गच्चीवरची बाग

वाढते शहरीकरण व दाट लोकवस्तीमुळे कचर्याची समस्या गंभीर होत चालली आहे. कचरा ही निरोपयोगी, त्याज्य, अपायकारक व गंभीर बाब आहे व त्याचा व आमचा काडीमात्र काहीही संबध असं नागरिक समजतात. कचरा ऊचलणे, त्याची विल्हेवाट, व्यवस्थापन ही प्रशासनाची जाबाबदारी आहे असे समजून नागरिक यातून आपली जबाबदारी झटकून घेतात. कचरा ही आरोग्याशी संबधीत बाब असल्यामुळे व कल्याणकारी राज्य, प्रशासनाची ची जबाबदारी असल्यामुळे त्यावर वेगवेगळे उपाय योजले जातात. यातील सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे घराघरातून कचरा गोळा करणे, तो वाहून नेणे व कुठेतरी एकत्र टाकून देणे, त्यासाठी नागरिकांनी भरलेल्या कराचा मोठा अर्थ खर्च केला जातो. पण खरी समस्या येथेच आहे. कचरा विक्रेंद्रीत पध्दतीने त्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे. विक्रेंद्रीकरण म्हणजे काय तर कचरा आहे तेथेच त्याची व्यवस्था लावणे, व्यवस्था व विल्हेवाट ही दोन वेगवेगळया संकल्पना आहेत. विल्हेवाटीपेक्षा व्यवस्थापन हे सहज सोपे, कमी कालावधीत परिणाम देणारे असते. कचरा हा विविध प्रकारचा असतो. सर्वसामान्यपणे कचरा सुका ओला, जैविक अजैविक, असे प्रकार पडतात. ज्याला भंगारात पुर्नविक्रीचे मुल्य असते तो विकला जातो. पण ज्या कचर्याला मुल्य नसते ते फेकले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माणहोणारी कचर्याची समस्या विचारात घेवूनच गच्चीवरची बाग या सामाजिक उपक्रमाने एक सृजनशील पाऊल ऊचलेले आहे. अर्थात लोकांना केवळ त्याचे खत करा असे न सांगता जैविक कचर्याचा विषमुक्त भाजीपाला निर्मीतीसाठी वापर करणे असे सांगणे, त्यासाठी प्रेरीत करणे हे खरे आनंददायी, लोकसहभाग देणारे व परिणामकारक असा उपक्रम आहे. गच्चीवरची बाग या उपक्रमात उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केला जातो. त्यासाठी प्रेरीत केले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाला बाजूला सारत मानव वस्ती दाटू लागली. त्यामुळे निसर्ग हा परिघावर लोटला गेला. त्यात जागेचा अभाव पण जगण्यासाठी हवा पाणी, प्रकाश यांची गरज असतेच. ती आपण माणूस म्हणून मिळवतो किवां शहरातही ती उपलब्ध होतेच. याचा विचार केला तर आपण बाग बगीचा सहजपणे जगवता येतो यात शंका नाही. घर, फ्लॅट, बंगला, इमारती येथे उपलब्ध होणारा सुर्यप्रकाश येणारी जागा आपण बाग फुलवण्यासाठी उपयोगात आणता येते. या उपलब्ध वस्तू म्हणजे ज्या गोष्टीत सहजतेने फेकून देतो त्यात माती, पालापाचोळा भरून बिज रोवता येईल अशी कोणतीही वस्तू, उदाः दूधाची पिशवी, शितपेयाच्या बाटल्या तर माती सिमेंट्च्या कुंड्या पर्यंत वस्तूत आपण बाग फुलवू शकतो. शक्यतो. टाकावू असलेल्या वस्तू भंगारात न देता त्या अंतापर्यंत वापर करणे हे एका अर्थाने प्रदुर्षण रोखण्याची पहिली पायरी आहे. दर वेळेस नवीन वस्तू आणणे म्हणजे त्याची कचरा निर्मीतीत भर पडण्यासारखी आहे. त्यामुळे गच्चीवरची बाग या संकल्पनेत उपलब्ध वस्तूचा वापर करावा. उपलब्ध नैसर्गिक स्त्रोत.. म्हणजे पालापाचोळा, वाळलेला ग्रीन किचन वेस्ट, नारळाच्या शेंड्या, ऊसाचे चिपाट हा होय. सर्वसाधारण पणे आपण कुंडी किंवा वाफा भरण्यासाठी शंभर टक्के मातीचा व थोड्याफार खताचा वापर केला जातो. त्याने कुंडी जड होते. पण वरील नैसर्गिक स्त्रोतांचा कुंडी वाफा भरण्यासाठी वापर केल्यास त्यातून कचर्याचे सहजतेने व्यवस्थापन होते. अशा पध्दतीने फुलवलेला बागबगीचा हा अधिक तजेलदार, हिरवागार, टवटवीत तर असतोच पण त्यात येणारी फळे, फुले, भाजीपाला हा रासायनिक शेतीतील उत्पन्नापेक्षा अधिक चवदार व सत्वयुक्त असतो. अशी गच्चीवरची बागेची संकल्पना असली तर शहरी परसाबागम्हणूनही ती अंमलात आणता येते. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक अभिसरण घडवून आणणारी ही संकल्पना सर्वदूर पसरावी यासाठी प्रयत्नरत आहे. इच्छुकांना निशुल्क मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून लोकांनी ही स्वच्छमेव जयते ची चळवण व्हावी. रसायनमुक्त भाजीपाला, निसर्ग निर्माण करावा या सदिच्छेसह.