटलंय… पूरेपूर पटलयं.
Face book A/c वर 5000 मित्र संख्या परिपूर्ण झाल्यामुळे व नवे मित्र जोडण्यासाठी जूने mebers unfriend करतोय. कृपया यापुढील गच्चीवरची बाग updates साठी गच्चीवरची बाग नाशिक page like करा .. link
गच्चीवरची बाग, नाशिक.
www.gacchivarchibaug.in 9850569644 /808747524
website
http://www.gacchivarchibaug.in
website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com
profile
https://about.me/sandeepchavan
cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/
YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q
my link http://www.mylinq.in/9850569644
https://organic-vegetable-terrace-garden.business.site/
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.
You must be logged in to post a comment.