गच्चीवरची‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळा या रविवारी
मटा30 | Updated: 08 Feb 2019, 04:00 AM
‘मटा कल्चर क्लब’ व गच्चीवरची बाग तर्फे आयोजन म टा…आयोजन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घराच्या बाल्कनीत तसेच, गच्चीवर बाग फुलविण्याचे तंत्र सर्वांना शिकता यावे, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गच्चीवरील बाग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० फेब्रुवारी) रोजी सकाळी १० वाजता कॉलेज रोड परिसरातील कृषिनगर येथील समाज मंदिरात ही कार्यशाळा होईल.
घरातील मोकळ्या जागेत छानशी बाग असावी, असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरवत त्याला शास्त्रशुद्ध तंत्राची जोड देण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’तर्फे ‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेत मोजक्या जागेत आणि उपलब्ध साधनात बाग कशी फुलवायची, याबाब मार्गदर्शन केले जाईल. फुले, भाज्या, फळे या बागेत तयार करण्यासाठी खतप्रक्रिया कशी करायची याचे प्रात्यक्षिक कार्यशाळेत दाखवले जाईल. प्रशिक्षक संदीप चव्हाण बाग फुलविण्याचे प्रात्यक्षिक व तंत्रशुध्द माहिती या कार्यशाळेतून देणार असून, कार्यशाळेत तुमच्या बागेसंदर्भातील प्रश्नांचे निरसन केले जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आहे. नावनोंदणीसाठी ९४२२५१३५६९ या क्रमांकावर अथवा महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसूझा कॉलनी, कॉलेज रोड इथे ‘मटा’ कार्यालयात ११ ते ५ या वेळेत संपर्क साधू शकतात.
२९९ रुपयांत व्हा ‘मटा कल्चर क्लब’चे सभासद
मनोरंजनाची पर्वणी अनुभवण्यासह विविध प्रकारच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’चे सभासद व्हा. आता फक्त २९९ रुपयांत ‘मटा कल्चर क्लब’चे सभासद होण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. ‘मटा’च्या कार्यालयात किंवा http://www.mtcultureclub.com या संकेतस्थळावर जाऊन सभासदत्वाची नोंदणी करता येणार आहे.
‘गच्चीवरील बाग’
कधी : १० फेब्रुवारी २०१९, रविवार
कुठे : समाज मंदिर, कृषिनगर, कॉलेज रोड
किती वाजता : सकाळी १०
http://www.gacchivarchibaug.in

आणखी वाचा…
Not Only Consultancy …Much more
गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…
पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?
बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…
कार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…
गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा